RamataramMarquee

सूची: अनुक्रमे ▶ वेचे ▶ वेचताना ▶ दृक-श्राव्य ▶

रविवार, १५ ऑगस्ट, २०२१

स्वातंत्र्यदिनाची वेचणी : देशासाठी तीन गीते


  • भक्ती असा शब्द आला की तिच्यासोबत कर्मकांडे आणि अवडंबर ओघाने येतेच. मग ती देवभक्ती असो, राष्ट्रभक्ती असो की व्यक्तिभक्ती. भक्तीला, श्रद्धेला निखळ स्वरूपात न ठेवता त्यावर शेंदराची पुटे चढवून तिची विक्रयवस्तू केल्याखेरीज बहुतेक स्वयंघोषित भक्तांना चैन पडत नाही. एकामागून एक अशा चित्रविचित्र कल्पनांचे आणि पूर्वग्रहांचे कपडे तिच्यावर चढवून तिला पाऽर बुजगावण्याचे स्वरूप दिल्यावरच माणसे कृतकृत्य होत असतात. गद्य शब्दांपेक्षा अनेकदा गीत-संगीताने भावनांचा रसपरिपोष अधिक नेमका आणि निखळ होत असतो. देशभक्तिपर भावनांचे कढ तर सोडा, कढी उतू जात असताना अनलंकृत देशभक्तीला मुजरा करणारी ही तीन गाणी. यांची निवडही अगदी छातीबडवू स्वयंघोषित देशभक्तांपासून त्या भावनेशी प्रामाणिक असणार्‍यांपर्यंत सार्‍यांनाच भावतील अशी केली आहे. पहिले गीत आहे राष्ट्रसेवादलाचे अध्वर्यू साने गुरुजी आणि सावरकरांच्या हिंदुत्ववादी मुशीतले बाबूजी सुधीर फडके यांच्या जोडीला प्रसिद्धिपराङ्मुख गुणी संगीतकार वसंत देसाई यांच्या युतीचे (किंवा आघाडीचे) अविस्मरणीय लेणे बलसा...

    पुढे वाचा »

सोमवार, २६ जुलै, २०२१

द मेड ते पोस्टमेन इन द माऊंटन्स... व्हाया प्रदक्षिणा, राशोमोन, ब्रॉडचर्च


  • प्रथम टोळी, मग नीतिनियमादि चौकटी अधिक काटेतोल होत तिचा बनलेला समाज, पुढे पुनरुत्पादन प्रक्रियेची समज आल्यानंतर रक्ताच्या नात्याने बांधले गेलेले व्यापक कुटुंब, आणि माणूस जसजसा शहरी जीवन अंगीकारता झाला तसे ते संकुचित होत उदयाला आलेली एककेंद्री कुटुंब-व्यवस्था (१) ... या मार्गे माणसाच्या नात्यांच्या जाणीवांचा प्रवास होत गेला आहे. याचा पुढचा टप्पा बनू पाहात असलेले स्वकेंद्रितांचे दुभंग, विखंडित कुटुंब हे ‘फायनल डेस्टीनेशन’ ही अमेरिकेची संयुक्त संस्थानांची उरलेल्या जगाला देणगी असे म्हणण्यास फारशी कुणाची हरकत नसावी. विभक्त आई-वडील, शक्य तितक्या लवकर सुटी/स्वतंत्र होऊ पाहणारी मुले, त्यातून भावनिक बंधांना येणारा कमकुवतपणा, कोरडेपणाही अपरिहार्यपणे येतोच. मग त्याची भरपाई करण्यासाठी अगदी पौगंडावस्थेपासून जोडीदाराचा शोध; नात्यांच्या वैविध्याच्या अभावामुळे त्याच्याकडून असलेल्या अनेक-पदरी आणि म्हणून अवास्तव अपेक्षा, आणि त्या अपेक्षाभंगातून येणारे टोकाचे वैफल्य... टोळी-समाज-कुटुंब या मार्गे सर्वस्वी वैय्यक्तिक जगण्यापर्यंतचा हा प्रवास ! कौटुंबिक गैरसमजांचे परस्पर-संवादातून निराकरण करणे, हा आता ...

    पुढे वाचा »

बुधवार, १४ जुलै, २०२१

चार प्रार्थना


  • प्रार्थना हा गीतप्रकार असा आहे की ज्यात श्रद्धेपेक्षा भावनेला अधिक आवाहन असते. शिव-विष्णूची केली, अल्लाहची केली की येशूची हा मुद्दा गौण होऊन गीतातील भाव जेव्हा ऐकणार्‍यापर्यंत पोचवते ती कविता म्हणजे प्रार्थना. एखाद्या नास्तिकालाही मंत्रमुग्ध करु शकते, तो ही जिच्याशी तद्रूप होऊ शकते ती प्रार्थना. शेवटी श्रद्धास्थान ही माणसाच्या कल्पनेचीच निर्मिती असल्याने, त्याच्या प्रार्थनेची परिणामकारकताही त्याच्या मनाच्या, शब्दांच्या आणि भावनेच्या प्रामाणिकपणावर अवलंबून असते. मी स्वत:ला हिंदू, मुस्लिम, ख्रिस्ती अशा धार्मिक अथवा सश्रद्ध, अश्रद्ध, अज्ञेयवादी अशा कृत्रिम आणि तरीही धूसर सीमारेषांच्या वर्गीकरणांच्या चौकटीत तपासून पाहात नाही. आवड, नावड आणि निवड यांच्याशी प्रामाणिक राहात जे पटेल आवडेल त्याचा स्वीकार आणि जे रुचणार नाही, पटणार नाही त्याचा अस्वीकार ( नकार नेहमीच आवश्यक असतो असे मी मानत नाही. ) या बाण्याने चालत असतो. रामाच्या नावावर चाललेल्या राजकारण, द्वेषकारण तर सोडाच, पण श्रद्धेचाही मला स्पर्श झालेला नाही. असे असूनही गीतरामायणासारख्या एकाहून एक अस्खलित गाण्यांचा ठेवा मला अतिशय प्रिय आहे. ग...

    पुढे वाचा »

रविवार, २० जून, २०२१

अमरत्वाची आस नि चिरंजीवित्वाचा फास


  • ’क्लॅश ऑफ टायटन्स’ (१) या चित्रपटातील हा एक प्रसंग आहे. पर्सिअस (२) हा झ्यूस या ऑलिम्पिअन देवांच्या पहिल्या पिढीतील देवाचा पुत्र आहे. पण तो जन्मापासून वडिलांपासून दूर वाढल्यामुळे त्याला ते ठाऊक नाही. आयो त्याला त्याचे जन्मरहस्य सांगते आहे. पण तो तिलाही ओळखत नसल्याने तिच्याबद्दल विचारणा करतो, तेव्हा ती आपण कोण त्याचा उलगडा करते आहे. ही डेमिगॉड म्हणजे निम्नदेवता किंवा साहाय्यक देवता आहे, साधारणत: आपल्याकडील यक्ष व अप्सरांसारखी. हे देवांप्रमाणेच चिरंजीव आहेत, पण त्यांना देवत्व मिळालेले नाही. देवांचे साहाय्यक अशीच त्यांची कायम भूमिका आहे. आपली पार्श्वभूमी सांगताना ती ’चिरंजीवित्वाचा शाप’ असा उल्लेख करते. सर्वस्वी मानवी आयुष्य जगलेल्या (आणि म्हणून त्या जमातीमधील चिरंजीवित्वाची, दीर्घायुष्याची आस वारशाने मिळालेल्या) पर्सिअसला तो उल्लेख आश्चर्यकारक वाटतो. तो त्याचा उपहास करतो आहे. पण त्यावरचे आयोचे उत्तर मात्र त्याला नि प्रेक्षकालाही अंतर्मुख करुन जाते. The Curse of Agelessness Film: Clash of Titans 2010. ...

    पुढे वाचा »

मंगळवार, १५ जून, २०२१

'बोर्डचाट्या'च्या शोधात


  • ’एव्हरिबडी लव्ज रेमंड’ या अतिशय गाजलेल्या विनोदी मालिकेतील हा एक प्रसंग आहे. रेमंडला मायकेल आणि जेफ्री अशी जुळी मुले आहेत. ते दोघेही सध्या प्री-स्कूल म्हणजे बालवाडीमध्ये शिकत आहेत. रेमंड आणि त्याची पत्नी डेब्रा त्यांच्या - विशेषत: मायकेलच्या- प्रगतीबाबत त्यांच्या शिक्षिकेशी बोलत आहेत. Michael Left Behind Everybody Loves Raymond Episode: Left Back 1999. Teacher : Michael may be little young for his age and might have to stay back another term in pre-school. Raymond : What about the other kid I just saw, that one licking the board. Debra : ( intervenes ) And Jeffery is doing fine. I was more worried about splitting them. They are so close. Teacher : They both can stay back, no harm in that. It is good to do that in pre-school rather than later. Raymond : Is the board-licker moving up...? कुठल्यातरी जमावाचा भाग म्हणून स्वत:ला ओळखण्याची सवय माणसांच्या इतकी हाडीमासी रुज...

    पुढे वाचा »

सोमवार, २४ मे, २०२१

स्त्री-सबलतेचा जाहिरनामा


  • गोनीदांच्या ’ जैत रे जैत’ मधील वेचा शेअर करताना चिंधीबद्दल म्हटलं होतं की भारतीय साहित्यात अशी कणखर नि स्वयंपूर्ण स्त्री व्यक्तिरेखा क्वचितच आढळते. जगभरातील बहुतेक नागर संस्कृतींनी आणि त्यांना वेटाळून राहिलेल्या संघटित धर्मांनी स्त्रीला दुय्यम स्थान देऊन तिला जखडून टाकले आहे. अनागर संस्कृतीचा वारसा सांगणारी चिंधी आणि जिला कोणत्या एका संस्कृतीचा वारसाच नाही अशी शरत्‌चंद्रांच्या ’शेषप्रश्न’मधील कमल, या दोघी या परिघाबाहेर असल्यामुळेच तथाकथित नागर संस्कृतीच्या जाचातून सुटू शकल्या असाव्यात. डिस्ने स्टुडिओजच्या प्रिन्सेसची- नायिकांची मांदियाळी पाहिली, तर त्यातही कॉकेशन अथवा गोर्‍या वंशाच्या स्नो-व्हाईट, सिंडरेला, अथवा स्लीपिंग ब्यूटी सारख्या नाजूक-साजुक बाहुल्या वा पुरुषांकरवी होणार्‍या उद्धाराची वाट पाहणार्‍या, परंपरेने स्त्रीला दिलेले परावलंबी स्थानच अधोरेखित करणार्‍या असतात. तथाकथित संस्कृतींनी आखून दिलेल्या रेषेला ओलांडून पुरुषी एकाधिकारशाही असलेल्या क्षेत्रात पाऊल टाकणार्‍या त्यांच्या नायिका मात्र अन्य वंशाच्या आहेत. चिनी वंशाची मूलान अवघड प्रसंगी शस्त्र परजून रणमैदानात उडी घेते. स...

    पुढे वाचा »

रविवार, २३ मे, २०२१

तडा


  • उन्हाळा सुरू झाला. डोंगरावरला महादेव पुन्हा म्हातारा झाला. त्याच्या अंगावरलं लांबलांब गवत सगळं वाळून गेलं. भरारा वारा सुटे. त्याच्या लाटांबरोबर ते ठिकच्या ठिकाणी आपटू लागलं. महादेवाच्या डुईवरल्या झाडाची पानं गळून पडली. नाग्या उसासून म्हणाला, 'अरं माज्या देवा ! कशी रं तुजी दशा !' नागलीवरीच्या कणग्या पार मोकळ्या झाल्या. आढ्याच्या लगीला टांगून ठेवलेल्या, क्वचित कुठं दिसणाऱ्या मकईच्या माळाही दिसेनाश्या झाल्या. भात कधीच गुप्त झालं होतं. जेमतेम बी बियाणाची डालगी शेणानं लिंपून ठेवलेली शिल्लक राहिली. कुठं कुणाकडं तर तीही फुटली. जगू वाचू तर वाढीदिढीनं आणून पेरू. पोटाला अन्न तर पाहिजे ! ठाकर जवानांच्या छातीच्या फासळ्या दिसायला लागल्या. गालफडं बसली. मोसमात तीनतीनदा भाताची भुगणी सफै केलेल्या ठाकरांच्या मुखी एका वेळी पेज लागणंही कठीण झालं. मग त्यांनी फासे अन् वाघुरा बाहेर काढल्या. शेतातली कामं जेमतेम उरकली, की ठाकरगडी पाखरांच्या अन सशांच्या मागे धावू लागले. त्यांनी मारलेले फेकलेले धोंडे जाळ्याजाळ्यांतून अडकू लागले. जाळ्यात बसलेले ससे बावर...

    पुढे वाचा »

शुक्रवार, २१ मे, २०२१

वेचताना... : जैत रे जैत


  • माणूस प्रथम निसर्गजीवी होता, तो निसर्गाच्या सोबतीने राहात होता. जगण्यासाठी आवश्यक असलेल्या गोष्टी तो निसर्गाकडून घेई. तेव्हा जगण्यासाठी आवश्यक गोष्टी निसर्गातून घेताना हा आपला हक्क नाही याचे त्याला भान होते. केवळ जगण्याची गरज म्हणून आपण ते काढून नेतो, हे तो विसरत नसे. म्हणून त्याबद्दल निसर्गाकडे आपली कृतज्ञता रुजू करत असे. गो. नी. दाण्डेकरांच्या ‘जैत रे जैत’मधला ठाकरांचा नाग्या जळणासाठी फांदी तोडण्यासाठी झाडदेवाची अनुमती मागतो, केवळ वाळलेलीच फांदी तोडेन, ओली तोडणार नाही असे वचन देतो. त्या झाडावरच्या पोळ्यातील माश्यांची माफी मागतो. नागदेवाच्या पाया पडतो. वाघदेवाला त्याचे देणे देत जातो. पावसाला सुरुवात झाल्यावर अन्नाचा तुटवडा असतानाही ठाकर गडी निसर्गाला ओरबाडण्याची घाई करत नाहीत. पावसाचा पहिला भर ओसरल्यावर, भादव्यातच भारंगी, कुर्डू, तरोटा वगैरे भाज्यांना हात घालतात. आणि ती खाण्यापूर्वी देवांच्या, पितरांच्या नावे घास सोडतात नि मगच तिला तोंड लावतात. नाग्याच्या वाडीत उंदीर फार झाले म्हणून त्यांना मारतानाही एखादा वृद्ध तरुणांना सबुरीचा सल्ला ...

    पुढे वाचा »