RamataramMarquee

सूची: अनुक्रमे ▶ वेचे ▶ वेचताना ▶ दृक-श्राव्य ▶
काळी आई लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
काळी आई लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सोमवार, २६ मे, २०२५

उघडीप... आणि झाकोळ


  • मघाचा पाऊस सारखा कोसळत होता. सूर्य दिसत नव्हता, ऊन पडत नव्हते. गडद भरून आलेले आभाळ सारखे सांडत होते. जंगलातील झाडांची खोडे शेवाळ्याने हिरवीगार झाली होती. ओढे-नाले खळाळत होते. जिकडे-तिकडे पाणीच पाणी झाले होते. कधीमधी जोरात पडणारा पाऊस दमगीर होऊन हळूहळू येऊ लागे. थेंबांचा आकार लहान होई. सतत चाललेला घोष मावळल्यासारखा वाटे आणि निळे- पांढरे धुके लोळत येई. दऱ्या भरून जात, झाडे दिसेनाशी होत. डोंगरांची उंच शिखरे झाकून जात. निळे-पांढरे धुके सर्वत्र पसरून जाई. वारा भरारे, धुके निघून जाई. ओलीचिंब होऊन ठिबकणारी झाडे, फोफावलेल्या रानवेली, नाना जातींची झुडपे, मातीचा तांबडा रंग घेऊन धावणारे ओहळ, सर्वत्र पसरलेली हिरवळ दिसू लागे. ती क्षणभर दिसते-न दिसते तोच पुन्हा सडासडा धारा येत. झाडांचे शेंडे वाकत. गवताची पाती जमिनीला टेकत. नकोसा वाटणारा घोष जमिनीपासून आभाळापर्यंत भरून राही. गेले आठ दिवस असा कोसळणारा पाऊस! त्याने आज सकाळी भांगा दिला. आभाळ स्वच्छ झाले. ताजे ऊन पडले. ओहळ चमकू लागले. हिरवे गवत टवटवीत झाले. आवाज थांबला. उबदार ऊन सर्वत्र पडले. दरीतल्या एका...

    पुढे वाचा »