RamataramMarquee

Indexes Menu_Desktop

संपूर्ण सूची :

सोमवार, १० मे, २०२१

वेचताना... : लांडगा


  • ’Every man for himself’ ही माणसाने फार पुढे, म्हणजे भाषेच्या उगमानंतर प्रचलित केलेली उक्ती, नैसर्गिक न्याय म्हणून जीवसृष्टीच्या बाल्यावस्थेतच प्रस्थापित झालेली होती. एका जातीचे प्राणी, एकेकटे वा कळपाने जगत असताना अन्य जातीय प्राण्यांशी फार जवळीक साधत नसत. शेतीचा शोध हा माणसाला अन्य प्राण्यांपासून सर्वस्वी वेगळ्या वाटेने घेऊन गेला असला, तरी त्यापूर्वी माणूसही अनेक प्राण्यांपैकी एक होता, आणि अन्य वानरकुलातील प्राण्यांप्रमाणेच मिश्राहारी होता. मांसाहाराची गरज भागवण्यासाठी त्याला शिकार करण्याची गरज भासे. पण माणूस हा मुळात दुबळा जीव आहे. त्याला वाघसिंहादि शिकारी प्राण्यांची मजबूत ताकद वा जबडा नाही, शिकारी पक्ष्यांप्रमाणे भक्ष्यावर घट्ट पकड मिळवता येईल अशा नख्याही नाहीत, की भक्ष्याचा शरीराचा भेद कर… पुढे वाचा »

शुक्रवार, ७ मे, २०२१

वेचताना... : लांडगा आला रेऽ आला


  • ( हा सुईदोर्‍याचा खेळ मोठा मजेशीर असतो. लहानपणी हा खेळ खेळताना एकाचा पाठलाग करत असताना दुसरा दोघांच्या मधून गेला की पहिल्याचा नाद सोडून त्याचा पाठलाग सुरु करावा लागे. ‘वेचित चाललो...’ वर अलिकडे असेच होऊ लागले आहे. ‘थँक यू, मि. ग्लाड’चा पाठलाग करत असताना ‘एक झुंज वार्‍याशी’ मध्ये घुसले नि आधी नंबर लावून गेले. आता अनंत सामंतांच्या ‘लांडगा’वर लिहिता लिहिता हा गोडबोलेंचा लांडगा मध्ये घुसला. तो लांडगाही येतोच आहे मागून. ) संशोधनाचे काम रुक्ष असते, संशोधक म्हणजे अस्ताव्यस्त दाढी वाढलेला, केस न विंचरलेला, जाड चष्मा लावून आपल्याच जगात हरवलेला असा प्राणी असतो, असा सार्वत्रिक समज आहे. त्यात वैज्ञानिक म्हटले की, आपल्या मनात रसायनशास्त्रज्ञच येतो. आणि तो कायम चित्रविचित्र आकाराच्या काचेच्या भांड्यातून ठ… पुढे वाचा »

वृकमंगल सावधाऽन


  • गुहेची नवी जागा लांडग्यांना कितीही सोयीची असली तरी मला सोयीची नव्हती. दगडांच्या ढिगाऱ्यामुळे धड काही दिसायचं नाही. शिवाय कॅरिबूनी दक्षिणेकडे स्थलांतर करायला सुरुवात केल्याने लांडग्यांचे लक्ष शिकारीकडे असायचे. दिवसभर ते थकूनभागून झोपायचे. त्यामुळे विशेष काही घडायचं नाही. थोडक्यात मी भयंकर बोअर व्हायला लागलो होतो. एवढ्यात एक मजा झाली- चाचा अल्बर्ट चक्क प्रेमात पडला ! आमच्या पहिल्या भेटीनंतर माइक आपले सर्व कुत्रे घेऊन उत्तरेकडे चालता झाला होता. एकही कुत्रा मागे न ठेवण्याचं कारण, माझ्यावरचा अविश्वास असावं. शिवाय कुत्र्यांची पोटं भरायला त्यांना कॅरिबूमागे उत्तरेकडे नेणं भाग असावं. आता कॅरिबूच्या मागे तेही दक्षिणेकडे परतले होते. एस्किमो लोकांकडचे कुत्रे लांडग्यांचीच धेडगुजरी अवलाद असते अशी एक सर्वस… पुढे वाचा »

सोमवार, ३ मे, २०२१

गुलमोहराआडची अबोली


  • आयुष्यात सर्वात प्रथम थिएटरला जाऊन पाहिलेला चित्रपट म्हणजे शोले, बॉलिवूडमधील एक मैलाचा दगड मानला गेलेला. तेव्हा अक्षरश: अंड्यात असल्याने डोक्यात कितपत शिरला आठवत नाही. पुढे अनेक वर्षे त्याची मोहिनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत होती. नंतर त्यातील लक्षवेधी संवाद गल्लोगल्ली पोरंटोरं ऐकवू लागल्याने बरेचसे पाठ झाले. त्यापूर्वीच्या सामाजिक, कौटुंबिक वगैरे चित्रपटांची सद्दी खर्‍या अर्थाने संपवून बॉलिवूडला हिंसाचार आणि त्राताप्रधान चित्रपटांकडे नेणारे निर्णायक वळण त्याने दिले. या चित्रपटात काय नव्हते... 'कुत्ते कमीने, मै तेरा खून पी जाऊंगा’, 'एक एकको चुन चुनके मारुंगा' हे धर्मेंद्रचे ट्रेडमार्क झालेले डॉयलॉग, ’तेरे लिए तो मेरे पैर ही काफी है’, ’ये हाथ मुझे दे दे ठाकूर’, ’तुम्हाला नाम क्या है बसंती?’, 'आधे इधर जाव, आधे उधर… पुढे वाचा »

शनिवार, १ मे, २०२१

शरीरम् धनसंपदा


  • सीनियरची चाहूल लागून ग्लाडसाहेबाने डोके वर उचलले. “सर, कैदी नंबर आठसो बयालीस, वीरभूषण पटनाईक, फाशी जाण्यापूर्वी मृत्युपत्र लिहून देऊ मागतो!” सीनियरने साहेबाला इन्फॉर्म केले. “जा... त्या दळभद्र्याला विचारा, म्हणावं तुला विलची काय गरज? तुला टांगल्यावर तुझा थाली पॉट भट्टीखान्यातच जमा होणार आहे. घरी नाही पाठवता येणार म्हणावं..." ग्लाडसाहेबाने तिरसट तुच्छतेने उत्तर दिले. सीनियर सॅल्यूट ठोकून माघारी वळला आणि नक्षलवाद्याकडे अधिक चौकशी करायला फाशी गेटकडे चालू लागला... सीनियर निघून गेला नि ग्लाडसाहेबाचे मन त्याचे त्यालाच खाऊ लागले. साहेबाला नक्षलवाद्याच्या बायकोच्या पायाच्या भेगा आठवल्या, आणि मग स्वत:चे वाईट दिवस आठवले. आपण नक्षलवाद्याच्या दारिद्र्यावर बोट ठेवायला नको होते असे साहेबाला मनोमन वा… पुढे वाचा »

वेचताना... : थँक यू, मिस्टर ग्लाड


  • --काही झाले तरी ग्लाडसाहेबांची राजनिष्ठा मोठी कडवी होती हे खरे. प्राण गेला तरी साहेब खाल्ल्या मिठाला जागल्याशिवाय राहिला नसता. बेचाळीसच्या चळवळीत हाती सापडलेल्या सत्याग्रह्यांना कारणे शोधून शोधून ग्लाडसाहेबाने गुरासारखे बडवून काढले होते. पण युनियन जॅक उतरून तिरंगा वर चढला, तेव्हा ग्लाडसाहेबाने दु:ख आवरून एक कडक सॅल्यूट ठोकला नि आपली सेवा तिरंग्याला रुजू केली. ग्लाडसाहेबांची जेवढी निष्ठा फिरंग्याला होती तेवढीच आता तिरंग्याला होती...(पान ७) ... नक्षलवादी चळवळीचा वाढता जोर पाहून साहेबाच्या उरात धडकी भरे. भारतात खरेच ‘कम्युनिस्ट रेव्होल्यूशन’ होणार असे त्याला वाटू लागे. अर्थात जरी भारतात कम्युनिस्ट रेव्होल्यूशन झाले असते, तरी फारसे काही बिघडले नसते. तिरंगा उतरून लाल बावटा वर चढल्यावर ग्लाडसाहेबाने दु:ख आवरून एक कडकडीत सॅल्यूट ठोकला असता, नि आप… पुढे वाचा »

बुधवार, २८ एप्रिल, २०२१

वेचताना... : एक झुंज वार्‍याशी


  • ( काही दिवसांपूर्वी अनिल बर्वेंच्या ’थँक यू, मिस्टर ग्लाड’वर लिहित होतो. दोन व्यक्तिंमधील मनोबलाच्या संघर्षाबद्दल लिहित असताना पुलंच्या ’एक झुंज वार्‍याशी’ची आठवण झाली. डॉ. देशमुख आणि माणूस यांच्यात अशाच स्वरूपाचा संघर्ष त्यात रंगवला गेला आहे. परंतु ’...ग्लाड’च्या तुलनेत तो अधिक महत्वाचा आहे, कारण त्याला केवळ दोन व्यक्तींमधील संघर्ष एवढेच महत्व नाही, त्यामागे असलेला नैतिकतेचा पेच आणि त्याकडे दोन दृष्टिकोनातून पाहणारे दोघे असा तो संघर्ष आहे. त्यामुळे ’...ग्लाड’बद्दल लिहिताना संदर्भापुरते उघडलेल्या त्या पुस्तकाने ’...ग्लाड’ला मागे सारून ’वेचित...’ वर आधी स्थान मिळवले आहे . ) ’हशिवनारा बाबा’ असा शिक्का मारून उच्चनासिकान्यायाने अर्वाचीन स्वयंघोषित श्रेष्ठ साहित्यिकांनी बाद केलेल्या पुलंच्या नाटका… पुढे वाचा »

मंगळवार, २७ एप्रिल, २०२१

ओळख


  • माणूस : ठीक आहे. मी तुम्हांला आता प्रामाणिकपणानं सांगतो. इथे येताना मी वाईटातल्या वाईट परिणामाला तयार होतो. पण आपल्या चर्चेमुळं मला खूप समाधान वाटलं. मी तुम्हांला बोलायला भाग पाडलं, एवढंच नव्हे तर सौदाही करायला लावला. आता मला केव्हाही इथून निघून जाता येईल. मला कोण दोष देणार ? मी ? वाठारकर ? चित्रा ? तुम्ही ? डॉक्टर चौधरी तर आनंदाने उड्या मारतील. पण माझ्या हिशेबी ते नसल्यासारखेच आहेत. एखाद्या मेलेल्या माणसासारखे आहेत ते मला— डॉ० चौधरी : (हसतो. ) होय ! ठार मेलेला ! माणूस : ( तिथे लक्ष न देता) पण डॉक्टरसाहेब, तुम्ही तुम्ही निराळे आहात. आता फक्त तुम्ही आणि मीच. मी इथून गेल्यावर तुम्ही गाडी नाही बोलावणार. तुमच्या ह्या स्वीय सहकाऱ्यांना घरी जायला सांगणार आणि एकटेच इथे राहणार. डॉ० चौधरी : मला कंटाळा आलाय ह्या बडबडीचा ! [ बाथरूमच्या दिश… पुढे वाचा »