RamataramMarquee

सूची: अनुक्रमे ▶ वेचे ▶ वेचताना ▶ दृक-श्राव्य ▶

गुरुवार, २७ मार्च, २०२५

वेचताना... : उठाव


  • जी. ए. कुलकर्णी यांनी USIS साठी (आता American Library) कॉनरॅड रिक्टर या अमेरिकन लेखकाच्या पाच पुस्तकांचा अनुवाद केला होता. त्यांच्या नेहमीच्या पॉप्युलर प्रकाशनाऐवजी ‘परचुरे प्रकाशन मन्दिर’ कडून ही पुस्तके प्रकाशित झाली होती. रान (The Trees), शिवार (The Fields) व गाव (The Town) या तीन कादंबर्‍या मिळून एका कुटुंबाची, पर्यायाने एका वस्तीच्या स्थापना-विकासाची कथा सांगतात. ही The Awakening Land trilogy म्हणून ओळखली जाते. हे अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांच्या उदयकालावरचे रूपकच आहे. या खेरीज ‘स्वातंत्र्य आले घरा’ (The Free Man) आणि ‘रानातील प्रकाश’ (The Light in the Forest) या दोन छोटेखानी कादंबरिकाही या संक्रमणकाळाच्याच कहाण्या सांगतात. या पांचातील सर्वात अदखलपात्र– होय, अ-दखलपात्र – पुस्तक आहे ते ‘स्वातंत्र्य आले घरा’ ही कादंबरिका. मूळ कथानक अत्यंत फिल्मी म्हणावे असे तर आहेच, पण जीएंचा अनुवादही अतिशय खरबरीत म्हणावा असा. त्यांच्या पत्रव्यवहारात याबाबत उल्लेख आलेला स्मरतो. युसिसचे हे काम त्यांना प्रसिद्ध लेखक जयवंत दळवी यांच्या शिफारशीवरुन मिळाल्याचा उल्लेख त्यांनी कृतज्ञतेने केलेला आहे. त...

    पुढे वाचा »

उठाव


  • ते थोडे चालले असतील नसतील, तोच त्यांच्या मागे जलद पावलांचा आवाज ऐकू आला. हेन्नरने मागे वळून पाहिले. चांदण्यांच्या प्रकाशात एका स्त्रीची आकृती आपल्याकडेच वेगाने येत असलेली हेन्नरला दिसली. तिने लांब झगा घालून डोक्यावरून झाकून घेतले होते. तिला एकटीलाच पाहून त्याला फार आश्चर्य वाटले. “मला भेटायचं आहे तुम्हाला, लेफ्टनंट,” तिने हलक्या आवाजात म्हटले, पण यूनीला पाहताच ती थबकली. “सार्जंट, तू छावणीत जा परत.” हेन्नरने यूनीला पाठवून दिले. मान हलवीत यूनी चालू लागला. “हल्ली ससेच उलट कुत्र्यांच्या मागे लागू लागले आहेत ! दिवसच बदलून गेले अगदी!” जाता जाता त्याने बोलभाषेत काढलेले उद्‌गार हेन्नरच्या कानांवर पडले. “मला ते सांगितल्यावाचून राहवेना, लेफ्टनंट,” यूनी गेल्यावर ती म्हणाली, “जर तुम्ही ब्रिटिशांविरुद्ध लढण्यासाठी गेलात, तर तुम्ही आणि तुमचे पेन्सिल्व्हानियन डच शेतकरी, यांपैकी एकही सहीसलामत जिवंत येणार नाही.” “तुमच्या राजनिष्ठ मित्रांनी हे मुद्दाम सांगण्यासाठी पाठवले आहे का तुम्हाला?” हेन्नर तिरस्काराने म्हणाला. “मी माझ्या मनाप्रमाणे आले,” ती थो...

    पुढे वाचा »

सोमवार, २४ फेब्रुवारी, २०२५

चुंबन-चिकित्सा


  • “तुला जर माझ्या मुक्याचा इतका तिटकारा वाटत असेल तर परत नाही हो घेणार ! दुसरी एखादी असती तर तुझ्याशी बोललीसुद्धा नसती. पण मला तुझ्या न् तुझ्या नवऱ्याबद्दल माया वाटते ना!” म्हातारी का संतापली मला समजेच ना. माझे लग्न व्हायच्या आधी माझा नवरा जर्मनीत असताना त्याने जोडलेल्या माणसांपैकी ती होती. तो तिला ‘आजी’ म्हणे, तिने त्याला जर्मन शिकविले. त्याला परदेशात तिचे घर म्हणजे एक आसराच होता. पुढे मी जर्मनीत गेल्यावर त्याची बायको म्हणून तिने एखाद्या आप्ताप्रमाणे माझे स्वागत केले. चार ठिकाणी हिंडून चांगल्या कुटुंबात मला बिर्‍हाड बघून दिले. बर्लिनच्या विश्वविद्यालयातील दोन-चार अध्यापकांना भेटून माझे नाव नोंदविले. मी जरी कितीही कामात असले तरी पंधरा दिवसांतून एका शनिवारी संध्याकाळी तिच्याकडे जावयाचे व जेवून परत यावयाचे किंवा तिच्याकडेच राहावयाचे असा माझा क्रम असे. आजही मी नेहमीप्रमाणे घंटा वाजवल्यावर तिने दार उघडून मोठया प्रेमाने माझे स्वागत केले व नंतर संतापाने ती वरील वाक्य बोलली. म्हातारी म्हणजे एक लहानशीशी, नाजुक नाजुक, बाहुलीच होती जणू. तिचे पांढरे...

    पुढे वाचा »

सोमवार, १० फेब्रुवारी, २०२५

पाखरा जा, त्यजुनिया...


  • प्रास्ताविक: रमतारामाच्या विश्रांतीस्थळी काल ‘परतुनि ये घरा...’ मालिकेतील एक भाग प्रसिद्ध केला. त्यात मोहन राकेश यांच्या ‘आषाढ का एक दिन’ मधील कालिदासाच्या परतून येण्याच्या प्रसंगाच्या आधारे आकलन मांडले आहे. सुदैवाने या नाटकाचा मराठी अनुवाद माझ्याकडे आहे. त्यातून कालिदासाने मल्लिकेचा निरोप घेऊन कीर्ति-संपदेच्या वाटे चालू लागण्याचा आणि सारे भौतिक यश गमावून परतून येण्याचा असे दोन प्रसंग निवडून इथे देतो आहे. ‘परतुनि ये घरा...’ मध्ये केवळ त्या संगतीच्या संदर्भामध्ये कालिदासाचे मूल्यमापन तेवढे आले आहे. एकुण नाटकाबाबतचे, या वेच्यांबाबतचे विश्लेषण स्वतंत्रपणे ‘वेचताना...’ मालिकेमध्ये लवकरच मांडेन. --- (अंबिका डोळे मिटून काही क्षण स्थिर उभी. मग उदासपणे सर्वत्र पाहाते व खचून गेल्यासारखी पाटावर बसते. थाळ्यातील तांदूळ चोळता चोळता डोळे भरून येतात. ती डोळ्यांना पदर लावते. अस्फुट हुंदका, “भावना,... ओह ! " पदरात तोंड लपवते. प्रकाश मंदावत जातो. जराशाने हातात मशाल घेतलेला विलोम दारात उभा. अंबिकेकडे पाहून काही क्षण थबकतो. मग तिच्याजवळ जातो.) विल...

    पुढे वाचा »

शुक्रवार, ६ डिसेंबर, २०२४

दूरस्थ कुणी दे तुझ्या करी...


  • जी.ए. कुलकर्णी यांचे कथाकार म्हणून स्थान अनन्यसाधारण आहे. त्याचबरोबर त्यांचे एकांडेपण नि एकारलेपण हे मराठी साहित्यप्रेमींच्या अवाजवी कुतूहलाचा विषय बनून राहिले आहे. त्यांचा तो काळा चष्मा, त्यांच्या न झालेल्या भेटीचे सुरस चमत्कारिक किस्से चवीने चघळणे हे कधी वैचित्र्यप्रेमापोटी, तर कधी छुप्या असूयेपोटी होत असते. इंग्रजीत ज्याला introvert किंवा अगदी self-centered म्हणता येईल– मराठीमध्ये आत्मसंतुष्ट नव्हे पण आत्ममग्न– असे हे व्यक्तिमत्व, विक्षिप्तपणाच्या कथांचे नायक बनलेले. याउलट सुनीताबाई देशपांडे या करकरीत बुद्धिवादी, लोकांच्या गराड्यात राहूनही त्या-त्या व्यक्तीच्या कुवतीनुसार संवाद राखू शकणार्‍या, प्रसंगी कणखरपणे तो तोडण्यासही मागेपुढे न पाहणार्‍या. पुरुषप्रधान मानसिकतेच्या समाजात ‘पु.ल. देशपांडे यांची पत्नी’ हीच ओळख असलेल्या. कवि नि कवितांशी - जी.एं.च्याच भाषेत - आतड्याचे बंध असलेल्या; बुद्धिप्रधान व विवेकप्रधान विचाराच्या असून त्याचे करकरीत शुष्क तत्वज्ञानात रूपांतर होऊ न देणार्‍या. (याचे प्रत्यंतर घ्यायचे तर त्यांचा ‘ मनातलं अवकाश ’ हा ललितलेख-संग्रह पाहा.). पु.लं.ना जी.एं.चे आले...

    पुढे वाचा »

गुरुवार, ७ नोव्हेंबर, २०२४

अंतरीच्या या सुरांनी


  • समोरच्या झाडातून बुलबुल साद घालू लागला म्हणून गॅस बारीक करून मी गॅलरीत आले. त्याचे गाणे चालूच होते. त्या सुराच्या दिशेने खूप शोधले, पण तो कुठेच दिसेना. हा त्याचा नेहमीचच खेळ आहे. आणि मीही वेडी दर वेळी अशी धावत येते, फसवली जाते आणि मग वैतागतेही. आज मात्र काय झाले कोण जाणे, न रागावता तिथेच डोळे मिटून स्वस्थ बसले. मग त्या गोड सुरांची, समोरच्या त्या झाडांची, झाडांमागल्या आकाशाची, त्यात बागडणाऱ्या ढगांची, त्यांतून कोसळणाऱ्या जलधारांची, त्यांना पोटाशी पेणाऱ्या माझ्या धामापूरच्या तलावाची, त्यातल्या इवलाल्या माशांची, तिथल्या त्या संरक्षक टेकड्यांची, त्यांच्या कुशीतल्या, माझ्या रक्ताशी नाते सांगणाऱ्या, लाल लाल पाऊलवाटांची– साऱ्या साऱ्या आसमंताची, पंचमहातत्त्वांची सावली त्या मिटल्या डोळ्यांतून अलगद आत उतरली. ती अंतर्बाह्य पांघरून मी निवान्त हलकी हलकी झाले. आता या वयातही स्वर्गीय परी होण्याची ही अवस्था नेहमीची नाही. क्वचित कधी हा भाग्यशाली योग माझ्या वाट्याला येतो तेव्हा मला पंख फुटतात. नको असलेली, हवी असलेलोही, सगळी सगळी बंधने गळून जातात, आणि स्वच्छंद फुलपाखरासारखी मी एका अ‌द्भुताच्या प्रदेशा...

    पुढे वाचा »

मंगळवार, ८ ऑक्टोबर, २०२४

गेले... ते दिन गेले


  • वेगवेगळी फुले उमलली रचुनी त्यांचे झेले एकमेकांवरी उधळले गेले... ते दिन गेले... भ. श्री. पंडितांची ही कविता जेव्हा केव्हा ऐकते, तेव्हा तेव्हा गेल्या दिवसांविषयीची माणसाच्या मनातली हुरहूर किती सार्वत्रिक आहे, हे जाणवून मी नवल करीत राहते. अगदी लहान असताना रानात एकट्या पडलेल्या लाकूडतोड्याच्या मुलाची गोष्ट मी ऐकली होती. एक लहानगा सुंदर पक्षी त्याला मित्र मिळाला आणि न पाहिलेल्या जगाविषयीची किती तरी अद्भुत गाणी न् गोष्टी लाकूडतोड्याचा मुलगा त्या पाखराकडून ऐकत राहिला. मग त्याला वाटलं की, या पाखराला कायमचंच जवळ का नये ठेवू? त्यानं एक सुरेख पिंजरा बनवला, पण पाखरानं तो पिंजरा पाहिला मात्र, ते जे उडून गेलं, ते परत कधीच त्या मुलाला भेटलं नाही. लहानपणी ऐकलेल्या त्या गोष्टीतली अद्भुतता आणि सुंदरता आता उरलेली नाही मनात; पण वाटतं की, आपण माणसंही पुष्कळ वेळा त्या लाकूडतोड्याच्या मुलासारखी होतो. हातून निसटलेलं आयुष्य पकडून कायमचं जवळ ठेवण्याची तीव्र इच्छा करणारी, जुने निर्मळ आनंद साठवून हुरहुरणारी माणसं. आमचे देव तरी आमच्यापेक्षा वेगळे कुठे आहेत ? भव...

    पुढे वाचा »

बुधवार, २५ सप्टेंबर, २०२४

दशांशचिन्हांकित कविता आणि प्रमेय-प्रत्यंतर


  • त्यांनी ‘ चिमुकलीच कविता ’ शिकवायला घेतली ती या वर्षातील शेवटचीच कविता होती. नव्हे, ती शाळेतीलच शेवटची कविता होती. “यात एक ओळ फार झगझगीत आहे.” तातू हळूच म्हणाला. तो शेजारी बसला होता खरा, पण मनाने तो दूर कुठे तरी निघून गेला होता. कविता संथपणे चालली होती. गोंडस नाजुक चिमणी बाला हळूहळू स्पष्ट होत चालली. केस सरळच, पण काही मात्र कुरळे. कच्च्या पोवळ्यांच्या चकत्या करून लावल्याप्रमाणे वर्खी नखे (नखे लाखिया, दात मोतिया, आणि स्तनाकार पेले... यांची जपानी रमलाची रात्र चिमुकलीच कविता मोठी झाल्यानंतरची) विशेष प्रतिकार न करता, पण फारसे न झंकारता आम्ही त्या संथ ओळी ऐकत होतो, मग कसलीच चाहूल न दाखवता ती ओळ आली व सारे अंग थरारून गेले. तिच्या हनुवटीवरील तीळ म्हणजे तिच्या पुण्याईचे गणित करत असता विधीने दिलेले दशांश चिन्ह कमळाच्या परागतंतूंतील एक विजेच्या झळाळीने उजळ झाल्याप्रमाणे मी अगदी बावरून गेलो व सारेच विसरलो. नंतर बऱ्याच वर्षांची गोष्ट आहे. खऱ्या काव्याचे लक्षण कसे ओळखावे, हे आपल्यापुरते सांगताना ए. ई. हाउसमनने म्हटले आहे : एखादी ओळ आठवता...

    पुढे वाचा »