RamataramMarquee

Indexes Menu_Desktop

संपूर्ण सूची :

शुक्रवार, ३१ मे, २०२४

आद्य मराठी-सारस्वतांचा निघंटु


  • मुकुंदराज गेल्या प्रकरणात आपण महाराष्ट्र आणि मराठी हे शब्द कसे आले ते पाहण्याचा प्रयत्न करून तो नाद सोडला. आता माणसे निमूटपणे बोलावयाचे सोडून लिहावयाला कशी लागली आणि त्यांच्यामागे असा कुठल्या संपादकाचा अगर प्रकाशकाचा तगादा लागला होता हे पाहावयाचे आहे. मुकुंदराजाचा 'विवेकसिंधु' हा पहिला मराठी ग्रंथ म्हणतात. पण ते चूक आहे. आता मुकुंदराज हा आद्य लेखक कसा? शक्यच नाही. उद्या वाटेल तो स्वतःला आद्य म्हणेल. शिवाय हाताशी पाचपन्नास ग्रंथ असल्याशिवाय एवढा मोठा ग्रंथ होणे शक्य नाही. महाराष्ट्रात आधी खूप ग्रंथरचना होती. किंबहुना, आधी सगळे कोश, संदर्भग्रंथ वगैरे तयार करूनच दंडकारण्यातल्या राक्षस, यक्ष, वगैरे लोकांना मराठी शिकविले. काही दिवस मराठी ही त्यांची सेकंड लँग्वेज होती. राक्षसी, यक्षी वगैरे … पुढे वाचा »

शनिवार, २५ मे, २०२४

छोटीशीच आहे फौज आपुली


  • मनुष्यप्राणी हा सर्वांत बुद्धिमान प्राणी हे तर खरेच. पण इतरही प्राण्यांना आपापल्या परीने कमीअधिक बुद्धी असतेच. स्वसंरक्षणासाठी तरी ते थोडीफार अक्कल वापरतातच. मत्स्यावतार हा आपण प्रथमावतार मानतो. माशांचेच उदाहरण घेतले तर पाण्याखालच्या साम्राज्यातला जगायचा पहिला हक्क हा माशांचा. पोटासाठी मच्छीमारी करणाऱ्या कोळ्यांना माशांनी आजवर समजून घेतले. तो एक निसर्गक्रमच आहे म्हणा किंवा जीवसृष्टीचा तो नियम आहे म्हणा किंवा जीवनचक्र अखंडित राहण्यासाठी अत्यावश्यक अशी अट आहे म्हणा, मासे स्वतःही आपल्याहून छोटे मासे खातात, तेव्हा माणसानेही खाण्यासाठी मासे पागले तोवर माशांनीही समजूतदारपणा दाखवला. पण यंत्रयुगातला मानव जेव्हा वेगवेगळी स्फोटके, हत्यारे शोधून काढून पाण्याखालच्या साम्राज्यात घुसखोरी करून, कधी गंमत म्हणून तर कधी शिकार म्हणून, कधी भौतिक शोधातली आव… पुढे वाचा »

शुक्रवार, १७ मे, २०२४

वेचताना... : आज धारानृत्य चाले...


  • महानगरी आयुष्यात माणसाच्या दृष्टीने वैय्यक्तिक पातळीवर पावसाचे अप्रूप फारसे राहिले नसले, तरी अनागर आयुष्यामध्ये उन्हाळ्याची काहिली शमवणारा आणि सुगीची चाहूल देणारा पाऊस जीवनदायी नि हवासा वाटणारा. पावसाचे हे कवतिक मानवाप्रमाणेच मानवसदृश प्राण्यांमध्येही तितकेच असोशीने व्यक्त केले जाते याची प्रथम नोंद डॉ. जेन गुडाल या विदुषीने केली आहे. जेन गुडाल यांनी चिम्पान्झी या वानरकुलातील मानवाचा भाऊबंद मानल्या गेलेल्या प्राण्याच्या अभ्यासासाठी सारे आयुष्यच वेचले आहे. व्यंकटेश माडगूळकरांनी त्यांच्या ‘ चित्रे आणि चरित्रे ’ या पुस्तकामध्ये ‘ साहसी संशोधक: जेन गुडाल ’ (१) या शीर्षकाखाली तिच्यावर एक लेख लिहिलेला आहे. त्या लेखामध्ये जेनने अनुभवलेल्या एका प्रसंगाचे वर्णन त्यांनी दिले आहे. (२) एके दिवशी… पुढे वाचा »

गुरुवार, ९ मे, २०२४

वेचताना... : जिज्ञासामूर्ती


  • ‘एक ना धड भाराभार चिंध्या’ म्हणा किंवा ‘अनावर जिज्ञासा नि अशक्त चिकाटी’ म्हणा अशा वृत्तीने जगत असताना मला स्तिमित करणारे बरंच काही सापडत गेलं. रुजलं नाही तरी भावत गेलं. काही वर्षांपूर्वी पक्ष्यांबद्दल कुतूहल जागं झालेलं असताना एका निसर्गप्रशिक्षण शिबिराला उपस्थिती लावली होती. तिथे प्रायमेट्स म्हणजे वानरकुलातील प्राण्यांवरील व्याख्यानामध्ये जेन गुडाल या विदुषीचे नाव प्रथम ऐकले होते. मोजका काळ वगळता सारं आयुष्य चिंम्पान्झींच्या सहवासात व्यतीत करुन चिकाटीने त्या प्रजातीच्या जगण्याचे तिने दस्तऐवजीकरण केले होते. त्यातून मानवी जीवनप्रवासाच्या अनेक कोड्यांना सोडवण्यात अनुभवसिद्धता, निरीक्षणक्षेत्रात मोठा वाटा उचलणार्‍या या स्त्रीने मला स्तिमित केले होते. पुढे तिच्यासह तसंच तिच्या अनुभवाच्या आधारे च… पुढे वाचा »

जिज्ञासामूर्ती


  • संशोधनकार्यात दोन दृष्टिकोन असतात: एक म्हणजे, सृष्टीवरच्या प्राणिमात्रांचं जीवन नैसर्गिकच राहावं, मात्र त्याचं गणित समजलं तर आपलं स्वतःचं जीवन अधिक समृद्ध होईल, म्हणून शोधकार्याला महत्त्व देणारे सत्प्रवृत्त संशोधक असतात. लुई लीकी हा अशांपैकी एक. रॉबर्ट यर्क्स हा अर्थातच दुसऱ्या प्रकारच्या संशोधकांत मोडतो. आपल्या अगतिक समाजजीवनाच्या सीमा ओलांडून, मनुष्यप्राण्यांपासून दूरच्या रानावनांत, घनदाट जंगलात, डोंगर कपारीत वास्तव्याला जावं आणि तिथल्या प्राणिमात्रांच्या नैसर्गिक जीवनप्रवाहात तीळमात्रही ढवळाढवळ न करता, उत्क्रान्तीच्या माळेतला आजच्या घडीला शेवटून दुसरा, म्हणजे माणसाच्या आधीचा मणी जो माकड, त्याच्या जातीचे गोरिला, ओरँगऊटँग, चिंपँझी हे जे तीन प्राणी आहेत, त्यांच्या जीवनाचा शोध घ्यावा असाही प्रयत्न काही शास्त्रज्ञांनी केला. हे प्राणी आणि … पुढे वाचा »

शनिवार, २७ एप्रिल, २०२४

न स्त्री स्वातंत्र्यमर्हती


  • नोरा फातेही या अभिनेत्रीने स्त्रीस्वातंत्र्याबद्दल अनुदार भूमिका घेत दिलेल्या मुलाखतीच्या निमित्ताने आज लोकसत्तामध्ये गायत्री लेले यांचा ‘ ट्रॅड वाइफचा आभासी ट्रेंड ?’ हा लेख प्रसिद्ध झाला आहे. त्याच सोबतीला एकोणीसाव्या शतकाच्या अखेरीस (या काळाचे महत्त्व वेचताना...: स्वातंत्र्य आले घरा या लेखामध्ये अधोरेखित केले आहे.) अमेरिकेमध्ये सुरु झालेल्या स्त्री-स्वातंत्र्य नि स्त्री-हक्क यांच्या चळवळीबाबत एका पौगंडावस्थेतील मुलाने केलेले हे टिपण, मॅन्युअल कॉमरॉफ यांच्या ‘बिग सिटी, लिट्ल बॉय’ या स्मरण-नोंदींमधून (memoirs). पुरुषी अहंकार, नव्या कल्पनांची टवाळी, अधिक्षेप, त्याकडे मनोरंजन म्हणून पाहाणे वगैरे टप्पे पाहता भारतीय समाजालाही ही निरीक्षणे बरीचशी चपखल बसतील. --- चित्रपटाप्रमाणेच आणखीही एक … पुढे वाचा »

रविवार, २१ एप्रिल, २०२४

धारयते इति धर्मः ?


  • दवबिंदूच्या एवढ्याशा आयुष्यात कोवळ्या सूर्यकिरणांचं इंद्रधनुष्य चमकून जावं, नदी उगम पावावी, डोंगरांनी ताठ मानेनं संसार थाटावेत, उत्तम जुळवलेले तंबोरे छेडले जात असताना त्यांतून फुलणाऱ्या गाण्यासारखी, समुद्राच्या गाजेच्या सुरावर किनाऱ्यावर येणा-जाणाऱ्या लाटांच्या फेसाच्या रंगीबेरंगी फुलांची पखरण होत राहावी, अशा असंख्य निर्मितीशी कसलाही संबंध नसताना, हे सारं वैभव वेळोवेळी भोगण्याचे योग माझ्या आयुष्यात अनेकदा येत राहिले आणि ‘अनंत हस्ते कमलावराने, देता किती घेशिल दो कराने’ अशी संधी माझ्या आयुष्यात वरचेवर मिळतच राहिली. पण त्याचबरोबर त्याबद्दलची आपली कृतज्ञता दुबळी असल्याच्या जाणिवेनं, आनंदाश्रूतच दुःखाश्रूही अधूनमधून मिसळत राहिले. आपण लहान बाळाचा मुका घेतो, कुणावर तरी प्रेम करतो, ते आपल्या आनंदात भर घालण्यासाठी! ही नैसर्गिक श्रीमंती वाढवत आणि … पुढे वाचा »

शुक्रवार, १२ एप्रिल, २०२४

स्वातंत्र्य आले घरा (उत्तरार्ध)


  • << पूर्वार्ध शिलरकडे जाऊन त्यांचे काम बघत बसणे मला फार आवडे. त्यांच्या दुकानाला येणारा कातड्याचा, खळीचा वास आवडे. दुकानातले शेल्फ लाकडी साच्यांनी भरलेले असत. प्रत्येक साच्याला गिऱ्हाइकाच्या नावाची चिठ्ठी दोऱ्याने बांधलेली असे. खिळे, हातोडे, पावलांच्या आकृत्यांनी भरलेली खतावणी-बुके, हे सगळे मला आवडे. स्वतः शिलर आवडत. तासन् तास त्यांचे कसब बघत मी बसून राही. ते म्हणत, “मी चांभार नाही. बूट तयार करणारा कारागीर आहे.” त्यांचे शिक्षण युरोपमध्ये झाले होते. आपल्या धंद्याचा त्यांना फार अभिमान होता. पण काळानुसार त्यांचा धंदा खालावला होता; आता पुष्कळसे काम येई ते दुरुस्तीचेच. शिलरना त्यात कमीपणा वाटे; पण जे थोडेफार चांगले काम मिळे त्यात ते आनंद मानत. कधी-कधी बेढब पायाचा माणूस तळघराच्या पायऱ्या… पुढे वाचा »