-
रक्ताने किंवा कायद्याने बांधलेली नातीच फक्त प्रेमाची धनी नसतात. प्रेमाच्या अनेक छटा आसपास विखुरलेल्या दिसतात. नैसर्गिक प्रेरणेला विसरुन, एखाद्या हरणाच्या पाडसाला दत्तक घेणार्या सिंहिणीचा वीडिओ मी पाहतो, तेव्हा त्या नात्याच्या अगम्यतेने स्तिमित होत असतो. थेट भिन्नवंशीय प्राण्यांतील हे प्रेम दूरचे राहिले, पण माणसानेच कृत्रिमरित्या निर्माण केलेल्या गटांच्या भिंती भेदून जाणारे प्रेम, स्नेह, बंध, आत्मीयता, हे देखील हिंसेइतकेच, लैंगिकतेइतकेच आदिम आहेत . पण आजच्या स्वयंघोषित वास्तववादी साहित्यिकांच्या खिजगणतीतही ते नसतात. आदिम प्रेरणा नि जाणीवा म्हणत सदैव हिंसेचा, लैंगिकतेचाच वेध घेणे हीच प्रागतिक साहित्याची खूण का मानली जाऊ लागली आहे, हा प्रश्न मला वारंवार पडत असतो. … पुढे वाचा »
RamataramMarquee
रविवार, १३ डिसेंबर, २०२०
वेचताना... : अडीच अक्षरांची गोष्ट
शनिवार, १२ डिसेंबर, २०२०
रावी के दो किनारे
-
सचिन कुंडलकर यांचा 'गंध' पाहात होतो. त्यात मिलिंद सोमणने 'रावी के उस पार...' चे एक जेमतेम एक कडवे म्हटले आहे. त्यातल्या रावीऽऽऽ वरची ती मींड काळजावर घाव घालून गेली. दुसर्यांदा ऐकताना बेट्याने काय कमाल केली आहे असे वाटून गेले. Raavi Ke Uspaar Sajanva Film: Gandha (2009). वाटलं हा केवळ सर्वसाधारण अभिनेता असलेला माणूस ही जागा अशी वेधक घेऊ शकतो, तर मूळ गाण्यात काय बहार येत असेल. मग मूळ गाणे शोधायला गेलो. पत्ता लागला मूळ गाणे रावी के 'इस' पार आहे, 'उस'पार नव्हे! याची गायिका उमराव ज़िया बेगम पाकिस्तानी आहे हे ध्यानात घेतले तर हा भेद समजून जातो. (कुंडलकरांनी हा बदल हेतुत: केला असावा का?) … पुढे वाचा »
रविवार, ८ नोव्हेंबर, २०२०
वेचताना... : सुंदर मी होणार
-
पुल्देसपांड्यांना बहुतेक मराठी माणसे 'हशिवनारा बाबा' म्हणून ओळखतात, आमच्यासारखा एखादा त्यांना बोरकर-मर्ढेकरांच्या कविता जिवंत करणारा रसिक म्हणून ओळखतो. आपल्या आसपास बाकीबाब-आरती प्रभू-मर्ढेकर यांसारखे कवी आणि भीमण्णा-मन्सूरअण्णा-कुमार गंधर्व आणि प्रिय मित्र वश्या देशपांडे ऊर्फ वसंतखाँ अशा व्यक्ती आणि वल्लींना जमा करून आयुष्याचा काव्यशास्त्रविनोदाचा महोत्सव जगणारा अवलिया म्हणून ओळखतो. कुणी त्यांना आणीबाणीच्या काळातला साहित्यिकांचा एक आवाज म्हणून ओळखतो, परंतु त्या तुलनेत त्यांना नाटककार म्हणून तितकेसे ओळखले जात नाही. खरे तर हे अनाकलनीय आहे. कदाचित याचे एक कारण म्हणजे त्यांची बहुतेक नाटके ही अनुवादित वा रूपांतरित आहेत हे असू शकते. 'इन्स्पेक्टर जनरल' वरून अंमलदार, ’थ्री पेनी ऑपेरा&… पुढे वाचा »
सोमवार, १२ ऑक्टोबर, २०२०
काळात सांग काळात, काय ते झाले
-
’द बिग बॅंग थिअरी’ ही अतिशय गाजलेली आणि नुकतीच संपलेली विनोदी मालिका. यातील विज्ञानाचे चार पदवीधर अधून मधून तंत्रज्ञान वा विज्ञान याबाबत काही साधकबाधक, काही उद्बोधक चर्चा करत असतात. अशाच एक चर्चेदरम्यान कालप्रवासाच्या संदर्भात निर्माण झालेला हा भाषिक अथवा व्याकरणविषयक प्रश्न. English grammar in time travel Serial: The Big Bang Theory Episode: The Focus Attenuation (2014). Howard : Something doesn't make sense. Look... In 2015, Biff steals the sports almanac and takes the time machine back to 1955, to give it to his younger self. But as soon as he does that, he changes the future, so the 2015 he returns to would be a "differen… पुढे वाचा »
Labels:
कालप्रवास,
द बिग बॅंग थिअरी,
दृक्-श्राव्य,
मालिका,
वेचित,
व्याकरण
शनिवार, ३ ऑक्टोबर, २०२०
दाद द्या अन् शुद्ध व्हा
-
...आणि तो आला. सार्या प्रेक्षागृहाच्या नजरा त्याच्याकडे वळल्या. 'अरेच्या, हाच का तो?' असा प्रश्न मनात उमटतो. कारण 'तो' शिडशिडीत, अंगातून वीज सळसळत असावी तसा चपळ, डोक्यावर गोल हॅट, पार्श्वभागापर्यंत लो़ळत गेलेला बटलर कोट, आडमाप ढगळ पँट, डोळ्यात सदाहरित चौकस नि मिश्किल नजर आणि उजव्या हातात या सार्यांना आपल्या तालावर नाचवणारी एक ओल्ड मॅन्स स्टिक. हा वृद्ध पण तरीही हातात काठी नाही, अंगाने भरलेला, नेमक्या मापाचे कपडे, बो-टाय... हाच काय तो? त्याला ती क्षणभराची शांतता देखील असह्य होते, आज वयामुळे शारीरिक हालचाली तर मंद झाल्या आहेत. इतक्यात ती मानेची चिरपरिचित हालचाल होते नि गर्दीची खात्री पटते.... अरे हाच की तो. क्षणार्धात सारे सभागृह हर्षातिरेकाने उठून उभे राहते. त्याला नकोशा वाटलेल्या शांततेला मागे सारून टाळ्यांचा कल्लो… पुढे वाचा »
Labels:
ऑस्कर,
चार्ली चॅप्लिन,
दृक्-श्राव्य,
प्रासंगिक,
लघुपट,
वेचित
गुरुवार, १७ सप्टेंबर, २०२०
वेचताना... : सौरभ - १
-
चित्रपटाचा अवतार झाल्यानंतर, विशेषत: समाजमाध्यमांचा सुळसुळाट आणि मोबाईल क्रांतीनंतर डेटा स्वस्त झाल्यापासून, चित्रपटांबद्दल चारचौघात गप्पा मारताना केलेली शेरेबाजी, वैयक्तिक आवडनिवड ही ’परीक्षण’ म्हणून अवतरु लागली आहे. त्याचवेळी मुद्रित माध्यमांतून येणारी परीक्षणे बव्हंशी 'मोले घातले लिहाया’ प्रकारची असतात आणि त्याच्या शेवटी दिलेले रेटिंग पाहण्यापुरतीच चाळली जाऊ लागल आहेत. दृश्य माध्यमांचा असा परिस्फोट झाल्यानंतर आता शब्दांना माघार घ्यावी लागत आहे. मुद्रित माध्यमांच्या इंटरनेट अवतारात तर आता काही रोजच्या जगण्यातील काही विषयांच्या स्तंभातून तर ’नाव छापून येते’ या एकमेव आनंदासाठी महाविद्यालयीन विद्यार्थी/विद्यार्थिनींकडून ’जागाभरती’ केली जाते आहे. त्यामुळे अर्थातच सुमारांची सद्दी निर्माण झा… पुढे वाचा »
क्रूरा मी वंदिले
-
नवा पुरावा तपासल्यावर बुलक याना असे आढळले की, हिटलर हा केवळ सत्तेच्या अनावर लालसेने प्रवृत्त झाला असे जे मत आपण व्यक्त के होते ते पूर्णतः बरोबर नाही. तो ठराविक विचारसरणीने प्रेरित झाला होता. ही त्याची विचारसरणी त्याच्या माइन काम्फ या ग्रंथात प्रगट झाली होती आणि त्याच्या संभाषणांचा संग्रहही ती प्रगट करत होता. ही विचारसरणी वंशवादी होती आणि जर्मन जनतेला त्याने तिच्या जोरावर भारून टाकले. पण हे जर्मनीत कसे शक्य झाले याचेही उत्तर दिले पाहिजे. यामुळे बुलक यांनी आपल्या ग्रंथाची फेररचना केली. परंतु त्याचा मूळ गाभा बदलण्याची गरज नसल्यामुळे त्यांनी तो तसाच ठेवला. बुलक यांच्या ग्रंथास चाळीस वर्षे पूर्ण झाली तेव्हापर्यंत त्याच्या तीस लाख प्रती खपल्या होत्या. त्यानंतर आणखी वाढ झाली असेल. या ग्रंथामुळे बुलक यांचा जगभर नावलौकिक झाला आणि जे ऑक्सफर्ड विद्या… पुढे वाचा »
बुधवार, ५ ऑगस्ट, २०२०
एव्हरिबडी लव्ज आँट सेरिना
-
’एव्हरीबडी लव्ज रेमंड’ ही तशी जुनी मालिका, कौटुंबिक प्रवासातील घटना नि संबंधांमधील विनोदाचा हात धरुन चालणारी. सदैव सहानुभूतीच्या शोधात असलेला 'ममाज बॉय' रेमंड; त्याचा फायदा घेऊन (किंवा त्याला कारण असणारी) त्याला सदैव पदराआड राखू पाहणारी, सून ही नेहेमीच घरकामाच्या बाबत नालायक असते असा ठाम समज असलेली - जवळजवळ भारतीय सासू म्हणावी अशी त्याची भोचक आई मेरी; बाप म्हणून आपल्या कर्तव्याबाबत बव्हंशी उदासीन असणारे, मुलगा-सून-बायको या त्रिकोणात बहुधा बेफिकीर असणारे, आणि खाण्यात व भूतकाळात जगणारे रेमंडचे वडील फ्रँक, आणि संसार हेच जीवितकार्य म्हणून मुलाबाळात रमलेली, नवरा आईच्या मुठीत असल्याने हताशपणे सहन करणारी रेमंडची पत्नी डेब्रा... हे कुटुंब मला बव्हंशी आपल्या भारतीय कुटुंबाचे प्रतिनिधीच वाटत आले आहे. अगदी 'पीपल नेक्स्ट डोअर' व… पुढे वाचा »
Labels:
एव्हरिबडी लव्ज रेमंड,
दृक्-श्राव्य,
मालिका,
वेचित
मंगळवार, १४ जुलै, २०२०
लॉजिकस्तत्र दुर्लभ:
-
हा एक लहानसा संवाद ’ब्लॅक अॅडर’ नावाच्या एका बर्याच जुन्या मालिकेतला. मि. बीन म्हणून लोकप्रिय झालेला रोवान अटकिन्सन प्रमुख भूमिकेत होता. मला स्वत:ला हा नट फारसा आवडत नाही आणि मालिकाही फारशी आवडली नाही. पण ही मालिका ’अल्टरनेटिव्ह हिस्टरी’ अर्थात समांतर इतिहास या साहित्यिक प्रकारात मोडणारी आहे. ’असे न होता, तसे झाले असते तर’ प्रकारची. अशा स्वरूपाचे लेखन बहुधा पर्यायी जगाचा वेध घेणारे असते, गंभीर असते. पण ही मालिका त्याला विनोदी अंगाने सादर करते. हा कदाचित असा पहिलाच प्रयत्न असावा. प्राचीन इंग्रजीमध्ये अॅडर म्हणजे साप. पण हा ब्लॅक अॅडर नेमका उलट प्रकारचा आहे, शेळपट आहे. राजाचा मुलगा असून त्याला कुणी खिजगणतीत धरत नाही. कधी समोर आला तर खुद्द त्याचा बाप त्याला ओळखत नाही. ’हा तुझा मुलगा’ अशी ओळख दिल्यावरच त्याला ते लक्षात येते. तो याचे ना… पुढे वाचा »
सोमवार, ६ जुलै, २०२०
गाणारं व्हायलिन
-
मी पाश्चात्त्य संगीताचा फारसा भोक्ता नाही. त्यात त्यांचे वाद्यसंगीत सर्वस्वी वेगळ्या वळणाचे. त्यांचे क्लासिकल म्हणवले जाणारे संगीत सिंफनीच्या मार्गाने जाते, ज्यात अनावश्यक गलबला असतो नि मला पुरेसे तंद्री लावून ते ऐकणे शक्य होत नाही. सुरांच्या लडी, आवर्तने उलगडत श्रोत्याला कवेत घेत जाणारे गाणे ऐकण्याची सवय असलेल्या मला, सदोदित गाण्याचा टेम्पोशी खेळ करत आघातांच्या सहाय्याने ’Awe, Wow’ प्रतिक्रिया वसूल करु पाहणारे ते गाणे रुचत नाही. ’सुंदर मी होणार’ मधला सुरेश म्हणतो तसे आपल्याला ’सुरांचे पांघरुण घेऊन गुपचून पडून राहावेसे वाटते’. पण हे लेकाचे अध्येमध्ये अलेग्रो का काय म्हणतात त्याचे दणके देऊन त्या तंद्रीतून बाहेर खेचून काढू पाहतात असा माझा अनुभव आहे. भारतीय वाद्यसंगीताच्या बाबतही मी तसा गायकी अंगाच्या वाद्यवादनाचा चाहता आहे. आपल्याकडे जे … पुढे वाचा »
Labels:
कव्हर आर्टिस्ट,
कारोलिना प्रोत्सेंको,
दृक्-श्राव्य,
वेचित,
संगीत
बुधवार, १ जुलै, २०२०
समीक्षकाचे स्वगत
-
थोडक्या पैशात चालवली जात असल्याने ’फुकट लिहिणार्यास प्राधान्य’ अशी पाटी लावून बसलेली पोर्टल्स तसंच वृत्तपत्रे, आणि फेसबुकसारखी समाजमाध्यमे यांच्या कृपेने चित्रपटांच्या समीक्षकांचे हल्ली भरघोस पीक आले आहे. चित्रपटाची कथा आपल्या शब्दांत सांगून, त्याला दिग्दर्शक, प्रमुख अभिनेत्यांच्या meta-data म्हणजे पूर्व-माहितीची जोड देऊन समीक्षक म्हणून मिरवणारे बरेच दिसू लागले आहेत. सोबत ’मीच पयला’ची अहमहमिका चालवणारे आणि ’बकवास आहे. पैसे फुकट घालवून नका’चे सल्ले न मागता देणारेही उगवले आहेत. ’मसान’सारख्या नितांतसुंदर चित्रपटाबद्दलही असला सल्ला वाचला होता. त्यावर मी तपशीलाने लिहिल्यावर ’आम्ही खरंच या दृष्टीने पाहिले नव्हते. आता पुन्हा पाहू.’ म्हणून कबुली देणारे एक-दोघे निघाले, नि लिहिल्याचे सार्थक झाले असे वाटून गेले. पण अशी खुल्या मनाने विचार करणा… पुढे वाचा »
बुधवार, २४ जून, २०२०
पोर पोशिंदा जाह्लं
-
दृश्य माध्यमांमध्ये चलच्चित्रांचे अर्थात Animationचे माध्यम हे प्रामुख्याने लहान मुलांच्या करमणुकीसाठी आहे असा एक व्यापक गैरसमज आहे. सतत करमणूकप्रधान, ’विचार करायला लावू नका ब्वा’ म्हणत उथळ करमणुकीच्या शोधात असणार्यांना तेवढी एकच बाजू दिसते यात आश्चर्य नाही. 'परदेशी चित्रपट म्हणजे केवळ हॉलिवूड, आणि हॉलिवूड म्हणजे कृतक-हिरोंचे अशक्य, अतर्क्य कारनामे दाखवणारे किंवा भीती वा लैंगिकता विकून चार-चव्वल कमवू पाहणारे चित्रपट' हा समज जितका संकुचित, तितकाच हाही. या माध्यमातही अनेक उत्तम आशयघन चित्रपट आणि लघुपट निर्माण केले जात आहेत. अनेक सकस, आशयघन आणि गंभीर विषयांवरील चित्रपटही यात समाविष्ट आहेत. ’ग्रेव्ह ऑफ द फायरफ्लाईज’सारख्या विषण्ण करणार्या चित्रपटापासून ’रॅटटुई’ सारखी पंचतंत्राच्या कुळीतील मॉडर्न कथा सांगणारे चित्रपट याच माध्यमात त… पुढे वाचा »
शुक्रवार, २९ मे, २०२०
जीवनाचे पोर्ट्रेट
-
गंभीर चेहर्याच्या आणि कधीही न हसणार्या, मोजके बोलणार्या आणि चार चौघांपासून फटकून राहात आपले वेगळेपण जपणार्या माणसालाच जगण्याबद्दलचा गंभीर विचार करणे शक्य होते असा एक समज उगाचच आपल्या समाजात पसरलेला दिसतो. नाटकवाली मंडळी ही चित्रपटाला नि त्या संबंधित मंडळींपेक्षा स्वत:ला काकणभर (कदाचित हातभरही असेल) उंच समजतात, तर चित्रपटातून बाद झालेले अभिनेते/अभिनेत्रीच फक्त सीरियलमध्ये जातात, असं समजत चित्रपटवाले त्या क्षेत्रातील व्यक्तींना कमी लेखतात. एवढंच काय, इंटरनेट वरील चित्रपटांसंबंधी माहिती वाचून, स्वस्त झालेल्या कॅमेर्यांच्या सहाय्याने एक दोन थातुरमातुर शॉर्ट फिल्म्स बनवून, आपल्या प्रभावळीत त्या चार जणांना दाखवून ’अहो रूपम् अहो ध्वनिम्’ या न्यायाने रेकग्निशन मिळवणारी, आणि तेवढ्या भांडवलावर वरील तीनही गटांना ’तद्दन व्यावसायिक’ म्हणून … पुढे वाचा »
बुधवार, २७ मे, २०२०
हैरत से तक रहा था जहॉं-ए-वफा उसे (मास्टर मदन)
-
Yun Naa Rah Rah Ke Hame Tarsaiye Singer: Master Madan (1935) Lyrics: Sagar Nizami. अगदी बालवयातच तत्कालीन अनेक गायकांची रेकॉर्डिंग्स तंतोतंत गाणार्या कुमार गंधर्वांचे Child Prodigy म्हणून कौतुक केले जात असे. ते आठ वर्षांचे असताना त्यांनी गायलेल्या ’रामकली’च्या रेकॉर्डने मला बेभान केले होते. खुद्द कुमारांनी प्रा. माधव मोहोळकर यांना दिलेल्या मुलाखतीत असे म्हटले आहे की, 'ती सारी पोपटपंची होती. इतरांची गायकी तंतोतंत गाणे म्हणजे गाणे नव्हे. गायकाची वाट स्वत:ची असायला हवी.' पुढे संगीत क्षेत्रात त्यांनी केलेली बंडखोरी आणि गायकीला दिलेली नवी वाट सर्वश्रुत आहेच. पण कुमारांच्याही आधी आठ वर्षांच्या एका मुलाने ही उपाधी मिळवली होती. त्याने उत्तर भारत… पुढे वाचा »
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)