-
माझ्यासारख्या सुखवस्तू माणसांच्या जगामध्ये अन्नाचे ताट कधीही रिकामे राहात नाही. लहानपणी सठीसहामाशी लाभणारे मनोरंजनाचे भाग्यही इंटरनेटच्या कृपेने खिडक्या-दारांना धक्के मारत स्वत:हून घरात घुसते. ‘वेळ नाही’ किंवा ‘बिझी आहे’ अशी कारणे तुम्ही सांगू नयेत म्हणून, तुमच्या सोयीसाठी, दहा ते तीस सेकंदात तुमचे मनोरंजन करण्याची हमी ते देते. पाच/दहा रुपयांची चिप्सची पाकिटे विकावीत तशी मीम्स, रील्स वगैरे आणून तुमच्या मोबाईलवर वा संगणकावर ओतत असते. काही महिन्यांपूर्वी हे एक मीम फेसबुकवरुन माझ्यापर्यंत पोहोचले. हे मीम पाहून आलेलं हसू, ते ज्या प्रसंगावर बेतलेले आहे तो चित्रपट नि तो प्रसंग आठवला, नि क्षणात गोठून गेलं. मीममध्ये पार्श्वभूमी म्हणून वापरलेला हा प्रसंग ‘ सेव्हिंग प्रायव्हेट रायन ’ चित्रपटातील एका लढाईतला आहे. कॅप्टन मिलरची तुकडी एका हल्ल्यादरम्यान पुरी घेरली गेली आहे. त्यांचे मोजकेच सैनिक शिल्लक आहेत. आजूबाजूला शत्रूसैनिकांची संख्या वाढते आहे, त्यांचा घेराव अधिक घट्ट होतो आहे. अविश्रांत लढ्यानंतर पुरा थकलेला कॅप्टन केशरी केलेल्या राजपुतासारखा ...
पुढे वाचा »
RamataramMarquee
‘प्लरिबस’च्या निमित्ताने... - १२ : जठराग्नी शमवाया भूतां ‘प्लरिबस’च्या निमित्ताने... - ११ : अद्यतनीकरण (Update) ‘प्लरिबस’च्या निमित्ताने... - १० : नव्या व्यवस्थेकडे ‘प्लरिबस’च्या निमित्ताने... - ९ : सर्वे सुखिन: सन्तु सण गेले विरुनी ‘प्लरिबस’च्या निमित्ताने... - ८ : धर्म आणि सहजीवन प्लरिबस’च्या निमित्ताने... - ७ : वैय्यक्तिक संपत्ती नि विषमता ‘प्लरिबस’च्या निमित्ताने... - ६ : समूह नव्हे व्यक्ती; गरज नव्हे संपत्ती
युद्ध लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
युद्ध लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
शुक्रवार, १६ मे, २०२५
कसे रुजावे बियाणे...
Labels:
‘मुक्त-संवाद’,
चित्रपट,
दृक्-श्राव्य,
युद्ध,
राजकारण,
समाज
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)
