-
पुल्देसपांड्यांना बहुतेक मराठी माणसे 'हशिवनारा बाबा' म्हणून ओळखतात, आमच्यासारखा एखादा त्यांना बोरकर-मर्ढेकरांच्या कविता जिवंत करणारा रसिक म्हणून ओळखतो. आपल्या आसपास बाकीबाब-आरती प्रभू-मर्ढेकर यांसारखे कवी आणि भीमण्णा-मन्सूरअण्णा-कुमार गंधर्व आणि प्रिय मित्र वश्या देशपांडे ऊर्फ वसंतखाँ अशा व्यक्ती आणि वल्लींना जमा करून आयुष्याचा काव्यशास्त्रविनोदाचा महोत्सव जगणारा अवलिया म्हणून ओळखतो. कुणी त्यांना आणीबाणीच्या काळातला साहित्यिकांचा एक आवाज म्हणून ओळखतो, परंतु त्या तुलनेत त्यांना नाटककार म्हणून तितकेसे ओळखले जात नाही. खरे तर हे अनाकलनीय आहे. कदाचित याचे एक कारण म्हणजे त्यांची बहुतेक नाटके ही अनुवादित वा रूपांतरित आहेत हे असू शकते. 'इन्स्पेक्टर जनरल' वरून अंमलदार, ’थ्री पेनी ऑपेरा'वर बेतलेले 'तीन पैशाचा तमाशा', ’पिग्मॅलियन'चे अस्सले देशी रूप 'फुलराणी' यांसारखी नाटके गाजली. पण 'तुझे आहे तुजपाशी' सारखे स्वतंत्रपणे (अनुवादित नसलेले) नाटकही लोकांनी डोक्यावर घेतले गेले. ’एक झुंज वार्याशी’ तर नाट्यस्...
पुढे वाचा »
RamataramMarquee
‘प्लरिबस’च्या निमित्ताने... - १२ : जठराग्नी शमवाया भूतां ‘प्लरिबस’च्या निमित्ताने... - ११ : अद्यतनीकरण (Update) ‘प्लरिबस’च्या निमित्ताने... - १० : नव्या व्यवस्थेकडे ‘प्लरिबस’च्या निमित्ताने... - ९ : सर्वे सुखिन: सन्तु सण गेले विरुनी ‘प्लरिबस’च्या निमित्ताने... - ८ : धर्म आणि सहजीवन प्लरिबस’च्या निमित्ताने... - ७ : वैय्यक्तिक संपत्ती नि विषमता ‘प्लरिबस’च्या निमित्ताने... - ६ : समूह नव्हे व्यक्ती; गरज नव्हे संपत्ती
रविवार, ८ नोव्हेंबर, २०२०
वेचताना... : सुंदर मी होणार
सोमवार, १२ ऑक्टोबर, २०२०
काळात सांग काळात, काय ते झाले
-
’द बिग बॅंग थिअरी’ ही अतिशय गाजलेली आणि नुकतीच संपलेली विनोदी मालिका. यातील विज्ञानाचे चार पदवीधर अधून मधून तंत्रज्ञान वा विज्ञान याबाबत काही साधकबाधक, काही उद्बोधक चर्चा करत असतात. अशाच एक चर्चेदरम्यान कालप्रवासाच्या संदर्भात निर्माण झालेला हा भाषिक अथवा व्याकरणविषयक प्रश्न. English grammar in time travel Serial: The Big Bang Theory Episode: The Focus Attenuation (2014). Howard : Something doesn't make sense. Look... In 2015, Biff steals the sports almanac and takes the time machine back to 1955, to give it to his younger self. But as soon as he does that, he changes the future, so the 2015 he returns to would be a "different 2015", not the 2015 that Marty and Doc were in. Leonard : This is "Hot Tub Time Machine^" all over again. If future Biff goes back to 2015 right after he gives young Biff the almanac, he could get back to the 2015 with Marty and Do...
पुढे वाचा »
Labels:
कालप्रवास,
द बिग बॅंग थिअरी,
दृक्-श्राव्य,
मालिका,
व्याकरण
शनिवार, ३ ऑक्टोबर, २०२०
दाद द्या अन् शुद्ध व्हा
-
...आणि तो आला. सार्या प्रेक्षागृहाच्या नजरा त्याच्याकडे वळल्या. 'अरेच्या, हाच का तो?' असा प्रश्न मनात उमटतो. कारण 'तो' शिडशिडीत, अंगातून वीज सळसळत असावी तसा चपळ, डोक्यावर गोल हॅट, पार्श्वभागापर्यंत लो़ळत गेलेला बटलर कोट, आडमाप ढगळ पँट, डोळ्यात सदाहरित चौकस नि मिश्किल नजर आणि उजव्या हातात या सार्यांना आपल्या तालावर नाचवणारी एक ओल्ड मॅन्स स्टिक. हा वृद्ध पण तरीही हातात काठी नाही, अंगाने भरलेला, नेमक्या मापाचे कपडे, बो-टाय... हाच काय तो? त्याला ती क्षणभराची शांतता देखील असह्य होते, आज वयामुळे शारीरिक हालचाली तर मंद झाल्या आहेत. इतक्यात ती मानेची चिरपरिचित हालचाल होते नि गर्दीची खात्री पटते.... अरे हाच की तो. क्षणार्धात सारे सभागृह हर्षातिरेकाने उठून उभे राहते. त्याला नकोशा वाटलेल्या शांततेला मागे सारून टाळ्यांचा कल्लोळ उसळलाय. सारं सभागृह उत्स्फूर्तपणे उभे राहिले आहे. अधेमध्ये 'ब्रावो ब्रावो'चा उद्घोषही ऐकू येतोय. सावकाश पावले टाकीत तो पोडियम जवळ येतो तरी तो टाळ्यांचा गजर कमी होत नाही... त्याला आता बोलायचंय्... पण तरीही लोकांचा उन्मेष निवळलेला नाही... ...
पुढे वाचा »
Labels:
ऑस्कर,
कार्यक्रम,
चार्ली चॅप्लिन,
दृक्-श्राव्य,
प्रासंगिक
गुरुवार, १७ सप्टेंबर, २०२०
वेचताना... : सौरभ - १
-
चित्रपटाचा अवतार झाल्यानंतर, विशेषत: समाजमाध्यमांचा सुळसुळाट आणि मोबाईल क्रांतीनंतर डेटा स्वस्त झाल्यापासून, चित्रपटांबद्दल चारचौघात गप्पा मारताना केलेली शेरेबाजी, वैयक्तिक आवडनिवड ही ’परीक्षण’ म्हणून अवतरु लागली आहे. त्याचवेळी मुद्रित माध्यमांतून येणारी परीक्षणे बव्हंशी 'मोले घातले लिहाया’ प्रकारची असतात आणि त्याच्या शेवटी दिलेले रेटिंग पाहण्यापुरतीच चाळली जाऊ लागल आहेत. दृश्य माध्यमांचा असा परिस्फोट झाल्यानंतर आता शब्दांना माघार घ्यावी लागत आहे. मुद्रित माध्यमांच्या इंटरनेट अवतारात तर आता काही रोजच्या जगण्यातील काही विषयांच्या स्तंभातून तर ’नाव छापून येते’ या एकमेव आनंदासाठी महाविद्यालयीन विद्यार्थी/विद्यार्थिनींकडून ’जागाभरती’ केली जाते आहे. त्यामुळे अर्थातच सुमारांची सद्दी निर्माण झाली आहे. अशा वेळी शब्दांशी, त्याचसोबत विचार आणि निर्मितीशी इमान राखणारे लेखन अधिकाधिक दुर्मिळ होताना दिसते आहे. पूर्वी बाजारात नव्याने आलेल्या पुस्तकांची चर्चा करणारे गट आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर आलेली नवी मालिका, नवा इंग्रजी वा परभाषिक चित्रपट यावर च...
पुढे वाचा »
क्रूरा मी वंदिले
-
नवा पुरावा तपासल्यावर बुलक याना असे आढळले की, हिटलर हा केवळ सत्तेच्या अनावर लालसेने प्रवृत्त झाला असे जे मत आपण व्यक्त के होते ते पूर्णतः बरोबर नाही. तो ठराविक विचारसरणीने प्रेरित झाला होता. ही त्याची विचारसरणी त्याच्या माइन काम्फ या ग्रंथात प्रगट झाली होती आणि त्याच्या संभाषणांचा संग्रहही ती प्रगट करत होता. ही विचारसरणी वंशवादी होती आणि जर्मन जनतेला त्याने तिच्या जोरावर भारून टाकले. पण हे जर्मनीत कसे शक्य झाले याचेही उत्तर दिले पाहिजे. यामुळे बुलक यांनी आपल्या ग्रंथाची फेररचना केली. परंतु त्याचा मूळ गाभा बदलण्याची गरज नसल्यामुळे त्यांनी तो तसाच ठेवला. बुलक यांच्या ग्रंथास चाळीस वर्षे पूर्ण झाली तेव्हापर्यंत त्याच्या तीस लाख प्रती खपल्या होत्या. त्यानंतर आणखी वाढ झाली असेल. या ग्रंथामुळे बुलक यांचा जगभर नावलौकिक झाला आणि जे ऑक्सफर्ड विद्यापीठ प्राचीन काळच्या इतिहासास विशेष महत्त्व देत आले होते ते आधुनिक काळाच्या इतिहासासही तितकेच महत्त्व देऊ लागले. बुलक यांनी हिटलरविषयक ग्रंथात केलेले विश्लेषण आजही मोलाचे आहे कारण नंतरच्या काळात अनेक देशा...
पुढे वाचा »
बुधवार, ५ ऑगस्ट, २०२०
एव्हरिबडी लव्ज आँट सेरिना
-
’एव्हरीबडी लव्ज रेमंड’ ही तशी जुनी मालिका, कौटुंबिक प्रवासातील घटना नि संबंधांमधील विनोदाचा हात धरुन चालणारी. सदैव सहानुभूतीच्या शोधात असलेला 'ममाज बॉय' रेमंड; त्याचा फायदा घेऊन (किंवा त्याला कारण असणारी) त्याला सदैव पदराआड राखू पाहणारी, सून ही नेहेमीच घरकामाच्या बाबत नालायक असते असा ठाम समज असलेली - जवळजवळ भारतीय सासू म्हणावी अशी त्याची भोचक आई मेरी; बाप म्हणून आपल्या कर्तव्याबाबत बव्हंशी उदासीन असणारे, मुलगा-सून-बायको या त्रिकोणात बहुधा बेफिकीर असणारे, आणि खाण्यात व भूतकाळात जगणारे रेमंडचे वडील फ्रँक, आणि संसार हेच जीवितकार्य म्हणून मुलाबाळात रमलेली, नवरा आईच्या मुठीत असल्याने हताशपणे सहन करणारी रेमंडची पत्नी डेब्रा... हे कुटुंब मला बव्हंशी आपल्या भारतीय कुटुंबाचे प्रतिनिधीच वाटत आले आहे. अगदी 'पीपल नेक्स्ट डोअर' वाटावे असे कुटुंब! यांच्या आयुष्यात घडणार्या घटना, त्यांना सामोरे जावे लागलेल्या समस्याही अगदी अस्सल भारतीय वाटाव्यात अशा. तपशीलातील वेगळेपण वगळले तर मुळात सारे जगणे अस्सल भारतीय म्हणण्यात काडीचाही अतिरेक होणार नाही असे. ...
पुढे वाचा »
मंगळवार, १४ जुलै, २०२०
लॉजिकस्तत्र दुर्लभ:
-
हा एक लहानसा संवाद ’ब्लॅक अॅडर’ नावाच्या एका बर्याच जुन्या मालिकेतला. मि. बीन म्हणून लोकप्रिय झालेला रोवान अटकिन्सन प्रमुख भूमिकेत होता. मला स्वत:ला हा नट फारसा आवडत नाही आणि मालिकाही फारशी आवडली नाही. पण ही मालिका ’अल्टरनेटिव्ह हिस्टरी’ अर्थात समांतर इतिहास या साहित्यिक प्रकारात मोडणारी आहे. ’असे न होता, तसे झाले असते तर’ प्रकारची. अशा स्वरूपाचे लेखन बहुधा पर्यायी जगाचा वेध घेणारे असते, गंभीर असते. पण ही मालिका त्याला विनोदी अंगाने सादर करते. हा कदाचित असा पहिलाच प्रयत्न असावा. प्राचीन इंग्रजीमध्ये अॅडर म्हणजे साप. पण हा ब्लॅक अॅडर नेमका उलट प्रकारचा आहे, शेळपट आहे. राजाचा मुलगा असून त्याला कुणी खिजगणतीत धरत नाही. कधी समोर आला तर खुद्द त्याचा बाप त्याला ओळखत नाही. ’हा तुझा मुलगा’ अशी ओळख दिल्यावरच त्याला ते लक्षात येते. तो याचे नावही बहुतेक वेळा चुकीचे उच्चारतो. इतकेच काय एक-दोनदा तर तो याला मुलगी समजतो. पण असा राजघराण्याच्या वळचणीतला बिनविषारी साप म्हणून जगत असला तरी तो मूर्ख नाही. त्याचा पर्सी या त्याचा स्क्वायर अथवा मदतनीसाशी झालेला संवाद आहे. हा मदतनीस कुण्या स्पॅनिश उ...
पुढे वाचा »
सोमवार, ६ जुलै, २०२०
गाणारं व्हायलिन
-
मी पाश्चात्त्य संगीताचा फारसा भोक्ता नाही. त्यात त्यांचे वाद्यसंगीत सर्वस्वी वेगळ्या वळणाचे. त्यांचे क्लासिकल म्हणवले जाणारे संगीत सिंफनीच्या मार्गाने जाते, ज्यात अनावश्यक गलबला असतो नि मला पुरेसे तंद्री लावून ते ऐकणे शक्य होत नाही. सुरांच्या लडी, आवर्तने उलगडत श्रोत्याला कवेत घेत जाणारे गाणे ऐकण्याची सवय असलेल्या मला, सदोदित गाण्याचा टेम्पोशी खेळ करत आघातांच्या सहाय्याने ’Awe, Wow’ प्रतिक्रिया वसूल करु पाहणारे ते गाणे रुचत नाही. ’सुंदर मी होणार’ मधला सुरेश म्हणतो तसे आपल्याला ’सुरांचे पांघरुण घेऊन गुपचून पडून राहावेसे वाटते’. पण हे लेकाचे अध्येमध्ये अलेग्रो का काय म्हणतात त्याचे दणके देऊन त्या तंद्रीतून बाहेर खेचून काढू पाहतात असा माझा अनुभव आहे. भारतीय वाद्यसंगीताच्या बाबतही मी तसा गायकी अंगाच्या वाद्यवादनाचा चाहता आहे. आपल्याकडे जे आलाप-जोड-झाला प्रकारातले वाद्यवादन होते ते मला फारसे पसंत पडत नाही. त्यातला फक्त आलाप ऐकून मी सोडून देत असतो. जोड आणि झाला मध्ये वादक हमखास ’जनता को खुश कर डालो’ मोडमध्ये जाऊन ’मंगलगाणी’ ऐवजी तबल्यासोबत ’दंगलगाणी’ ऐकवू लागतो असा अनुभव आहे. एखाद्या र...
पुढे वाचा »
Labels:
कव्हर आर्टिस्ट,
कारोलिना प्रोत्सेंको,
दृक्-श्राव्य,
संगीत
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)






