RamataramMarquee

सूची: अनुक्रमे  ▶ वेचे  ▶ वेचताना  ▶ दृक-श्राव्य  ▶
खेळ लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
खेळ लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, २७ फेब्रुवारी, २०२१

बुद्धिबळातील ‘मार्शल’ आर्ट


  • चित्रातील बुद्धिबळाच्या पटाकडे पाहिल्यावर बहुतेकांच्या मनात चित्रात दाखवलेल्या माणसाप्रमाणेच 'हा काळी मोहरी असलेला येडाय काय?' असा भाव प्रथमदर्शनी उमटेल. आपला वजीर नि हत्ती दोघेही खुशाल पांढर्‍याच्या प्याद्यांसमोर नि वजीराच्या पट्ट्यात आणून काय आत्महत्या करायची आहे का असा समज होईल.पण गंमत पहा. हा डाव काळ्याचाच आहे! कसा ते पाहू. पण त्याआधी खेळ्या समजण्यासाठी संदर्भ म्हणून बुद्धिबळाचा हा रिकामा पट समोर राहू द्या. यातून पटावरील चौकोन-स्थानांच्या नामकरणाची पद्धत लक्षात येईल. उदा. खालील पटावर निळ्या रंगाच्या बॉर्डरने रंगवलेला चौकोन हा F स्तंभातील (column) तिसर्‍या ओळीत असल्याने त्याचा उल्लेख F-3 असा केला जातो. १. आता काळ्याची खेळी असेल, तर वजिराने H-2 मधील प्यादे मारले की डाव संपतो. एक पर्याय म्हणजे घोडा F-3 मधे आणला की तरी एका खेळीनंतर डाव संपतो. पांढर्‍याचे G-2 प्याद्याच्या पाठीमागे राजा असल्याने अडकलेला आहे. तो फक्त H-1 मधे जाऊ शकतो. पण काळ्याने हत्ती अथवा वजिराने H-2 प्याद...

    पुढे वाचा »