-
’एव्हरीबडी लव्ज रेमंड’ ही तशी जुनी मालिका, कौटुंबिक प्रवासातील घटना नि संबंधांमधील विनोदाचा हात धरुन चालणारी. सदैव सहानुभूतीच्या शोधात असलेला 'ममाज बॉय' रेमंड; त्याचा फायदा घेऊन (किंवा त्याला कारण असणारी) त्याला सदैव पदराआड राखू पाहणारी, सून ही नेहेमीच घरकामाच्या बाबत नालायक असते असा ठाम समज असलेली - जवळजवळ भारतीय सासू म्हणावी अशी त्याची भोचक आई मेरी; बाप म्हणून आपल्या कर्तव्याबाबत बव्हंशी उदासीन असणारे, मुलगा-सून-बायको या त्रिकोणात बहुधा बेफिकीर असणारे, आणि खाण्यात व भूतकाळात जगणारे रेमंडचे वडील फ्रँक, आणि संसार हेच जीवितकार्य म्हणून मुलाबाळात रमलेली, नवरा आईच्या मुठीत असल्याने हताशपणे सहन करणारी रेमंडची पत्नी डेब्रा... हे कुटुंब मला बव्हंशी आपल्या भारतीय कुटुंबाचे प्रतिनिधीच वाटत आले आहे. अगदी 'पीपल नेक्स्ट डोअर' व… पुढे वाचा »
RamataramMarquee
अर्ध्यावरती डाव मोडला...       वारसा, जिज्ञासा आणि ज्ञान - २ : पण याचा उपयोग काय?       पौरुषाचा कांगावा      वारसा, जिज्ञासा आणि ज्ञान - १. वृद्धत्वाची जेथ प्रचिती...       काव्य-मोतीचूर ऊर्फ काही ‘चविष्ट’ प्रेमकविता       चला दोस्तहो, खाण्यावरती बोलू काही       मूषकान्योक्ती       सुजन गवसला जो      
Indexes Menu_Desktop
संपूर्ण सूची : |
बुधवार, ५ ऑगस्ट, २०२०
एव्हरिबडी लव्ज आँट सेरिना
मंगळवार, १४ जुलै, २०२०
लॉजिकस्तत्र दुर्लभ:
-
हा एक लहानसा संवाद ’ब्लॅक अॅडर’ नावाच्या एका बर्याच जुन्या मालिकेतला. मि. बीन म्हणून लोकप्रिय झालेला रोवान अटकिन्सन प्रमुख भूमिकेत होता. मला स्वत:ला हा नट फारसा आवडत नाही आणि मालिकाही फारशी आवडली नाही. पण ही मालिका ’अल्टरनेटिव्ह हिस्टरी’ अर्थात समांतर इतिहास या साहित्यिक प्रकारात मोडणारी आहे. ’असे न होता, तसे झाले असते तर’ प्रकारची. अशा स्वरूपाचे लेखन बहुधा पर्यायी जगाचा वेध घेणारे असते, गंभीर असते. पण ही मालिका त्याला विनोदी अंगाने सादर करते. हा कदाचित असा पहिलाच प्रयत्न असावा. प्राचीन इंग्रजीमध्ये अॅडर म्हणजे साप. पण हा ब्लॅक अॅडर नेमका उलट प्रकारचा आहे, शेळपट आहे. राजाचा मुलगा असून त्याला कुणी खिजगणतीत धरत नाही. कधी समोर आला तर खुद्द त्याचा बाप त्याला ओळखत नाही. ’हा तुझा मुलगा’ अशी ओळख दिल्यावरच त्याला ते लक्षात येते. तो याचे ना… पुढे वाचा »
सोमवार, ६ जुलै, २०२०
गाणारं व्हायलिन
-
मी पाश्चात्त्य संगीताचा फारसा भोक्ता नाही. त्यात त्यांचे वाद्यसंगीत सर्वस्वी वेगळ्या वळणाचे. त्यांचे क्लासिकल म्हणवले जाणारे संगीत सिंफनीच्या मार्गाने जाते, ज्यात अनावश्यक गलबला असतो नि मला पुरेसे तंद्री लावून ते ऐकणे शक्य होत नाही. सुरांच्या लडी, आवर्तने उलगडत श्रोत्याला कवेत घेत जाणारे गाणे ऐकण्याची सवय असलेल्या मला, सदोदित गाण्याचा टेम्पोशी खेळ करत आघातांच्या सहाय्याने ’Awe, Wow’ प्रतिक्रिया वसूल करु पाहणारे ते गाणे रुचत नाही. ’सुंदर मी होणार’ मधला सुरेश म्हणतो तसे आपल्याला ’सुरांचे पांघरुण घेऊन गुपचून पडून राहावेसे वाटते’. पण हे लेकाचे अध्येमध्ये अलेग्रो का काय म्हणतात त्याचे दणके देऊन त्या तंद्रीतून बाहेर खेचून काढू पाहतात असा माझा अनुभव आहे. भारतीय वाद्यसंगीताच्या बाबतही मी तसा गायकी अंगाच्या वाद्यवादनाचा चाहता आहे. आपल्याकडे जे … पुढे वाचा »
Labels:
कव्हर आर्टिस्ट,
कारोलिना प्रोत्सेंको,
दृक्-श्राव्य,
संगीत
बुधवार, १ जुलै, २०२०
समीक्षकाचे स्वगत
-
थोडक्या पैशात चालवली जात असल्याने ’फुकट लिहिणार्यास प्राधान्य’ अशी पाटी लावून बसलेली पोर्टल्स तसंच वृत्तपत्रे, आणि फेसबुकसारखी समाजमाध्यमे यांच्या कृपेने चित्रपटांच्या समीक्षकांचे हल्ली भरघोस पीक आले आहे. चित्रपटाची कथा आपल्या शब्दांत सांगून, त्याला दिग्दर्शक, प्रमुख अभिनेत्यांच्या meta-data म्हणजे पूर्व-माहितीची जोड देऊन समीक्षक म्हणून मिरवणारे बरेच दिसू लागले आहेत. सोबत ’मीच पयला’ची अहमहमिका चालवणारे आणि ’बकवास आहे. पैसे फुकट घालवून नका’चे सल्ले न मागता देणारेही उगवले आहेत. ’मसान’सारख्या नितांतसुंदर चित्रपटाबद्दलही असला सल्ला वाचला होता. त्यावर मी तपशीलाने लिहिल्यावर ’आम्ही खरंच या दृष्टीने पाहिले नव्हते. आता पुन्हा पाहू.’ म्हणून कबुली देणारे एक-दोघे निघाले, नि लिहिल्याचे सार्थक झाले असे वाटून गेले. पण अशी खुल्या मनाने विचार करणा… पुढे वाचा »
बुधवार, २४ जून, २०२०
पोर पोशिंदा जाह्लं
-
दृश्य माध्यमांमध्ये चलच्चित्रांचे अर्थात Animationचे माध्यम हे प्रामुख्याने लहान मुलांच्या करमणुकीसाठी आहे असा एक व्यापक गैरसमज आहे. सतत करमणूकप्रधान, ’विचार करायला लावू नका ब्वा’ म्हणत उथळ करमणुकीच्या शोधात असणार्यांना तेवढी एकच बाजू दिसते यात आश्चर्य नाही. 'परदेशी चित्रपट म्हणजे केवळ हॉलिवूड, आणि हॉलिवूड म्हणजे कृतक-हिरोंचे अशक्य, अतर्क्य कारनामे दाखवणारे किंवा भीती वा लैंगिकता विकून चार-चव्वल कमवू पाहणारे चित्रपट' हा समज जितका संकुचित, तितकाच हाही. या माध्यमातही अनेक उत्तम आशयघन चित्रपट आणि लघुपट निर्माण केले जात आहेत. अनेक सकस, आशयघन आणि गंभीर विषयांवरील चित्रपटही यात समाविष्ट आहेत. ’ग्रेव्ह ऑफ द फायरफ्लाईज’सारख्या विषण्ण करणार्या चित्रपटापासून ’रॅटटुई’ सारखी पंचतंत्राच्या कुळीतील मॉडर्न कथा सांगणारे चित्रपट याच माध्यमात त… पुढे वाचा »
शुक्रवार, २९ मे, २०२०
जीवनाचे पोर्ट्रेट
-
गंभीर चेहर्याच्या आणि कधीही न हसणार्या, मोजके बोलणार्या आणि चार चौघांपासून फटकून राहात आपले वेगळेपण जपणार्या माणसालाच जगण्याबद्दलचा गंभीर विचार करणे शक्य होते असा एक समज उगाचच आपल्या समाजात पसरलेला दिसतो. नाटकवाली मंडळी ही चित्रपटाला नि त्या संबंधित मंडळींपेक्षा स्वत:ला काकणभर (कदाचित हातभरही असेल) उंच समजतात, तर चित्रपटातून बाद झालेले अभिनेते/अभिनेत्रीच फक्त सीरियलमध्ये जातात, असं समजत चित्रपटवाले त्या क्षेत्रातील व्यक्तींना कमी लेखतात. एवढंच काय, इंटरनेट वरील चित्रपटांसंबंधी माहिती वाचून, स्वस्त झालेल्या कॅमेर्यांच्या सहाय्याने एक दोन थातुरमातुर शॉर्ट फिल्म्स बनवून, आपल्या प्रभावळीत त्या चार जणांना दाखवून ’अहो रूपम् अहो ध्वनिम्’ या न्यायाने रेकग्निशन मिळवणारी, आणि तेवढ्या भांडवलावर वरील तीनही गटांना ’तद्दन व्यावसायिक’ म्हणून … पुढे वाचा »
बुधवार, २७ मे, २०२०
हैरत से तक रहा था जहॉं-ए-वफा उसे (मास्टर मदन)
-
Yun Naa Rah Rah Ke Hame Tarsaiye Singer: Master Madan (1935) Lyrics: Sagar Nizami. अगदी बालवयातच तत्कालीन अनेक गायकांची रेकॉर्डिंग्स तंतोतंत गाणार्या कुमार गंधर्वांचे Child Prodigy म्हणून कौतुक केले जात असे. ते आठ वर्षांचे असताना त्यांनी गायलेल्या ’रामकली’च्या रेकॉर्डने मला बेभान केले होते. खुद्द कुमारांनी प्रा. माधव मोहोळकर यांना दिलेल्या मुलाखतीत असे म्हटले आहे की, 'ती सारी पोपटपंची होती. इतरांची गायकी तंतोतंत गाणे म्हणजे गाणे नव्हे. गायकाची वाट स्वत:ची असायला हवी.' पुढे संगीत क्षेत्रात त्यांनी केलेली बंडखोरी आणि गायकीला दिलेली नवी वाट सर्वश्रुत आहेच. पण कुमारांच्याही आधी आठ वर्षांच्या एका मुलाने ही उपाधी मिळवली होती. त्याने उत्तर भारत… पुढे वाचा »
शनिवार, २३ मे, २०२०
माय लिटल् डम्पलिंग
-
काही दशकांपूर्वी ’२००१ अ स्पेस ओडिसी’ म्हणून चित्रपट येऊन गेला. त्यातील सुरुवातीच्या एका प्रसंगामध्ये मानवी उत्क्रांतीच्या आद्यकाळातील एक चिंपांझी नुकतेच हत्याराप्रमाणे वापरण्यास शिकलेले एक हाड विजयोन्मादाने हवेत उंच भिरकावतो; ते इतके उंच जाते की थेट अंतराळात पोहोचते आणि हळूहळू एका अंतराळयानात परिवर्तित होते. मानवी प्रगतीची झेप दहा सेकंदाहून कमी अवधीत दाखवणारा तो प्रसंग चित्रपट इतिहासातील एक संस्मरणीय मानला जातो, त्याला चित्रपट इतिहासातील ’सर्वात दीर्घ जम्प-कट’ असे म्हटले जाते. २०१८ मध्ये आलेल्या जेमतेम तीन मिनिटांच्या ’बाओ’ या चलच्चित्रपटाने मातृत्वाचा प्रवास असाच मर्यादित अवधीमध्ये बसवून दाखवला आहे. या लघुपटाला भक्कम सांस्कृतिक संदर्भ आहे. तो वगळून तो पाहाणे शक्य नाही. विशेष म्हणजे या लघुपटाला शाब्दिक भाषेची जोड नाही. तो संपूर्ण दृश्… पुढे वाचा »
Labels:
अक्षरनामा,
चलच्चित्र,
दृक्-श्राव्य,
बाओ,
लघुपट
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)