RamataramMarquee

Indexes Menu_Desktop

संपूर्ण सूची :

सोमवार, ३ एप्रिल, २०२३

वेचताना... : डोह


  • ( माणसाच्या जगण्याच्या विविध पैलूंमध्ये दिसणारी उत्क्रांती अथवा क्रांती यांची नोंद घेणारा एक स्तंभ लिहितो आहे. यापूर्वीही या ना त्या संदर्भात माणसाच्या टोळीजीवी अथवा जंगलजीवी ते नागरजीवी या स्थित्यंतराचा मागोवा घेत आलो आहे.त्याला समांतर ’बखर बिम्मची’ या जी. ए. कुलकर्णींच्या पुस्तकावरही एक मालिका लिहितो आहे. हे दोनही चालू असताना या दोन्हींला सांधणारे असे एक जुने पुस्तक पुन्हा एकवार समोर आले आणि त्या अनुषंगाने त्या दोन्ही लेखनांच्या दृष्टिकोनांची सरमिसळ होऊन तयार झालेला हा लेख. ) जंगलजीवींच्या तुलनेत नागर माणसाचे मूलभूत गरजांशी निगडित संघर्ष बरेच कमी झाले आहेत. जंगलजीवींना अन्न, पाणी नि निवारा या मूलभूत गरजांसाठी सजातीयांशी, अन्य सजीवांशी, निसर्गाशी सर्वांशीच संघर्ष करावा लागत असे. नागर मान… पुढे वाचा »

शनिवार, १ एप्रिल, २०२३

रात्रपाळीचे शेजारी


  • ...उंबरातली काळी सोनेरी पाखरे खाल्याने डोळे येत. सुजत. आणि दिवसाही उघडता येत नसत. मग आई मला हलके धरून मोरीपाशी घेऊन येई. ऊनसर पाणी पापण्यांच्या कडांना लावून त्या भिजवी. त्या न दुखवता सोडवून, दिसायला लागेल असे करी. पण डोळे आल्यावरचे थोरल्या आईचे औषध विलक्षणच होते. दोनदोन दिवस ती अंधारातच बसायला लावी. ऐकले नाही तर डोळ्यात फूल पडून दिसणार नाही, असा धाक दाखवी. नि रात्रीही कंदिलाऐवजी करंजेलाचे थंड दिवे लावून घरात जेवणे होत. दिवसाच्या अंधारात बसून राहायचे माझे एकाकीपण हलके व्हावे म्हणून आई, " माझे वाघळ काय करते आहे" असे सौम्य हसत मला विचारी. आणि वडाला टांगून घेणाऱ्या वाघळांसारखे आपलेही एक वाघळ झाले आहे असे वाटून माझी भीती उलट मोठी होत जाई. डोळे आल्याचे दुःख वाघळे नेहमी कसे सोसत असतील, समजत नसे. पण वाघळांचा दिवस रात्री उगवतो असे आ… पुढे वाचा »

सोमवार, २७ फेब्रुवारी, २०२३

सापळा


  • बाहेर रखरखीत ऊन होते, पण या दाट कोंडलेल्या अंधारात कोठे प्रकाशाचा कण नव्हता. हात पुढे करून चाचपडत प्रवासी थोडा पुढे सरकला, पण पायाखालची जमीन काचेची असल्याप्रमाणे निःशब्द, विलक्षण गुळगुळीत भासताच त्याच्या मनात भीती निर्माण झाली व तेथूनच मागे वळून निसटावे, असे त्याला वाटले. पण तेवढ्यात अनेक ठिकाणी तेजस्वी प्रकाशाचे पंखे उमटले, आणि त्या प्रकाशात भोवती पाहाताच विलक्षण भयाने त्याच्या अंगातील शक्तीच ओसरून गेली. भोवती इंद्रजाल निर्माण झाल्याप्रमाणे त्याच्याच सहस्र आकृती उमटल्या. त्याने बावरून डोळ्यांवर बोटे धरताच कानाकोपऱ्यात अनंत हालचाली झाल्या व प्रकट झालेल्या आकृत्यांनी निरनिराळ्या तर्‍हांनी बोटे उचलली. कारण भोवती सर्वत्र निरनिराळ्या कोनांत बसवलेले, छतापर्यंत पोहोचलेले भव्य आरसे होते. सर्वत्र प्रकाश होता, पण तो नेमका कोठून येत आहे हे समजत नव्ह… पुढे वाचा »

रविवार, १९ फेब्रुवारी, २०२३

माकडिणीची कथा


  • नेमकी आजच मोलकरीण आली नव्हती, आणि घरातील सगळीच पिठे संपून बसली होती. म्हणून आईला गिरणीकडे तीन चार फेऱ्या कराव्या लागल्या. त्यात भर म्हणजे गल्लीतील सगळ्याच मोलकरणी गैरहजर असल्याप्रमाणे गिरणीत आज खूपच गर्दी होती, व तेथे ताटकळत राहून तिचे गुडघे मेणाचे झाले होते. मग घरी मुलांची जेवणे झाली, ती नेहमीप्रमाणे अगदी साग्रसंगीत झाली. बिम्मने पाण्याचा तांब्या टेबलावर लवंडला. बब्बीला आमटीच्या वाटीत शेवग्याच्या शेंगेचा एकच तुकडा आला होता तर बिम्मच्या वाटीत दोन तुकडे अगदी स्पष्ट दिसत होते. त्यांनी वाटीची ओढाताण केली, तेव्हा दोघांच्याही कपड्यांवर आमटी सांडली. आपापली ताटे उचलून ती मोरीत ठेवण्यासाठी जात असता बिम्मचे ताट वाटेतच खाली पडले. अखेर जेवणे संपली व मुले झोपायला वर गेली. तिने एक सुस्कारा सोडला असेल नसेल, तेव्हा गेट वाजले, व दारावरची घटा झणझणली. कपाळा… पुढे वाचा »

शनिवार, १ ऑक्टोबर, २०२२

वेचताना... : जेरुसलेम, एक चरित्रकथा


  • 'ऋषीचं कूळ आणि नदीचं मूळ शोधू नये' अशी आपल्याकडे एक म्हण आहे. तरीही माणसं आपला इतिहास धुंडाळतात, हजारो वर्षांपूर्वीच्या कुण्या श्रेष्ठ व्यक्तीशी आपले नाते जोडून त्याला आपल्या वर्तमानातल्या अस्तित्वाचा आधार बनवू पाहतात. अनेक वर्षांच्या परंपरा असलेला समाज यात आपल्या अस्मितांची स्थानेही शोधत असतो. ज्यू, ख्रिश्चन आणि इस्लाम या तीन 'बिब्लिकल' धर्मांचे आणि त्यांच्या असंख्य पंथोपपंथांचे श्रद्धास्थान असलेल्या 'जेरुसलेम' नगरीला या सार्‍या परंपरांमधे अनन्यसाधारण महत्त्व आहे. एकाच नगरीचे अस्तित्व आणि महत्त्व इतका दीर्घकाळ टिकून राहिल्याचे दुसरे उदाहरण इतिहासात नाही. त्यामुळे जेरुसलेमचा इतिहास हा श्रद्धाळूंच्या दृष्टीने जितका महत्त्वाचा तितकाच अभ्यासकांच्या दृष्टीनेही. पण जिथे श्रद्धांचा प्रश्न असतो तिथे त्या अभ्यासात वस्तुनि… पुढे वाचा »

गुरुवार, २९ सप्टेंबर, २०२२

जेरुसलेम: सौंदर्यवती आणि वेश्या


  • इसवी सन पूर्व ८४१मध्ये जेझबेलची कन्या राणी अथालीया हिने जेरुसलेमची सत्ता काबीज केली. तिने डेव्हिड कुळातल्या सर्व राजकुमारांना ( तिच्या स्वतःच्या नातवंडांना) ठार मारून टाकलं. फक्त जेहोआश नावाच्या एकाच बाल राजकुमाराला तिच्या तावडीतून वाचवलं गेलं. ’बुक ऑफ किंग्ज द्वितीय’ या पुस्तकातून आणि उत्खननात सापडलेल्या नव्या पुराव्यांतून आपल्याला जेरुसलेममधल्या तेव्हाच्या जीवनाची थोडीशी कल्पना येते. ते छोटंसं बाळ मंदिराच्या परिसरात दडवून ठेवलेलं होतं. त्याच वेळी वंशाने अर्धी फिनिशियन आणि अर्धी इस्राइली असलेली ही जेझबेल-कन्या स्वतःच्या राजधानीत बाल नावाच्या देवतेची आराधना करण्यात आणि वेगवेगळ्या देशांबरोबर व्यापार करण्यात गर्क झाली होती. जेरुसलेममध्ये जेमतेम इंचभर लांबीचं, हस्तिदंती डाळिंबावर बसलेलं एक सुंदर ह… पुढे वाचा »

मंगळवार, १३ सप्टेंबर, २०२२

पांढरपेशांच्या Quicksand Pit ची गोष्ट


  • काही वर्षांपूर्वी 'चाहूल' नावाचे एक नाटक आले होते. साहेबाने प्रमोशनच्या बदल्यात बायकोला आपल्याकडे पाठवण्याचा प्रस्ताव दिलेला आहे. प्रथम संताप, हताशा, नंतर स्वार्थलोलुप शरणागती या मार्गाने पतीची झालेली अधोगती आणि त्याच्या स्वार्थात मिसळलेला स्वार्थ जाणून पत्नीचीही त्या प्रस्तावाकडे होत जाणारी वाटचाल असा काहीसा प्रवास त्यात उलगडत जातो. अलिकडेच 'रेगे' नावाचा एक मराठी चित्रपट आला होता. सुखवस्तू मध्यमवर्गीय अथवा उच्च-मध्यमवर्गीय घरातील दुबळ्या मनाच्या व्यक्तींना - विशेषत: तरुणांना - बाहुबलाचे असणारे आकर्षण (एक प्रकारचा स्टॉकहोम सिंड्रोम), त्या बाहुबलाने आपल्या अडचणी चुटकीसरशी सुटल्याने त्यावर बसलेली श्रद्धा आणि त्याची किंमत म्हणून त्या जाळ्यात कोळ्याच्या भक्ष्यासारखे फसत जाणॆ सुरेख मांडले होते. कोळ्याच्या जाळ्यात अडकलेल्यासमोर… पुढे वाचा »

गुरुवार, १ सप्टेंबर, २०२२

जागी झालेली मुले


  • काही वर्षांपूर्वी जीएंचे ’बखर बिम्म’ची वाचत असताना अचानक असं लक्षात की ’हां. हा एक माणूस काल्पनिका, परीकथा, पालक किंवा लाडू खाऊन ढिश्शुम करणारे हीरो वगैरे निव्वळ कल्पनासंचाराच्या पलिकडे जाऊन बिम्मच्या वास्तव-कल्पनेच्या तीरावरच्या जगाला भिडू पाहतो आहे. त्याला बिम्म समजला असेल, तर कदाचित त्याच्यामार्फत आपल्यालाही समजेल. मग एखाद्या बिम्म वा बब्बीचे म्हणणे मला अधिक नेमकेपणाने समजून घेता येईल.’ पण हाती येतो येतो आहे म्हणत असताना बिम्म निसटला नि गेली सात-आठ वर्षे कुठे तरी दडून बसला आहे. बिम्मची काल पुन्हा आठवण झाली. याचे कारण म्हणजे बिम्मसारख्याच कुण्या एका बब्बीचा फोटो मिळाला. बिम्मला आपली भाषा सापडली होती, हिला आपली अभिव्यक्तीही सापडली असावी असे वाटू लागले. बिम्मची भाषा त्याच्या आईला समजत असली, तरी त्यातील अभिव्यक्तीबाबत ती सर्वस्वी अज्ञ… पुढे वाचा »