'यंग शेल्डन’ मालिकेतील शेल्डन आणि पॅस्टर जेफ यांच्यातील संवाद ...
Series: Young Sheldon
Episode: Poker, Faith and Eggs (2017).
Pastor Jeff: Sometimes people say to me, "Pastor Jeff, how do you know there's a God?" And I say "It's simple math. God either exists or he doesn't." So let's be cynical. Worst-case scenario, there's a 50-50 chance, And I like those odds.
Sheldon: [raising his hand] That's wrong.
Mary : [lower voice] Shelly, put your hand down.
Mary: [to Pastor Jeff] Sorry, Please continue.
Pastor Jeff: That's okay, Mary. It's Sheldon, right?
Sheldon: Yes, sir.
Pastor Jeff: Well, Sheldon, why don't you come on up here and tell me why I'm wrong.
Mary: No!
Sheldon: Okay. [heads on up]
Pastor Jeff: Let's give him a hand, everybody.
Missy : [waking up] What's happening?
Meemaw: [to Mary] Shelly's gonna eat him alive.
Pastor Jeff: So, you were saying?
Sheldon: You've confused possibilities with probabilities. According to your analogy, when I go home I might find a million dollars on my bed or I might not. In what universe is that 50-50?
Pastor Jeff: So, what do you think the odds are that God exists?
Sheldon: I think they're zero. I believe in science.
Pastor Jeff: So you don't think science and God can go hand in hand?
Sheldon: Science is facts, religion is faith. I prefer facts.
Pastor Jeff: Mm. I understand that. Here's a cool fact for ya. A lot of famous scientists believed in God. Isaac Newton, Albert Einstein, even Charles Darwin.
Sheldon: So Darwin's right about God and wrong about evolution?
Pastor Jeff: Now you're gettin' it. Let's give it up for Sheldon, everybody! What a good sport.
यात 'डार्विनपण देव मानत होता’ असा दावा करणार्या पॅस्टरना छोट्या शेल्डनने मार्मिक प्रश्न विचारला आहे. तो म्हणतो, ’म्हणजे तुम्हाला असे म्हणायचे आहे, की डार्विनचा देवाबाबतचा दावा खरा आहे, पण उत्क्रांतीबाबतचा नाही?’
एखाद्या थोराचे आपल्या सोयीचे विधान वा दावे उद्धृत करुन आपले दावे बळकट करतानाच त्याच्या आपल्या धारणांना गैरसोयीच्या ठरणार्या मुद्द्यांबाबत वा विधानांबाबत सोयीस्कर मौन पाळायचे, वा पॅस्टरने जशी बगल दिली तशी बगल द्यायची, हा आपल्या नित्य अनुभवाचा भाग आहे. हिंदुत्ववादी सावरकरांना आपल्या सोयीसाठी डोक्यावर घेणारे, दुसरीकडे त्यांच्या 'गाय माता असेल तर बैलाची माझी नव्हे. गोरक्षणाऐवजी गोभक्षण करा.' या ठणठणीत विज्ञानवादी मताकडे मात्र सोयीस्कर दुर्लक्ष करतात. कारण गोरक्षणाच्या हाकाटीआधारे राजकारण करण्याच्या त्यांच्या हेतूला ते बाधक ठरत असते.
अर्थात एका माणसाचे सारेच काही बरोबर असते असे मानायचे काही कारण नाही. त्यामुळे शेल्डनचा हा प्रश्न तसा निसरडा आहे. पण 'डार्विनसुद्धा' असे म्हणतानाच 'डार्विन हा कुणी खास आहे आणि म्हणून त्यानेसुद्धा देव मानणे हा देवाच्या बाजूचा एक पुरावा मानावा' असा पॅस्टरचा दावा आहे. आता डार्विन कुणी खास माणूस का आहे, तर तो उत्क्रांतीवादाचा जनक म्हणूनच खास आहे. ज्या धार्मिकांना उत्क्रांतीवाद मान्य नाही, त्यांच्या दृष्टीने डार्विन जास्तीत जास्त चार चौघांसारखा साधा माणूस नाही का? तसे असेल, तर मग त्याचा देवावर विश्वास होता की नाही या मुद्द्याला, 'गणपाचा देवावर विश्वास नाही- किंवा विश्वास आहे.' या मताला जेवढी किंमत असेल तेवढीच द्यायला हवी. त्याचा खास उल्लेख करण्याचे कारणच नाही, निदान धार्मिकांच्या मेळ्यात नक्कीच नाही.
हा असा तिढा वारंवार आपण पाहतो. अशा दांभिकांच्या किंवा गोंधळल्या मनांच्या, पण प्रवृत्तीने आक्रमक अशा फौजा दररोज समोर येत असतात.'अमका माणूस अणुवैज्ञानिक असून गोमूत्रातील गुण मान्य करतो' हा दावा करताना प्रथम त्याचे अणुवैज्ञानिक असणे त्याचे सामाजिक स्थान सांगत असते. तो 'गोमूत्र-वैज्ञानिक(?) आहे नि गोमूत्रातील गुण मान्य करतो' हा दावा कुचकामी असतो. थोडक्यात गोमूत्राचे समर्थक अणुवैज्ञानिक असणे या पायावर आपला दावा बांडगुळासारखा चिकटवून देत असतात. त्याने वेदपाठशाळा- किंवा मुस्लिम असला तर जमातमध्ये- जाऊन शिक्षण घेण्याऐवजी विज्ञाननिष्ठ शिक्षण घेतलेले आहे, हा मुद्दाही लक्षात घेण्यासारखा आहे ना? ज्ञान मिळवण्यासाठी तो धार्मिक चाकोरी न स्वीकारता वैज्ञानिक वाट निवडतो आहे हे उघड आहे. मग 'देव मानणारासुद्धा बघा वैज्ञानिक शिक्षणच घेतो, धार्मिक शिक्षण घेत नाही.' किंवा 'देव मानणारे, विज्ञानाऐवजी श्रद्धेच्या बळाला अधिक महत्वाचे मानणारेही वैज्ञानिक आधारावर सिद्ध झालेली उपचारपद्धतीच स्वीकारुन अमेरिकेत उपचाराला जातात; गोमूत्र वापरुन आपला आजार बरा करण्याचा प्रयत्न करत नाहीत.' असे उलट दावे मी विज्ञानाच्या समर्थनार्थ करु शकतोच की.
वास्तव इतकेच असते की एकीकडे तो अणुवैज्ञानिक असतो आणि दुसरीकडे तो गोमूत्र-गुणांवर विश्वास ठेवणारा असतो, किंवा देव मानणारा असतो. या दोन्हींत कोणताही कार्यकारणभाव असेलच असे गृहित धरण्याची घाई करु नये. (जिज्ञासूंनी छद्मसंगती (spurious correlation) ही शक्यताविज्ञानातील (Statistics) संकल्पना पाहावी.) अ आणि ब एका जागी आहेत इतकेच मान्य करुन न थांबता, अ मुळे ब आहे किंवा ब मुळे अ आहे असा कार्यकारणभाव जबरदस्तीने का लादावा? कार्यकारणभाव हा केवळ मूल्यमापनाचा भाग असतो, नि बरेचदा तो सापेक्षही असतो.
दुसरा मुद्दा असा, की सामान्यपणे असे प्रयत्न धार्मिक वा ऐतिहासिक आधारावर अस्मिता जोपासणार्यांकडूनच होतात. एखादा भौतिकशास्त्रज्ञ अथवा रसायनशास्त्रज्ञ आपल्या सिद्धान्ताच्या पुष्ट्यर्थ ’बायबल मध्ये पण असे लिहिले आहे. म्हणजे हे सिद्ध झाले.’ असा दावा करत नाही. तो अनुभव, तर्क, प्रयोग, निरीक्षण, निष्कर्ष या मार्गानेच जातो, त्याला तसेच जावे लागते. आणि त्यातून सिद्ध झालेल्या सिद्धांताला अशी धार्मिक पुस्तकांची जोड द्यावी लागत नाही. विज्ञानाला देवाच्या वा धर्माच्या खांद्यावर बसून आपली उंची वाढवण्याची गरज नसते. तसा प्रयत्न एखाद्याने केला तरी वैज्ञानिक क्षेत्रात त्याला काडीची विश्वासार्हता नसते... अगदी सत्तेच्या बळावर सायन्स काँग्रेसमध्ये घुसखोरी करुन असले भंपक दावे केले तरीही!
धार्मिक आधारावर शेंडाबुडखा नसलेले दावे करणारे मात्र ’नासा’ची साक्ष काढतात. पण तसे करताना ते नासा आपल्या धर्मग्रंथाहून अधिक विश्वासार्ह असल्याची कबुलीच देत असतात. कारण तसे नसेल तर मग नासाची साक्ष काढायचे कारणच काय? नासा हे धर्मपीठ नव्हे तर विज्ञान/तंत्रज्ञानपीठ असल्याने हा धार्मिकांना गैरसोयीचा अर्थ निघतो आहे.
यासारखेच सध्या इलेक्ट्रॉनिक माध्यमांतून बोकाळलेला एक प्रकार म्हणजे आपल्या सोयीची, आपली विधाने वा दावे एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीच्या नावे ठोकून देणे. हा धडधडीत खोटेपणादेखील बाजारात आपल्या वा आपल्या नेत्यांच्या - धार्मिक, सामाजिक, राजकीय वा अन्य - मताला बाजारात फारशी किंमत नाही हे मनातून मान्य केल्याचा उघड पुरावाच असतो. अविश्वासार्ह दावे करणार्यांनाच असे विश्वासार्ह लोकांना वा संस्थांना हायजॅक करावे लागते, त्यांच्या मांडीवर बसावे लागते. सिद्धता नसेल, पुरावा नसेल तेव्हा अशी परपुष्टता वापरावी लागते. आपले नसलेल्यांना, अनेकदा तर आपले विरोधक असलेल्यांना हायजॅक करुन त्यांच्या मुखी आपले बोल बोलवावे लागतात.
आपली विश्वासार्हता वाढवण्याची युगत यांना अजूनही सापडलेली नाही, कदाचित कधी सापडणारही नाही. कारण त्यासाठी नेणिवेबरोबरच जाणिवेच्या पातळीवरही आपण कुठेतरी चुकतो आहोत हे आधी मान्य करावे लागेल. त्यांच्यातील दंभ त्यांना तसे करण्यापासून कायम परावृत्त करत राहतो. चुकांना घाबरणारे हे लोक, ’आम्ही सर्वज्ञच आहोत’ असा दावा आक्रमकपणे करत, समोरच्याला आपले म्हणणे पटवून देण्यापेक्षा त्यांचे तोंड बंद करण्यासाठी जमावाच्या कलकलाटाचा वापर करुन घेतात. माणसांना अज्ञानी ठेवून त्यांच्या कळपाच्या जोरावर ते आपले मत लादू शकतील... पण सिद्ध करु शकणार नाहीत !
व्हिडिओतील मूळ प्रश्नाबाबत बोलायचे तर देव मानणे अथवा न मानणे याबाबतची चर्चाच अनाठायी असते, गैरलागू असते किंवा सरळसरळ कुचकामी असते असे माझे मत आहे.
प्रश्न विचारणार्याच्या मनात देव नावाची संकल्पना मुळातच नीट आकार घेतलेली नसते. त्याशिवाय त्याची त्या संकल्पनेबाबतची धारणा आणि ज्याला तो प्रश्न विचारला त्याची धारणा- कदाचित दोघे एकाच बाजूला असूनही, भिन्न असण्याची शक्यता बरीच असते. याशिवाय धर्माच्या आधारे, जातीच्या आधारे, वंशाच्या आधारे देवांच्या असलेल्या विविध कल्पना आधीच त्या संकल्पनेचे एकमेवत्व बाधित करतात. त्यावर आमच्या गटाने मान्य केलेला तोच एकमेव देव असे बाष्कळ दावे सर्वधर्मीय करत असतात. आणि एकाहुन अधिक गटांची वा व्यक्तिंची ही संकल्पना सारखी असेलच, तर ती ठोस (concrete) नसून धूसर(vague) आणि म्हणून सर्वसमावेशक असण्याची शक्यताच अधिक.
त्यामुळे ज्याला आवश्यकता वाटते, त्यांनी आपल्या मनात आपल्याला अपेक्षित गुणवैशिष्ट्यांसह एक देव निर्माण करावा किंवा इतर कुणाकडून स्वीकारावा नि पुजावा. त्याची मंदिरे बांधू नयेत, की त्याला इतरांवर लादण्याचा प्रयत्न करु नये. पण हे शहाणपण आहे. माणसांचा समाज हा कितीही तांत्रिक प्रगती केलेला असला, तरी मानसिक बाबतीत अजूनही मध्ययुगीन टोळ्यांच्या मानसिकतेमध्येच जगत असल्याने, हे शहाणपण त्या जमावात रुजणे अवघड आहे.
माणसे आप-आपला देव निर्माण करुन ते थांबत नाहीत. त्याच्या अस्तित्वाबद्दल त्यांनाच शंका राहते. मग तो ’खरा’ आहे हे सिद्ध करण्याचा त्यांचा आटापिटा सुरु होतो. आणि हे खरेपण सिद्ध करण्याचा सोपा मार्ग म्हणजे त्याच्या अस्तित्वाला बहुसंख्येचे पाठबळ निर्माण करणे. अशी बहुसंख्या मग साम-दाम-दंड-भेद-छद्म आणि झुंड अशा सहा मार्गांनी जमवली जाते. आता इतके लोक तो मानतात म्हणजे ती संकल्पना नव्हे तर देव खरेच अस्तित्वात आहे असे हे लोक स्वत:देखील मानू लागतात. आणि त्यांचा देव अस्तित्वात असल्याचा ठराव बहुमताने पास होतो.
यावरुन मला मुल्ला नसरुद्दिनची म्हणून सांगितली जाणारी गोष्ट आठवते. गंमत म्हणून तो एक अफवा पसरवून देतो. पाहता-पाहता ती गावभर होते. मग लोक ती खरी मानून त्यानुसार लोक वागू लागतात. हे पाहून मुल्लाही विचारात पडतो नि म्हणतो, ’ज्या अर्थी इतके लोक हे मानत आहेत म्हणजे ते खरेच असले पाहिजे.’ आणि तो ही इतरांसारखा वागू लागतो.
विज्ञानाचे असे नाही. तिथे बहुसंख्या पुरेशी नाही, तिथे सिद्धताच हवी. एका प्रसिद्ध शास्त्रज्ञाचा (बहुद्धा लप्लास किंवा लग्रांज) म्हणून सांगितलेला किस्सा आठवतो. आपल्या विद्यार्थ्यांना एक सिद्धांत शिकवत असताना, ’आता हे उघड (obvious) आहे...’ म्हणत त्याने गणितातला एक टप्पा मांडला. एका चौकस विद्यार्थ्याने हात वर केला आणि म्हटले, ’सर, मला हे उघड कसे ते समजले नाही.’ आता प्राध्यापक महोदय त्या टप्प्याची सिद्धता देऊ गेले नि चक्क अडकले. बराच वेळ प्रयत्न करुन त्यांना ते सिद्ध करता येईना. अखेर तास संपला. दुसर्या दिवशी प्राध्यापकांनी त्या टप्प्याची सिद्धता तपशीलवार दिली आणि गंमतीने म्हटले, ’NOW, it's obvious.'
थोडक्यात एखादा मुद्दा सोपा आहे म्हणून आपण नेहमी त्याची सिद्धता देत बसत नाही. हळूहळू ती विस्मरणात जाते. आणि एखादे वेळी ती द्यायची वेळ आली की आपण अडकतो. पण प्राध्यापकाला ’अरे वर्गातील इतरांना तो टप्पा उघड आहे हे पटले आहे, तू एकटाच अडाणी आहेस.’ असे म्हणून मुद्द्याला बगल देता येत नाही. सिद्धता ही द्यावीच लागते. आणि ती मागणारा तो चौकस विद्यार्थी ज्ञानाचा तो तळही उपसून पाहात असतो, त्या पाण्याला सडण्यापासून वाचवत असतो.
देव-धर्मादि गोष्टींत परंपरा अधिक महत्वाची नि बहुसंख्या. समोरच्या तळ्यातील पाणी चक्क सडले आहे हे दिसत असूनही बहुसंख्येला ते पाणी स्वच्छ आहे असे म्हणण्यास भाग पाडता आले, की ते पाणी पिण्यायोग्य आहे हा दावा ’निवडून आणता येतो’. या क्षेत्रात निर्णय असतो, निष्कर्ष नसतो. बुद्धिगम्यतेपेक्षा प्रामाण्याला नि अनुसरणाला अधिक महत्व असते. आणि म्हणून पाचव्या ’दिवशी’ सूर्य जन्मला हा स्वप्रतारक दावाही लोक शिरोधार्य मानून चालत असतात.
-oOo-
जाताजाता:
शेल्डनने पॅस्टरच्या तर्कातील शक्यता (possibility) आणि संभाव्यता (probability) यांच्यात झालेला गोंधळ अचूक पकडला आहे. बहुसंख्य माणसे या दोन्हींमध्ये गल्लत करतात. अतिशय सोपे उदाहरण देऊन शेल्डनने त्यातील फरक स्पष्ट केला आहे. शक्यता तर्काने सांगता येते, संभाव्यतेला अनुभवाची, माहिती/डेटा यांच्या साहाय्याची गरज असते. शक्यता निश्चित असते. संभाव्यता ही परिस्थितीजन्य असते, परिस्थिती बदलली की ती बदलू शकते. त्याबद्दल विस्ताराने पुन्हा केव्हा तरी.
---
Very well explained, Mandar Sir. I totally agree with your thoughts and justifications.
उत्तर द्याहटवाMany a times, people justify their belief in god by stating that there are things in the universe those are beyond reasoning, there are experiences which would be miraculous if not justified by scientific facts. All such unknown things are then credited to the concept bearer account of virtual reality - god. Perhaps, IMHO, people who believe in god may be treating god as a spunge element to absorb their worries and sorries to give them some psychological support. World has seen enough of how these man-made concept of god and religion has made the human kind to suffer, and yet people still stick around to that, and there are centuries old sophisticated, well trained management who run this propoganda and sees to it that it continue to exist through all means that they can exercise.
Indeed, Sheldon is a great example of how some good arguments with quality reasoning can remove some of our common wrong beliefs.
Thanks Kapil. Appreciate the feedback. You are absolutely right. The concept soaks some tensions out of peoples mind, and I appreciate that role of the concept called God. In a way its a psychiatric treatment. More like Mr. Dumbldore taking a piece out of his mind and keeping it in an urn. As humans climb the ladder of security and knowledge, the rope called God gradually goes redundant. Yet, at lower level, it's role cannot be erased. In short, it is more like the idiom, 'A rich should not thrift and the poor should not be spendthrift.'
उत्तर द्याहटवाशेल्डनचे म्हणणे योग्य जागी उचलल्याने सद्यस्थितीत नेमकं काय होतंय हे नीटच कळलं.
उत्तर द्याहटवातुझ्या पाठिंब्यानेच खरडत असतो काहीबाही. _/\_
हटवा