RamataramMarquee

सूची: अनुक्रमे ▶ वेचे ▶ वेचताना ▶ दृक-श्राव्य ▶

सोमवार, २४ ऑगस्ट, २०२६

यू आर वेलकम, मि. चिप्स


  • प्रिय चिप्स, आमच्याकडच्या शिक्षकांचे काही खास नमुने आहेत. पैशाने दरिद्री अन् कदाचित म्हणूनच मनानेही दरिद्री. पहिला बहुधा याचमुळे, कळकटून आंबलेला किंवा निवांत, अन्‌ आपलं काम नुसतं ढकलत रहाणारा ! दुसऱ्या नमुन्याची परंपरा थेट उपनिषदापासूनची. ‘उषा अन् अरुण’– तमसा नदीकाठच्या समिधा, आश्रमातलं गुरुकुल अन् त्यांतील यज्ञकुंड– ‘समानी आकूतानि’ हे मंत्र अन व्यास-वाल्मीकी, धौम्य ! अशा एका दीर्घ परंपरेची प्रतीके–अन फक्त प्रतीकेच– या नमुन्यामागे आहेत. या शाखेचीच पालवी नसलेली उपशाखा म्हणजे आचार्य अन् गुरुजी असा 'डबल बॅरल 'वाला मास्तर ! ही प्रतीके वंद्य मानून आणि तुमच्याच भाषेच्या वाघिणीचे दूध घेऊन ते पचविलेला स्वातंत्र्यपूर्व काळातला टिळक-आगरकरांच्या पुण्याईतून निर्माण झालेला त्यागी, ध्येयवादी शिक्षक. तसा हा नमुना विरळाच, पण एखाद्या दुसर्‍या पीळाच्या शिक्षकाच्या रूपाने तो महाराष्ट्रीय जीवनात अजूनही टिकून आहे. शुद्ध ज्ञानाची उपासना कसलीही व्यावहारिक तडजोड इथे नाही. कृतबुद्धी, त्याग अन् कष्ट यावाचून सारे व्यर्थ आहे– अशी सूत्रे या गुरु-घराण्यात एकाचवेळी पवित्र अन् गंभीर मानली जातात. छिन्नी-हात...

    पुढे वाचा »

बुधवार, १० जून, २०२६

भाषण देण्याचा प्रकार


  • परमेश्वर दयाळू आहे आणि श्रेष्ठ उपकारकर्ता आहे, यात तिळमात्र शंका नाही. मानवजातीला त्याने मोठ्यांत मोठे असे काही दिले असेल, तर ती म्हणजे वाणी. आता बोलता आल्यावर माणूस ही कला आत्मसात करणारच. पूर्वी मनुष्यप्राण्याच्या वैभवकाळी वक्तृत्वकला ही तत्त्वज्ञ, कवी, नट आणि शास्त्रज्ञ यांच्यापुरतीच मर्यादित होती. पण पुढे मनुष्यजातीचा ऱ्हास होऊ लागला आणि वक्तृत्वकला ही भाषण करणे, या दशेप्रत येऊन पोहोचली. त्यातच अनेक राष्ट्रांच्या घटनांनी भाषणस्वातंत्र्याचा उद्घोष केला आणि 'भाषण देणे' हा प्रत्येक माणूसप्राण्याचा हक्क ठरला. जेवणाच्या टेबलापासून कोपऱ्यावरच्या सभेपर्यंत कोणीही उभे राहून भाषण करावे : बंधू-भगिनींनो!... आता तर लोक निवडून येण्यासाठी भाषणे करतात, का भाषणे करण्यासाठी निवडून येतात, असा प्रश्न आपल्यापुढे उभा राहतो. बरे, ज्या कोणाला विनोदबुद्धी आहे, त्याने हे सारे गंमत म्हणून सहन केले असते. पण कोणा शहाण्या शास्त्रज्ञाने लाऊडस्पीकरचा शोध लावून अक्षम्य अपराध केला आणि हे एक नवे हत्यार भाषण देणाऱ्याच्या हातात आले. दूरवर मारामारी करता येणे शक्य झाल्यामुळे या शस्त्राच्या साह्याने वक्ता आता...

    पुढे वाचा »

शुक्रवार, २९ मे, २०२६

... परतुनि ये घरा


  • प्रास्ताविक: ‘आषाढातील एक दिवस’ या नाटकातील हे दोन प्रवेश कालिदासाच्या आयुष्यातील दोन महत्त्वाच्या टप्प्यांभोवती रचलेले आहेत. ‘पाखरा जा, त्यजुनिया...’ या शीर्षकाच्या पहिल्या भागात प्रिय मल्लिकेला सोडून कालिदास कीर्ती, ऐश्वर्य, सत्ता यांच्या दिशेने चालला आहे. या भागात हे सारे गमावलेला कालिदास मल्लिकेकडे परतून आला आहे. दोन्ही भागांची शीर्षके मो. ग. रांगणेकर यांच्या ‘वहिनी’ या नाटकातील ‘पाखरा जा’ या पदातील अनुक्रमे पहिली नि अखेरची ओळ आहे. --- (परत वीज कोसळते, मेघगर्जना होते, देवडीकडील दार हळू हळू उघडते. दारात कालिदास उभा. खचलेला मोडलेला. मल्लिका एकदम उभी राहून तिकडे पाहू लागते. बाबरलेली. गोंधळलेली, तो पुढे येतो. मल्लिका अवाक् होऊन त्याच्याकडे पाहात राहाते.) कालिदास : बहुधा ओळखलं नसावंस. (मल्लिका तशीच पाहात राहाते. कालिदास सर्वत्र दृष्टी फिरवतो. मग तिच्याकडे येऊन तिला आपादमस्तक न्याहाळतो व आसनाकडे जातो.) आणि न ओळखणंही अगदी स्वाभाविक आहे. कारण मी तो नाहीच– ज्याला तू आधी ओळखत होतीस. मी कुणी वेगळाच आहे. (आसनावर बसतो.) आणि खरं सांगायचं तर मी ...

    पुढे वाचा »

शुक्रवार, २२ मे, २०२६

शुभास्ते पंथान: सन्तु


  • बऱ्याच वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आम्ही दुपारच्या डेक्कन एक्सप्रेसने पुण्याहून मुंबईला जात होतो. पहिल्या वर्गाचा तो डबा नेहमीप्रमाणेच भरलेला होता. आमच्या पुढच्याच दोन जागांवर दोन बाया येऊन बसल्या. त्यांच्या जवळच्या सामानात एक जरा वेगळीच चीज होती. पाळण्याचा मुलांना निजवायचा मधला भाग असतो तसा साधारण चौकोनी उघडा पिंजरा, त्यात छोटी गादी आणि त्यावर गुंडाळून ठेवलेली चार तान्ही मुले. मग आणखीही सामान होते. त्या मुलांना प्रवासात लागणारे दूध, पाणी, थोडी औषधे, बदलायचे कपडे, इतरही काहीबाही. त्या दोघीतली एक तरुण पारशी की इराणी मुलगी होती, दुसरी प्रौढ मराठी बाई. कपड्यांत गुंडाळून ठेवलेल्या त्या चार छोट्या अनपेक्षित प्रवाशांनी आजूबाजूच्या बहुतेक सर्व इतर प्रवाशांचे कुतूहल जागृत केले होते. तसा त्यांचा कुणालाच त्रास नव्हता. बहुतेक वेळ ती झोपलेलीच होती. मधूनच रडत जागी होत त्या वेळी त्यांचे कपडे बदलणे किंवा त्यांना दूध पाजणे यांतले आवश्यक ते त्या दोघी पटकन मोठ्या कुशलतेने करत होत्या. पण एकदम अशी चार मुले, अशा रीतीने प्रवासात आहेत, त्यांना घेऊन आलेल्या दोघीप...

    पुढे वाचा »