-
मला कुणाचीच भूमिका घ्यायची नाही. मला माझीच भूमिका घ्यायला हवी. भूतकालभोगी जनतेमध्ये बहुसंख्य मंडळी भूमिकाच काय पण जगण्याची चौकटही भूतकालातून, इतरांकडून स्वीकारत असतात. आणि तीच आपल्यासाठी योग्य आहे हे स्वत:ला नि इतरांना पटवण्यामध्ये आपले आयुष्य व्यतीत करत असतात. आपली भूमिका, जगण्याची चौकट ही स्वत:ची निर्मिती नसली, तरी निदान आपली निवड असावी इतपत स्वातंत्र्य घेण्याचीही त्यांची तयारी नसते. त्यामुळे वारशाच्या कुबड्यांनाच ते आपला आधार करून जगत राहतात . कारण 'लादलेल्या भूमिकेहून वेगळी भूमिका घेण्याचे स्वातंत्र्य आपल्याला नाही' असा बहुतेकांचा समज असतो. आणि 'ते आहे' याचे भान असलेल्या इतरांतील बहुसंख्या स्वातंत्र्य या संकल्पनेलाच घाबरून असते. आणि म्हणून ते सारे सामाजिक, कौटुंबिक वारशाचे जोखड फुलांचा हार असल्याचे मानून मिरवत असतात. अनेक जण आणखी पुढे जाऊन त्या वारशाच्या गाठोड्याला अभिमानाचे, अभिमानाला अस्मितेचे आणि अखेरीस अस्मितेला परपीडनाचे रूप देत आपल्या मनातील न्यूनगंडावर मात करण्याची धडपड करत असतात. सुरुवातीला उद्धृत केलेलं वा...
पुढे वाचा »
RamataramMarquee
‘प्लरिबस’च्या निमित्ताने... - १२ : जठराग्नी शमवाया भूतां ‘प्लरिबस’च्या निमित्ताने... - ११ : अद्यतनीकरण (Update) ‘प्लरिबस’च्या निमित्ताने... - १० : नव्या व्यवस्थेकडे ‘प्लरिबस’च्या निमित्ताने... - ९ : सर्वे सुखिन: सन्तु सण गेले विरुनी ‘प्लरिबस’च्या निमित्ताने... - ८ : धर्म आणि सहजीवन प्लरिबस’च्या निमित्ताने... - ७ : वैय्यक्तिक संपत्ती नि विषमता ‘प्लरिबस’च्या निमित्ताने... - ६ : समूह नव्हे व्यक्ती; गरज नव्हे संपत्ती
रविवार, ३० जानेवारी, २०२२
वेचताना... : तुझे आहे तुजपाशी
गुरुवार, २७ जानेवारी, २०२२
स्थितप्रज्ञस्य का भाषा
-
श्याम: वासूअण्णा... वासूअण्णा- वासू: (समोर येऊन उभा राहतो. बोलत नाही.) श्याम: अरे राम राम राम. हे सूत काढायचं काम इतकं अवघड असेल असं वाटलं नव्हतं मला. ह्या गीतानं मला सूत काढायला दोन दिवसांत शिकवते म्हणून वचन दिलं आणि स्वतः कुठं गायब झाली कुणास ठाऊक ! गीता आचार्याच्या बरोबर बद्रिनारायण शेठजींच्या घरी गेली का वासूअण्णा? वासू: (मानेने नाही म्हणतो.) श्याम: नाही गेली ? मग कुठे गेली ? वासू: (खुणेने 'कोण जाणे' असा भाव व्यक्त करतो.) श्याम: मग नीट सांग ना-हे असं (त्याने केलेल्या खुणेसारखे करीत) काय ? बोलायला काय झालं? अहो, गीता काय करतेय् ? वासू: (खुणेने वाचते आहे असे दाखवतो.) श्याम: वाचते आहे ? मग बोलत का नाही ? वासू: लावलंत बोलायला ? आचार्यांनी मला आजचा दिवस मौन पाळायला सांगितलं होत. सकाळपासून दहा वेळा मोडायला लावलं मला. अगदी भल्या पहाटे माळीबुवा आले ठणाणा करीत बागेतला पाईप फुटला म्हणून. मी त्याला पाटीवर लिहून सांगितलं की, प्लंबरकडे जा- आता एवढा म्हातारा झाला, त्याला प्लंबरमधला प्ल वाचता येईना. वाचून दाखवावं लाग...
पुढे वाचा »
Labels:
तुझे आहे तुजपाशी,
नाटक,
पु. ल. देशपांडे,
पुस्तक
मंगळवार, २५ जानेवारी, २०२२
लोकशाहीच्या नावानं चांगभलं
-
One heart-bit away from Presidency and not a single vote is cast in my name. Democracy is so over-rated. - Frank Underwood ( House of Cards : Season 2, Episode 2) लोकशाही म्हणजे ’लोकांचे, लोकांसाठी, लोकांनी चालवलेले राज्य’ (Democracy is government of the people, by the people, and for the people) ही अब्राहम लिंकनने केलेली व्याख्या आपण नागरिकशास्त्राच्या परीक्षेसाठी पाठ केलेली असते. जिथे अभ्यासक्रमात नागरिकशास्त्र हा विषय इतिहासाला जोडलेला असतो, त्या देशात नागरिकशास्त्राकडे पाहण्याचा दृष्टिकोन किती उदासीनतेचा असतो हे ध्यानात यावे. वास्तविक एखाद्या राज्याला, व्यवस्थेला इतिहासापेक्षा वर्तमानाचे नियोजन, प्रशासन नि संचालन यांची घडी बसवण्यास अत्यावश्यक असलेल्या नागरिकशास्त्राचे महत्त्व अधिक असायला हवे. पण भूतकालभोगी समाजाला इतिहासाभोवती निरांजने ओवाळताना वर्तमानाचा विसर पडत जातो , आणि पर्यायाने नागरिकत्व नि नागरिकशास्त्र हे उपेक्षेचे विषय होऊन राहतात. याचा अपरिहार्य परिणाम म्हणून लोकशाही या व्यवस्थेबद्दल, तिने देऊ केलेल्या अधिकारांबद्दल, आणि एक य...
पुढे वाचा »
Labels:
चित्रपट,
द डिक्टेटर,
दृक्-श्राव्य,
मालिका,
हाऊस ऑफ कार्ड्स
शुक्रवार, ३१ डिसेंबर, २०२१
वर्षान्त विशेष: सण आले जुळुनि... (उत्तरार्ध)
-
( हा दीर्घ लेख दोन भागांत प्रसिद्ध होतो आहे. याचा पूर्वार्ध २५ डिसेंबर रोजी प्रसिद्ध झाला आहे . तर हा उत्तरार्ध आज वर्षअखेरीस प्रसिद्ध होतो आहे.) सण आले जुळुनि... (पूर्वार्ध) << मागील भाग मागील लेखार्धाच्या सुरुवातीलाच आलेल्या ओलाफच्या गाण्यात ’मेले कलिकी’ असा एक उल्लेख आला आहे, त्यामागचा इतिहासही मजेशीर आहे. प्रशांत महासागरातील हवाई बेटे ही अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांच्या अधिपत्याखाली आहेत. तेथील बहुसंख्या ख्रिश्चन आहे. त्यामुळे ख्रिसमससह बहुतेक ख्रिस्ती परंपरेतील सण तिथेही साजरे केले जातात. पण फरक असा आहे, की ही बेटे अमेरिकेच्या मूळ भूमीपासून बरीच दक्षिणेला म्हणजे उष्ण कटिबंधात येतात. त्यामुळे अमेरिकेत डिसेंबरमध्ये सुरू होणारा हिवाळा तिथे आणखी काही आठवड्यांनी सुरु होतो. त्यामुळे ख्रिसमस काळात तिथे चक्क उष्ण हवामान असते. त्याचे प्रतिबिंब रॉबर्ट अलेक्स अॅंडरसन या गीतकाराच्या ’मेले कलिकीमाका’ या गाण्यात उमटलेले आहे. हे मेले कलिकी अथवा कलिकीमाका काय भानगड आहे असा प्रश्न चटकन डोक्यात आला असेल. त्यामागे भाषिक कारण आहे! हवाई बेटांवरील लोकांची उच्चाराची पद्धत - मूळ स्थ...
पुढे वाचा »
Labels:
अक्षरनामा,
चलच्चित्र,
दृक्-श्राव्य,
लघुपट,
Olaf's Frozen Adventure
शनिवार, २५ डिसेंबर, २०२१
वर्षान्त विशेष: सण आले जुळुनि... (पूर्वार्ध)
-
( हा दीर्घ लेख दोन भागांत प्रसिद्ध करतो आहे. याचा हा पूर्वार्ध आज २५ डिसेंबर रोजी प्रसिद्ध होतो आहे, तर उत्तरार्ध ३१ डिसेंबर रोजी प्रसिद्ध होईल'. या दोन दिवसांचे औचित्य लेखांमध्येच स्पष्ट होईल. ) बॉलिवूड चित्रपटांच्या बहुसंख्य चित्रपटाच्या प्रेमींना चित्रपट म्हटले की ’कुणाचा चित्रपट?’ असा प्रश्न विचारण्याची सवय आहे. कारण चित्रपट हे हीरो अथवा हीरोईन म्हणून निवडलेल्या नट अथवा नटीच्या चाहत्यांच्या अंधप्रेमावरच अधिक चालतात. चित्रपटाचा हीरो शाहरुख खान आहे, संजय दत्त आहे किंवा कतरिना कैफ हीरोईन आहे म्हणून अधिक काही न विचार करता डोळे मिटून तिकिट काढणारे चाहते या चित्रपटसृष्टीचे आधार आहेत. टॉलिवूड म्हणून ओळखल्या जाणार्या तमिळ चित्रपटसृष्टीत तर या अभिनेत्यांची देवळे, फॅन-क्लब वगैरेपर्यंत प्रगती(?) झालेली आहे. हॉलिवूडची स्थितीही फार वेगळी आहे असे म्हणता येणार नाही. त्यामुळे चित्रपटाबद्दल बोलताना तो अभिनेता वा अभिनेत्री आणि त्याची/तिची भूमिका/पात्र हेच केंद्रस्थानी राहते. पण अनेकदा असे होते, की चित्रपटाच्या पटकथेमध्ये दुय्यम असलेले पात्र साकारणारा एखादा तारकांकित नसलेला अभिनेता वा अभ...
पुढे वाचा »
Labels:
अक्षरनामा,
चलच्चित्र,
दृक्-श्राव्य,
लघुपट,
Olaf's Frozen Adventure
रविवार, १५ ऑगस्ट, २०२१
स्वातंत्र्यदिनाची वेचणी : देशासाठी तीन गीते
-
भक्ती असा शब्द आला की तिच्यासोबत कर्मकांडे आणि अवडंबर ओघाने येतेच. मग ती देवभक्ती असो, राष्ट्रभक्ती असो की व्यक्तिभक्ती. भक्तीला, श्रद्धेला निखळ स्वरूपात न ठेवता त्यावर शेंदराची पुटे चढवून तिची विक्रयवस्तू केल्याखेरीज बहुतेक स्वयंघोषित भक्तांना चैन पडत नाही. एकामागून एक अशा चित्रविचित्र कल्पनांचे आणि पूर्वग्रहांचे कपडे तिच्यावर चढवून तिला पाऽर बुजगावण्याचे स्वरूप दिल्यावरच माणसे कृतकृत्य होत असतात. गद्य शब्दांपेक्षा अनेकदा गीत-संगीताने भावनांचा रसपरिपोष अधिक नेमका आणि निखळ होत असतो. देशभक्तिपर भावनांचे कढ तर सोडा, कढी उतू जात असताना अनलंकृत देशभक्तीला मुजरा करणारी ही तीन गाणी. यांची निवडही अगदी छातीबडवू स्वयंघोषित देशभक्तांपासून त्या भावनेशी प्रामाणिक असणार्यांपर्यंत सार्यांनाच भावतील अशी केली आहे. पहिले गीत आहे राष्ट्रसेवादलाचे अध्वर्यू साने गुरुजी आणि सावरकरांच्या हिंदुत्ववादी मुशीतले बाबूजी सुधीर फडके यांच्या जोडीला प्रसिद्धिपराङ्मुख गुणी संगीतकार वसंत देसाई यांच्या युतीचे (किंवा आघाडीचे) अविस्मरणीय लेणे बलसा...
पुढे वाचा »
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)




