RamataramMarquee

Indexes Menu_Desktop

संपूर्ण सूची :

सोमवार, २६ मे, २०२५

उघडीप... आणि झाकोळ


  • मघाचा पाऊस सारखा कोसळत होता. सूर्य दिसत नव्हता, ऊन पडत नव्हते. गडद भरून आलेले आभाळ सारखे सांडत होते. जंगलातील झाडांची खोडे शेवाळ्याने हिरवीगार झाली होती. ओढे-नाले खळाळत होते. जिकडे-तिकडे पाणीच पाणी झाले होते. कधीमधी जोरात पडणारा पाऊस दमगीर होऊन हळूहळू येऊ लागे. थेंबांचा आकार लहान होई. सतत चाललेला घोष मावळल्यासारखा वाटे आणि निळे- पांढरे धुके लोळत येई. दऱ्या भरून जात, झाडे दिसेनाशी होत. डोंगरांची उंच शिखरे झाकून जात. निळे-पांढरे धुके सर्वत्र पसरून जाई. वारा भरारे, धुके निघून जाई. ओलीचिंब होऊन ठिबकणारी झाडे, फोफावलेल्या रानवेली, नाना जातींची झुडपे, मातीचा तांबडा रंग घेऊन धावणारे ओहळ, सर्वत्र पसरलेली हिरवळ दिसू लागे. ती क्षणभर दिसते-न दिसते तोच पुन्हा सडासडा धारा येत. झाडांचे शेंडे वाकत. गवताची पाती जमिनीला टेकत. नकोसा वाटणारा घोष जमिनीपासून… पुढे वाचा »

शुक्रवार, १६ मे, २०२५

कसे रुजावे बियाणे...


  • माझ्यासारख्या सुखवस्तू माणसांच्या जगामध्ये अन्नाचे ताट कधीही रिकामे राहात नाही. लहानपणी सठीसहामाशी लाभणारे मनोरंजनाचे भाग्यही इंटरनेटच्या कृपेने खिडक्या-दारांना धक्के मारत स्वत:हून घरात घुसते. ‘वेळ नाही’ किंवा ‘बिझी आहे’ अशी कारणे तुम्ही सांगू नयेत म्हणून, तुमच्या सोयीसाठी, दहा ते तीस सेकंदात तुमचे मनोरंजन करण्याची हमी ते देते. पाच/दहा रुपयांची चिप्सची पाकिटे विकावीत तशी मीम्स, रील्स वगैरे आणून तुमच्या मोबाईलवर वा संगणकावर ओतत असते. काही महिन्यांपूर्वी हे एक मीम फेसबुकवरुन माझ्यापर्यंत पोहोचले. हे मीम पाहून आलेलं हसू, ते ज्या प्रसंगावर बेतलेले आहे तो चित्रपट नि तो प्रसंग आठवला, नि क्षणात गोठून गेलं. मीममध्ये पार्श्वभूमी म्हणून वापरलेला हा प्रसंग ‘ सेव्हिंग प्रायव्हेट रायन ’ चित्रपटातील एका … पुढे वाचा »

बुधवार, ७ मे, २०२५

तो एक मित्र


  • तो माझा मित्र वयाने माझ्यापेक्षा थोडा मोठा होता आणि व्यवसायाने वकील होता. तो बरीच वर्षे त्या व्यवसायात असल्यामुळे त्याचा जम देखील बरा बसला होता. पण कोर्टातील दिवस संपल्यावर आपल्या कागदपत्रांची जुनाट, पोटफुगी बॅग इतक्या आनंदाने बाजूला फेकणारा दुसरा वकील मी पाहिला नाही. घरी आल्यावर दोन कप कडक चहा घेऊन खिडकीपाशी उभे राहून एक सिगरेट ओढून झाली की तो खरा जिवंत होत असे. मग पाच-सात जुनी इंग्रजी मासिके टेबलावर पसरून पाय देखील टेबलावर चढवून बसला की त्याच्या चेहऱ्यावर समाधान दिसू लागे. याचे एक कारण म्हणजे त्याचा व्यवसाय जरी भडवा असला (हा त्याचाच शब्द) तरी मनाने मात्र तो एक हावरा वाचक होता. म्हणजे नेमून दिलेली अथवा कुणी तरी ऐसपैस गौरवलेली पुस्तके दडपणाने वाचून त्यावर चिकट समाधान मानणाऱ्यांपैकी तो होता असे नव्हे. त्याची शिक्षणाची कारकीर्द तर ऐषआरामात… पुढे वाचा »