-
काहीतरी उत्तर द्यायला कमल सरसावत होती. पण तितक्यात मागून कुणीतरी तिला डिवचल्याचे जाणवले. तिनं मागे वळून पाहिले तेव्हां शिवनाथ म्हणाला, “आतां ही चर्चा राहू दे." कमलनें विचारलें, "कां ?" शिवनाथने नुसतें उत्तर दिलें, "असंच सहज !" एव्हढेच बोलून तो गप्प राहिला. त्याच्या बोलण्याकडे कुणी विशेष लक्ष दिले नाहीं. त्या उदास आणि विचुक नजरेच्या मागें कोणती गोष्ट छपून राहिली होती ती कुणाला कळली नाहीं कीं कुणी कळून घ्यायचा प्रयत्न केला नाहीं. कमल म्हणाली, "अं: ! असंच सहज का ? घरी जायची घाई झालीय वाटतं ? पण घर तर बरोबरच आहे !" असे म्हणून ती हंसली. आशुबाबू ओशाळले, हरेंद्र अक्षय गालांतल्या गालांत हंसले, मनोरमेनें दुसरीकडे नजर फिरवली, पण ज्याला उद्देशून हे उत्तर आलें होतें त्या शिवनाथच्या सुंदर चेहेर्यावरची एक रेषासुद्धां बदलली नाहीं- जसा कांहीं एक दगडी पुतळाच - कांही दिसत नाहीं की कांही ऐकू येत नाहीं. हा विक्षेप अविनाशला असह्य झाला होता. तो म्हणाला, "माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या." कमल म्हणाली, "पण ...
पुढे वाचा »
RamataramMarquee
‘प्लरिबस’च्या निमित्ताने... - १३ : गरजा, मागणी आणि पुरवठा ‘प्लरिबस’च्या निमित्ताने... - १२ : जठराग्नी शमवाया भूतां ‘प्लरिबस’च्या निमित्ताने... - ११ : अद्यतनीकरण (Update) ‘प्लरिबस’च्या निमित्ताने... - १० : नव्या व्यवस्थेकडे ‘प्लरिबस’च्या निमित्ताने... - ९ : सर्वे सुखिन: सन्तु सण गेले विरुनी ‘प्लरिबस’च्या निमित्ताने... - ८ : धर्म आणि सहजीवन प्लरिबस’च्या निमित्ताने... - ७ : वैय्यक्तिक संपत्ती नि विषमता
बुधवार, १७ मे, २०२३
वारसा आणि विचार
Labels:
अनुवाद,
पुस्तक,
भा. वि. वरेरकर,
शरच्चंद्र चॅटर्जी,
शेषप्रश्न
सोमवार, ८ मे, २०२३
तहान
-
दुपारची डुलकी झाल्यावर, पुन्हा कोवळी पानं, भेंड, कळे, मोहाची दोडी फळं खात, उड्या हाणीत हळूहळू वानरांची टोळी पाण्याच्या दिशेनं सरकू लागली. कडक उन्ह होतं. अशा उन्हात जिवाचं पाणी-पाणी होणं अगदी साहजिक होतं. पण पाण्यावर जाणं, ही या निर्मनुष्य अरण्यात फार जोखमीची गोष्ट होती. इथं पाण्याच्या आसपास आणि पाण्यात काळच दबा धरून बसला होता. पाणी हे जीवन होतं, तसंच मरणही होतं. म्हणून वानरं कधी मोठ्या जलाशयावर तहान भागविण्यासाठी जात नसत. ओढ्या-ओघळींच्या डबक्यातलं चुळकाभर पाणी त्यांना पुरेसं होई. आता उष्णकाळ होता. जंगलातलं सगळीकडचं पाणी आटलेलं होतं. तळ्याच्या काठी जाऊन पाणी पिण्यावाचून दुसरा काही पर्याय नव्हता. या झाडावरून त्या झाडावर उड्या टाकत, तळ्याकाठच्या एका उंच सागावर हळूहळू सगळी टोळी जमा झाली. हे झाड पाण्याच्या काठावर होतं. सुमारे साठ पावलांचं अंतर होतं आणि ते अंतर पार करून पाणी पिऊन, परत झाडावर येणं हीच गोष्ट फार जोखमीची होती. साग झाडीच्या कडेवर होता. मागे टेकडी होती आणि गर्द झाडं-झुडपं होती. या जाळकटात दबा धरून कोणीही हिंस्र पशू बसला असण्याची श...
पुढे वाचा »
Labels:
कादंबरी,
पुस्तक,
व्यंकटेश माडगूळकर,
सत्तांतर
शनिवार, ६ मे, २०२३
अॅलिस आणि आरसा
-
ही अॅलिस आहे. -मग राणी एका झाडाला टेकून बसली, आणि आपुलकीने अॅलिसला म्हणाली, "आता तू थोडी विश्रांती घे." अॅलिसने आश्चर्याने भोवती पाहिले व ती म्हणाली, "म्हणजे आम्ही अजून त्याच झाडाखाली आहोत की !" "होय तर! मग*, तुला काय हवे होते ?" "आता आपण जेवढे धावलो, तेवढे जर आमच्या देशात धावलो, तर कुठून तरी निघून कुठे तरी निराळ्या ठिकाणी जाऊन पोहोचतो आम्ही." अॅलिस म्हणाली. "मग तुझा देश अगदीच मद्दड असला पाहिजे. अगं, या ठिकाणी एकाच ठिकाणी राहायचे म्हणजे देखील अतिशय वेगाने धावत राहावे लागते." ही अॅलिस आहे. ती एक लहान, चुणचुणीत स्वच्छ डोळ्यांनी पाहणारी मुलगी आहे. थपडा, चापट्या खाऊन ओल्या मातीला कसला तरी आकार येतो, तसला तिला अद्याप तरी आलेला नाही. तो तिला चुकणार नाही, पण सध्या तरी तो नाही हे खरे. अनेकदा ती विनयशील आहे. पण ती प्रसंगी सावध आणि स्पष्ट देखील आहे. एकदा जेवायला बसल्यावर टेबलावर एका प्लेटमध्ये मटण आणून ठेवले जाते. तेव्हा राणी त्याची अॅलिसशी ओळख करून देते. मटण देखील प्लेटमधूनच किं...
पुढे वाचा »
Labels:
अनुभव,
जी. ए. कुलकर्णी,
पुस्तक,
माणसेः अरभाट आणि चिल्लर
सोमवार, ३ एप्रिल, २०२३
वेचताना... : डोह
-
( माणसाच्या जगण्याच्या विविध पैलूंमध्ये दिसणारी उत्क्रांती अथवा क्रांती यांची नोंद घेणारा एक स्तंभ लिहितो आहे. यापूर्वीही या ना त्या संदर्भात माणसाच्या टोळीजीवी अथवा जंगलजीवी ते नागरजीवी या स्थित्यंतराचा मागोवा घेत आलो आहे.त्याला समांतर ’बखर बिम्मची’ या जी. ए. कुलकर्णींच्या पुस्तकावरही एक मालिका लिहितो आहे. हे दोनही चालू असताना या दोन्हींला सांधणारे असे एक जुने पुस्तक पुन्हा एकवार समोर आले आणि त्या अनुषंगाने त्या दोन्ही लेखनांच्या दृष्टिकोनांची सरमिसळ होऊन तयार झालेला हा लेख. ) जंगलजीवींच्या तुलनेत नागर माणसाचे मूलभूत गरजांशी निगडित संघर्ष बरेच कमी झाले आहेत. जंगलजीवींना अन्न, पाणी नि निवारा या मूलभूत गरजांसाठी सजातीयांशी, अन्य सजीवांशी, निसर्गाशी सर्वांशीच संघर्ष करावा लागत असे. नागर मानवाने श्रमविभागणीचे तत्त्व अंगीकारले आणि मूठभरांनी केलेल्या कामाचे फायदे इतरांमध्ये वितरित करण्यास सुरुवात केली. यातून एकुण समाजाची कार्यशक्ती वाढली नि जंगलजीवींहून नागर मानवाचे कार्यकौशल्य अनेक पटींनी वाढले. आज नागर जीवनात नळाची तोटी उघडली की पाणी ...
पुढे वाचा »
शनिवार, १ एप्रिल, २०२३
रात्रपाळीचे शेजारी
-
...उंबरातली काळी सोनेरी पाखरे खाल्याने डोळे येत. सुजत. आणि दिवसाही उघडता येत नसत. मग आई मला हलके धरून मोरीपाशी घेऊन येई. ऊनसर पाणी पापण्यांच्या कडांना लावून त्या भिजवी. त्या न दुखवता सोडवून, दिसायला लागेल असे करी. पण डोळे आल्यावरचे थोरल्या आईचे औषध विलक्षणच होते. दोनदोन दिवस ती अंधारातच बसायला लावी. ऐकले नाही तर डोळ्यात फूल पडून दिसणार नाही, असा धाक दाखवी. नि रात्रीही कंदिलाऐवजी करंजेलाचे थंड दिवे लावून घरात जेवणे होत. दिवसाच्या अंधारात बसून राहायचे माझे एकाकीपण हलके व्हावे म्हणून आई, " माझे वाघळ काय करते आहे" असे सौम्य हसत मला विचारी. आणि वडाला टांगून घेणाऱ्या वाघळांसारखे आपलेही एक वाघळ झाले आहे असे वाटून माझी भीती उलट मोठी होत जाई. डोळे आल्याचे दुःख वाघळे नेहमी कसे सोसत असतील, समजत नसे. पण वाघळांचा दिवस रात्री उगवतो असे आई सांगे. रात्रीचा दिवस असलेली ती विक्षिप्त वाघळे मला उगीचच सारखी आठवत राहत. रात्री त्यांना कसे दिसत असेल यावर मी विचार करत बसे. नि त्यांचे दोन डोळे आपणांला मिळाले तर ते हातात घेऊन, काळोखातही दिसत कसे चालता येईल ते मी मनात चालून पाही. ...
पुढे वाचा »
सोमवार, २७ फेब्रुवारी, २०२३
सापळा
-
बाहेर रखरखीत ऊन होते, पण या दाट कोंडलेल्या अंधारात कोठे प्रकाशाचा कण नव्हता. हात पुढे करून चाचपडत प्रवासी थोडा पुढे सरकला, पण पायाखालची जमीन काचेची असल्याप्रमाणे निःशब्द, विलक्षण गुळगुळीत भासताच त्याच्या मनात भीती निर्माण झाली व तेथूनच मागे वळून निसटावे, असे त्याला वाटले. पण तेवढ्यात अनेक ठिकाणी तेजस्वी प्रकाशाचे पंखे उमटले, आणि त्या प्रकाशात भोवती पाहाताच विलक्षण भयाने त्याच्या अंगातील शक्तीच ओसरून गेली. भोवती इंद्रजाल निर्माण झाल्याप्रमाणे त्याच्याच सहस्र आकृती उमटल्या. त्याने बावरून डोळ्यांवर बोटे धरताच कानाकोपऱ्यात अनंत हालचाली झाल्या व प्रकट झालेल्या आकृत्यांनी निरनिराळ्या तर्हांनी बोटे उचलली. कारण भोवती सर्वत्र निरनिराळ्या कोनांत बसवलेले, छतापर्यंत पोहोचलेले भव्य आरसे होते. सर्वत्र प्रकाश होता, पण तो नेमका कोठून येत आहे हे समजत नव्हते. आणि या सार्यावर धुपाचा गंध असलेल्या धुराचे तलम पदर तरंगत होते. प्रवाशाने सारे धैर्य एकवटले व तो मागे वळून धावला. तोच दोन आरसे सहजपणे त्याच्या समोर सरकले व त्यावर आदळून प्रवासी मागे फेकला गेला. आता भोव...
पुढे वाचा »
रविवार, १९ फेब्रुवारी, २०२३
माकडिणीची कथा
-
नेमकी आजच मोलकरीण आली नव्हती, आणि घरातील सगळीच पिठे संपून बसली होती. म्हणून आईला गिरणीकडे तीन चार फेऱ्या कराव्या लागल्या. त्यात भर म्हणजे गल्लीतील सगळ्याच मोलकरणी गैरहजर असल्याप्रमाणे गिरणीत आज खूपच गर्दी होती, व तेथे ताटकळत राहून तिचे गुडघे मेणाचे झाले होते. मग घरी मुलांची जेवणे झाली, ती नेहमीप्रमाणे अगदी साग्रसंगीत झाली. बिम्मने पाण्याचा तांब्या टेबलावर लवंडला. बब्बीला आमटीच्या वाटीत शेवग्याच्या शेंगेचा एकच तुकडा आला होता तर बिम्मच्या वाटीत दोन तुकडे अगदी स्पष्ट दिसत होते. त्यांनी वाटीची ओढाताण केली, तेव्हा दोघांच्याही कपड्यांवर आमटी सांडली. आपापली ताटे उचलून ती मोरीत ठेवण्यासाठी जात असता बिम्मचे ताट वाटेतच खाली पडले. अखेर जेवणे संपली व मुले झोपायला वर गेली. तिने एक सुस्कारा सोडला असेल नसेल, तेव्हा गेट वाजले, व दारावरची घटा झणझणली. कपाळाला हात लावत आईने दार उघडले, तर वाणी दुकानदार समोर उभा ! तो म्हणाला, “तुमच्या यादीप्रमाणे सामान आणल आहे मी! उद्या गुरुवार, दुकान बंद. तेव्हा तुमची अडचण नको; म्हणून मीच सगळ्या पिशव्या सायकलीला अडकवून स्वतः आलो. कुठे ठेवू हे सामान?" "सगळे ...
पुढे वाचा »
शनिवार, १ ऑक्टोबर, २०२२
वेचताना... : जेरुसलेम, एक चरित्रकथा
-
'ऋषीचं कूळ आणि नदीचं मूळ शोधू नये' अशी आपल्याकडे एक म्हण आहे. तरीही माणसं आपला इतिहास धुंडाळतात, हजारो वर्षांपूर्वीच्या कुण्या श्रेष्ठ व्यक्तीशी आपले नाते जोडून त्याला आपल्या वर्तमानातल्या अस्तित्वाचा आधार बनवू पाहतात. अनेक वर्षांच्या परंपरा असलेला समाज यात आपल्या अस्मितांची स्थानेही शोधत असतो. ज्यू, ख्रिश्चन आणि इस्लाम या तीन 'बिब्लिकल' धर्मांचे आणि त्यांच्या असंख्य पंथोपपंथांचे श्रद्धास्थान असलेल्या 'जेरुसलेम' नगरीला या सार्या परंपरांमधे अनन्यसाधारण महत्त्व आहे. एकाच नगरीचे अस्तित्व आणि महत्त्व इतका दीर्घकाळ टिकून राहिल्याचे दुसरे उदाहरण इतिहासात नाही. त्यामुळे जेरुसलेमचा इतिहास हा श्रद्धाळूंच्या दृष्टीने जितका महत्त्वाचा तितकाच अभ्यासकांच्या दृष्टीनेही. पण जिथे श्रद्धांचा प्रश्न असतो तिथे त्या अभ्यासात वस्तुनिष्ठता येणे बव्हंशी अवघड दिसते . त्यातच जिथे संघर्ष असतो तिथे परस्परविरोधी दावे असतात. अशा परिस्थितीत अभ्यासकाचे कार्य अतिशय अवघड होऊन बसते. जेरुसलेम ही नगरी तीन धर्मांचे नि अनेक पंथांचे श्रद्धास्थान असल्याने आणि त्यावरील वर्चस्वासाठी असंख्य झालेल्या ल...
पुढे वाचा »
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)






