RamataramMarquee

सूची: अनुक्रमे ▶ वेचे ▶ वेचताना ▶ दृक-श्राव्य ▶

शनिवार, १२ मार्च, २०२२

हासून ते पाहाणे


  • पुलं एके ठिकाणी म्हणतात, ’गाणार्‍याला नुसता गाता गळा असून भागत नाही, आधी एक गातं मन असावं लागतं. ते सदैव हसरं, गातं असावं लागतं. तरच गाणं संभवतं.’ त्याच धर्तीवर खळखळून हसण्यासाठी एक निर्व्याज आणि निर्भेळ मन असावं लागतं असं माझं मत आहे. खळखळून हसणे हा विनामूल्य वापरता येणारा असा तणावहारी उपचार आहे. पंचाईत अशी की असे हास्य आवंतून आणता येत नाही; हास्यक्लबवाले काहीही म्हणोत. पाच-सहा वर्षांची एक मुलगी खळखळून हसताना काढलेले हे छायाचित्र चार-पाच वर्षांपूर्वी कुठेतरी सापडलं नि आमच्या कम्प्युटरच्या हार्ड-डिस्कमध्ये रुतून बसलं. तिच्या चेहर्‍यावर एक जिंकल्याचा, परिपूर्तीचा आनंद आहे. दोन्ही हात उंचावून तो आनंद ती व्यक्त करताना दिसते आहे. इतका निरभ्र आनंद कित्येक वर्षांत स्वत: अनुभवल्याचं आठवत नाही. आज माणसाच्या आनंदामध्ये नकळत आलेला अहंकाराचा गंड, इतर कुणाला मागे टाकल्याचा दर्प जेवल्यानंतर ताटाच्या तळाशी चिकटलेल्या खरकट्यासारखा लपलेला असतो. या छोट्या मुलीचे नाव आहे मिशेला मोर्ले आणि हाती तो मोठ्ठा चषक घेऊन आला आहे तो आहे ब्रायन ओ’ड्रिस्कल. हा प्रस...

    पुढे वाचा »

रविवार, ६ मार्च, २०२२

भविष्यवाणी


  • पण माझ्यात तर असामान्य कौशल्य आणि शक्ती नाहीयेत." हॅरी न राहवून बोलून गेला. “आहेत, तुझ्याकडे आहेत," डम्बलडोर ठामपणे म्हणाले. “तुझ्याकडे एक शक्ती अशी आहे, जी वॉल्डेमॉर्टकडे कधीच नव्हती. तू-" “मला माहीत आहे!" हॅरी अधिरेपणाने म्हणाला. "मी प्रेम करू शकतो!” मोठ्या मुष्किलीने तो हे शब्द गिळू शकला की, त्याचा काय उपयोग होणार आहे?' “होय हॅरी, तू प्रेम करू शकतोस." डम्बलडोर म्हणाले. पण त्यांच्याकडे पाहून असं वाटत होतं, की जे काही बोलता बोलता हॅरी थांबला, ते त्यांना चांगलंच माहीत होतं. "तुझ्या बाबतीत जे काही घडलं, त्याचा विचार करता ही एक उल्लेखनीय बाब आहे. हॅरी, तू किती विलक्षण आहेस, हे कळायला तू अजून तू फारच लहान आहेस." हॅरीने थोडंसं निराश होऊन विचारलं, "याचा अर्थ, भविष्यवाणी जेव्हा असं म्हणते की, माझ्यात 'अशा काही शक्ती असतील, की ज्यांची सैतानी शहेनशहाला कल्पनासुद्धा असणार नाही,' तेव्हा तिला फक्त प्रेमच अभिप्रेत असतं का?” "होय- फक्त प्रेम " डम्बलडोर म्हणाले. "पण हॅरी, तू हेही कधी विसरू नकोस, की भविष्यवाणी जे काही ...

    पुढे वाचा »

रविवार, ३० जानेवारी, २०२२

वेचताना... : तुझे आहे तुजपाशी


  • मला कुणाचीच भूमिका घ्यायची नाही. मला माझीच भूमिका घ्यायला हवी. भूतकालभोगी जनतेमध्ये बहुसंख्य मंडळी भूमिकाच काय पण जगण्याची चौकटही भूतकालातून, इतरांकडून स्वीकारत असतात. आणि तीच आपल्यासाठी योग्य आहे हे स्वत:ला नि इतरांना पटवण्यामध्ये आपले आयुष्य व्यतीत करत असतात. आपली भूमिका, जगण्याची चौकट ही स्वत:ची निर्मिती नसली, तरी निदान आपली निवड असावी इतपत स्वातंत्र्य घेण्याचीही त्यांची तयारी नसते. त्यामुळे वारशाच्या कुबड्यांनाच ते आपला आधार करून जगत राहतात . कारण 'लादलेल्या भूमिकेहून वेगळी भूमिका घेण्याचे स्वातंत्र्य आपल्याला नाही' असा बहुतेकांचा समज असतो. आणि 'ते आहे' याचे भान असलेल्या इतरांतील बहुसंख्या स्वातंत्र्य या संकल्पनेलाच घाबरून असते. आणि म्हणून ते सारे सामाजिक, कौटुंबिक वारशाचे जोखड फुलांचा हार असल्याचे मानून मिरवत असतात. अनेक जण आणखी पुढे जाऊन त्या वारशाच्या गाठोड्याला अभिमानाचे, अभिमानाला अस्मितेचे आणि अखेरीस अस्मितेला परपीडनाचे रूप देत आपल्या मनातील न्यूनगंडावर मात करण्याची धडपड करत असतात. सुरुवातीला उद्धृत केलेलं वा...

    पुढे वाचा »

गुरुवार, २७ जानेवारी, २०२२

स्थितप्रज्ञस्य का भाषा


  • श्याम: वासूअण्णा... वासूअण्णा- वासू: (समोर येऊन उभा राहतो. बोलत नाही.) श्याम: अरे राम राम राम. हे सूत काढायचं काम इतकं अवघड असेल असं वाटलं नव्हतं मला. ह्या गीतानं मला सूत काढायला दोन दिवसांत शिकवते म्हणून वचन दिलं आणि स्वतः कुठं गायब झाली कुणास ठाऊक ! गीता आचार्याच्या बरोबर बद्रिनारायण शेठजींच्या घरी गेली का वासूअण्णा? वासू: (मानेने नाही म्हणतो.) श्याम: नाही गेली ? मग कुठे गेली ? वासू: (खुणेने 'कोण जाणे' असा भाव व्यक्त करतो.) श्याम: मग नीट सांग ना-हे असं (त्याने केलेल्या खुणेसारखे करीत) काय ? बोलायला काय झालं? अहो, गीता काय करतेय् ? वासू: (खुणेने वाचते आहे असे दाखवतो.) श्याम: वाचते आहे ? मग बोलत का नाही ? वासू: लावलंत बोलायला ? आचार्यांनी मला आजचा दिवस मौन पाळायला सांगितलं होत. सकाळपासून दहा वेळा मोडायला लावलं मला. अगदी भल्या पहाटे माळीबुवा आले ठणाणा करीत बागेतला पाईप फुटला म्हणून. मी त्याला पाटीवर लिहून सांगितलं की, प्लंबरकडे जा- आता एवढा म्हातारा झाला, त्याला प्लंबरमधला प्ल वाचता येईना. वाचून दाखवावं लाग...

    पुढे वाचा »

मंगळवार, २५ जानेवारी, २०२२

लोकशाहीच्या नावानं चांगभलं


  • One heart-bit away from Presidency and not a single vote is cast in my name. Democracy is so over-rated.      - Frank Underwood ( House of Cards : Season 2, Episode 2) लोकशाही म्हणजे ’लोकांचे, लोकांसाठी, लोकांनी चालवलेले राज्य’ (Democracy is government of the people, by the people, and for the people) ही अब्राहम लिंकनने केलेली व्याख्या आपण नागरिकशास्त्राच्या परीक्षेसाठी पाठ केलेली असते. जिथे अभ्यासक्रमात नागरिकशास्त्र हा विषय इतिहासाला जोडलेला असतो, त्या देशात नागरिकशास्त्राकडे पाहण्याचा दृष्टिकोन किती उदासीनतेचा असतो हे ध्यानात यावे. वास्तविक एखाद्या राज्याला, व्यवस्थेला इतिहासापेक्षा वर्तमानाचे नियोजन, प्रशासन नि संचालन यांची घडी बसवण्यास अत्यावश्यक असलेल्या नागरिकशास्त्राचे महत्त्व अधिक असायला हवे. पण भूतकालभोगी समाजाला इतिहासाभोवती निरांजने ओवाळताना वर्तमानाचा विसर पडत जातो , आणि पर्यायाने नागरिकत्व नि नागरिकशास्त्र हे उपेक्षेचे विषय होऊन राहतात. याचा अपरिहार्य परिणाम म्हणून लोकशाही या व्यवस्थेबद्दल, तिने देऊ केलेल्या अधिकारांबद्दल, आणि एक य...

    पुढे वाचा »

शुक्रवार, ३१ डिसेंबर, २०२१

वर्षान्त विशेष: सण आले जुळुनि... (उत्तरार्ध)


  • ( हा दीर्घ लेख दोन भागांत प्रसिद्ध होतो आहे. याचा पूर्वार्ध २५ डिसेंबर रोजी प्रसिद्ध झाला आहे . तर हा उत्तरार्ध आज वर्षअखेरीस प्रसिद्ध होतो आहे.) सण आले जुळुनि... (पूर्वार्ध)   << मागील भाग मागील लेखार्धाच्या सुरुवातीलाच आलेल्या ओलाफच्या गाण्यात ’मेले कलिकी’ असा एक उल्लेख आला आहे, त्यामागचा इतिहासही मजेशीर आहे. प्रशांत महासागरातील हवाई बेटे ही अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांच्या अधिपत्याखाली आहेत. तेथील बहुसंख्या ख्रिश्चन आहे. त्यामुळे ख्रिसमससह बहुतेक ख्रिस्ती परंपरेतील सण तिथेही साजरे केले जातात. पण फरक असा आहे, की ही बेटे अमेरिकेच्या मूळ भूमीपासून बरीच दक्षिणेला म्हणजे उष्ण कटिबंधात येतात. त्यामुळे अमेरिकेत डिसेंबरमध्ये सुरू होणारा हिवाळा तिथे आणखी काही आठवड्यांनी सुरु होतो. त्यामुळे ख्रिसमस काळात तिथे चक्क उष्ण हवामान असते. त्याचे प्रतिबिंब रॉबर्ट अलेक्स अ‍ॅंडरसन या गीतकाराच्या ’मेले कलिकीमाका’ या गाण्यात उमटलेले आहे. हे मेले कलिकी अथवा कलिकीमाका काय भानगड आहे असा प्रश्न चटकन डोक्यात आला असेल. त्यामागे भाषिक कारण आहे! हवाई बेटांवरील लोकांची उच्चाराची पद्धत - मूळ स्थ...

    पुढे वाचा »

शनिवार, २५ डिसेंबर, २०२१

वर्षान्त विशेष: सण आले जुळुनि... (पूर्वार्ध)


  • ( हा दीर्घ लेख दोन भागांत प्रसिद्ध करतो आहे. याचा हा पूर्वार्ध आज २५ डिसेंबर रोजी प्रसिद्ध होतो आहे, तर उत्तरार्ध ३१ डिसेंबर रोजी प्रसिद्ध होईल'. या दोन दिवसांचे औचित्य लेखांमध्येच स्पष्ट होईल. ) बॉलिवूड चित्रपटांच्या बहुसंख्य चित्रपटाच्या प्रेमींना चित्रपट म्हटले की ’कुणाचा चित्रपट?’ असा प्रश्न विचारण्याची सवय आहे. कारण चित्रपट हे हीरो अथवा हीरोईन म्हणून निवडलेल्या नट अथवा नटीच्या चाहत्यांच्या अंधप्रेमावरच अधिक चालतात. चित्रपटाचा हीरो शाहरुख खान आहे, संजय दत्त आहे किंवा कतरिना कैफ हीरोईन आहे म्हणून अधिक काही न विचार करता डोळे मिटून तिकिट काढणारे चाहते या चित्रपटसृष्टीचे आधार आहेत. टॉलिवूड म्हणून ओळखल्या जाणार्‍या तमिळ चित्रपटसृष्टीत तर या अभिनेत्यांची देवळे, फॅन-क्लब वगैरेपर्यंत प्रगती(?) झालेली आहे. हॉलिवूडची स्थितीही फार वेगळी आहे असे म्हणता येणार नाही. त्यामुळे चित्रपटाबद्दल बोलताना तो अभिनेता वा अभिनेत्री आणि त्याची/तिची भूमिका/पात्र हेच केंद्रस्थानी राहते. पण अनेकदा असे होते, की चित्रपटाच्या पटकथेमध्ये दुय्यम असलेले पात्र साकारणारा एखादा तारकांकित नसलेला अभिनेता वा अभ...

    पुढे वाचा »