-
अनेकता में एकता << मागील भाग मागील भागामध्ये शेअर केलेल्या ’अनेकता में एकता’, ’स्विम्मी’ आणि ’एकता का वृक्ष’ या तीनही चलच्चित्रपटांमध्ये एक समान धागा होता. एकजुटीचा, एकतेचा उद्घोष केला होता. यात एकत्र येणार्या व्यक्तिंना, पक्ष्यांना जोडणारा बाह्य धागा असा काही नव्हता. 'आपण सारे एक आहोत’ ही बांधिलकी मानणार्या सर्वांसाठी तो होता. एक प्रकारे ’मानव्याचे अंती एकच गोत्र’ हा अर्थ त्यातून ध्वनित होत होता. पण काळ पुढे सरकला तसे दूरदर्शनवर चलच्चित्रपट, लघुपट, माहितीपट अथवा देशोदेशीच्या प्रसिद्ध लेखकांच्या साहित्यावर आधारित कार्यक्रम पाहणारी पिढी मागे सरकली आणि हिंदी चित्रपटांच्या कृतक जगात रमणारी पिढी उदयाला आली. ज्याला बॉलिवूड असे म्हटले जाते त्या हिंदी फिल्म इंडस्ट्रीचा बोलबाला सुरू झाला. स्वातंत्र्यलढ्याच्या स्मृती मागच्या पिढीच्याही स्मरणातून धूसर होऊ लागल्या. साहित्यामध्ये खांडेकरी आदर्शवाद मागे सरकू लागला आणि फडकेंच्या गुलाबी कथांची सद्दी सुरू झाली. पुढे रणजित देसाई, शिवाजी सावंत यांनी पौराणिक/ऐतिहासिक कथानकावर आधारित कथनात्म साहित्याचा प्रवाह बळकट केला. हिंदी चित्रपट ...
पुढे वाचा »
RamataramMarquee
‘प्लरिबस’च्या निमित्ताने... - १४ : अंत:स्फोटाची अपरिहार्यता ‘प्लरिबस’च्या निमित्ताने... - १३ : गरजा, मागणी आणि पुरवठा ‘प्लरिबस’च्या निमित्ताने... - १२ : जठराग्नी शमवाया भूतां ‘प्लरिबस’च्या निमित्ताने... - ११ : अद्यतनीकरण (Update) ‘प्लरिबस’च्या निमित्ताने... - १० :नव्या व्यवस्थेकडे ‘प्लरिबस’च्या निमित्ताने... - ९ : सर्वे सुखिन: सन्तु (साम्यवादी व्यवस्था) ‘प्लरिबस’च्या निमित्ताने... - ८ : धर्म आणि सहजीवन
दूरदर्शन लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
दूरदर्शन लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
बुधवार, १७ ऑगस्ट, २०२२
राष्ट्रीय एकात्मता - २ : सारे भारतीय माझे बांधव आहेत
Labels:
कला,
दूरदर्शन,
दृक्-श्राव्य,
राष्ट्रीय एकात्मता,
संगीत,
संस्कृती-परंपरा,
समाज
सोमवार, १५ ऑगस्ट, २०२२
राष्ट्रीय एकात्मता - १ : अनेकता में एकता
-
"भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत..." अशी एक प्रतिज्ञा आमच्या शालेय क्रमिक पुस्तकांत पहिल्या पानांवर छापलेली असे, कदाचित अजूनही छापली जात असेल. ही प्रतिज्ञा प्रसिद्ध तेलुगु कवी पी. वेंकट सुब्बाराव यांनी लिहिलेली आहे. १९६२ मध्ये लिहिलेली ही प्रतिज्ञा १९६३ मध्ये विशाखापट्टणम् मधील एका शाळेत सामूहिकरित्या म्हटली गेली. त्यानंतर तिला अधिकृतरित्या राष्ट्रीय प्रतिज्ञेचा दर्जा देऊन सर्व शालेय पुस्तकांच्या सुरुवातीला छापण्यात येऊ लागले. भारत माझा देश आहे। सारे भारतीय माझे बांधव आहेत. माझ्या देशावर माझे प्रेम आहे. माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे. त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन. मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा आणि वडीलधार्या माणसांचा मान ठेवीन, आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन. माझा देश आणि माझे देशबांधव यांच्याशी निष्ठा राखण्याची मी प्रतिज्ञा करीत आहे. त्यांचे कल्याण आणि त्यांची समृद्धी ह्यांतच माझे सौख्य सामावले आहे. यातील ’सारे भारतीय माझे बांधव आहेत.’ या पहिल्...
पुढे वाचा »
Labels:
चलच्चित्र,
दूरदर्शन,
दृक्-श्राव्य,
राष्ट्रीय एकात्मता,
समाज
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)

