RamataramMarquee

सूची: अनुक्रमे ▶ वेचे ▶ वेचताना ▶ दृक-श्राव्य ▶

रविवार, २० ऑक्टोबर, २०१९

देहसूक्त


  • ...खाली गर्दी वाढल्याने होणारा आवाज त्याला अस्पष्टपणे ऐकू येऊ लागला व तो उठून खाली येण्यासाठी निघाला. काही अंतरावर सारा वेळ उभे असलेले सेवक तत्परतेने त्याच्या समोर निघाले. लाल गरुड खाली आला व त्याच्यासाठी अंथरलेल्या चादरीवर बसताना आपला बेडौलपणा इतरांच्या ध्यानात येणार नाही, अशा त-हेने अंग उतरवून तो प्रशस्तपणे बसला. जेथे खडकातील घरांचे थर सुरू होत होते, तेथे पायथ्याशी सपाट पटांगणावर वर्तुळाकार आग पेटवली होती, तिच्यापासून काही अंतरावर, सर्वांग काळे रंगवलेल्या आणि अस्वलांची केसाळ कातडी पायाभोषती गुंडाळलेल्या पुरुषांचे आणखी एक वर्तुळ तयार झाले होते. जाळाच्या वर्तुळाच्या मध्यभागी गवताच्या उशीवर आरशाचा एक तुकडा ठेवला होता. कोणत्याही पवित्र नृत्यात स्त्रियांना स्थान नव्हते, त्यामुळे त्या गर्दीगर्दीने घरांच्या पसरट छपरांवर बसल्या होत्या. सारी तयारी आहे की नाही हे पाहाण्यासाठी लाल गरुडाने सर्वत्र नजर फिरवली. सूर्य आता तिरपा झाला होता व त्याच्या प्रकाशाचा एक किरण आरशामधून निघून समोरच्या कोरीव गोत्रस्तंभावर पडला होता. लाल गरुडाने समाधानान...

    पुढे वाचा »

शनिवार, १९ ऑक्टोबर, २०१९

नरोटीची उपासना


  • धर्मभ्रष्ट म्हणजे काय? पन्नास पाउणशे वर्षांपूर्वी इंग्रजी विद्येचा आपल्या देशात प्रसार होऊ लागला आणि त्यामुळे नवे आचारविचार सुरू झाले. त्यावेळी धर्म बुडाला, आता कलियुग आले, विनाशकाल जवळ आला असे उद्गार सर्वत्र सनातनी लोकांच्या तोंडून ऐकू येऊ लागले. घरोघरी आईबाप आपली मुले धर्मभ्रष्ट झाली - त्यावेळच्या भाषेत सुधारक झाली, असे म्हणू लागले होते. त्यावेळी मुले धर्मभ्रष्ट झाली म्हणजे काय झाले, असे जर त्यांना कोणी विचारले असते तर त्यांनी काय उत्तर दिले असते? विश्वनाथ नारायण मंडलिक, दादोबा पांडुरंग यांच्या चरित्रांत ही उत्तरे सापडतात. अमक्या दिवशी हजामत करणे निषिद्ध असताना ती केली, अमक्या वारी अमुक खायचे नसताना खाल्ले, घेर्‍याचा आकार कमी केला, एकादशीला बटाटे, रताळी हे खाण्याऐवजी मुळे, गवारी, गहू हे खाल्ले, अशा प्रकारच्या या तक्रारी होत्या. धर्म म्हणजे मानसिक उन्नती आहे, धर्म म्हणजे हृदयाचा, सद्गुणांचा विकास आहे, असे कोणाच्याही मनात आले नाही. धर्म म्हणजे संयम, निग्रह, भूतदया, परमेश्वरावरील श्रद्धा, सत्यनिष्ठा, दया, क्षमा, शांती, विद्येचा अभिलाष, स्वत्वाचा अभिमान असे अर्थच त्यावेळी कोणी केले ना...

    पुढे वाचा »

शुक्रवार, १८ ऑक्टोबर, २०१९

मलिका-ए-गझल


  • कॉलेजात पाऊल ठेवल्यावर कितीतरी वर्षांनी बेगम अख्तरचा आवाज अचानक ऐकायला आला तेव्हा ती नवी गझल एका बकाल वस्तीतल्या खरखरणाऱ्या रेडियोवर कानांत प्राण आणून ऐकली होती. स्तब्ध झालेल्या कोकिळेला पुन्हा कंठ फुटला होता. वसंत ऋतू पुन्हा बहरला होता. मग बेगम अख्तरचं गाणं रेडियोवर आणि रेकॉर्डवर पुष्कळ ऐकलं. पण प्रत्यक्ष तिची मैफल ऐकायला मिळाली ती कॉलेजजीवन संपून गेल्यावर चारपाच वर्षांनी. आकाशवाणीच्या नागपूर केंद्रानं धनवटे रंगमंदिरात आयोजित केलेला कार्यक्रम होता तो. पडद्यावर पाहिलेली अख्तरी आणि समोर बसलेली पंचेचाळीस वर्षांची प्रौढा बेगम अख्तर यांच्यात जमीनअस्मानाचा फरक होता. तसं पाहिलं तर तिचा विशीतला अवखळ, चंचल आवाजही आता स्थिरावला होता. त्यात एकप्रकारची आकर्षक धीरगंभीरता आली होती. तिच्या तोंडून 'ऐ मोहब्बत तेरे अंजाम पे रोना आया' ही ओळ बाहेर पडली अन् चटकन डोळ्यांत पाणी आलं. साक्षात बेगम अख्तर आपल्या डोळ्यासमोर स्वत: गात आहे : जाने क्यों आज तेरे नाम पे रोना आया....तिचा तो दर्दभरा बुलंद स्वर वर चढत चढत किंचित फाटला की दु:खाची पराकाष्ठा होऊन काळीज फाटल्यासारखं वाटायचं. एक गझल तर अजून विसरायला ...

    पुढे वाचा »

बुधवार, १६ ऑक्टोबर, २०१९

पातकांची परिमिती


  • “मला वाटले होते, एखादे अत्यंत सडलेले प्रेत आभाळात टांगून ठेवावे त्याप्रमाणे माझे पातक सगळ्यांना माहीत असेल. मी माझ्या पवित्र नेत्याचा घात केला. त्याच्या वस्त्राचे आदराने चुंबन घेत आहे असे दाखवून मी द्रोह केला आणि त्याला शत्रुसैनिकांच्या आधीन केले. शेवटी त्याला स्वतःचा अवजड क्रूस खांद्यावर घेऊन ओढत जात, त्याच क्रूसावर आपले आयुष्य अत्यंत वेदनेने संपवावे लागले. त्याचे पवित्र रक्तच माझ्या डोक्यावर थापले आहे. तू मला ओळखत नाहीस ? अरे, मी ज्यूडास आहे." समोर जमिनीतून एकदम एक विषारी सर्प उभा राहिल्याप्रमाणे डॉन दचकला आणि मागे सरला. क्षणभर त्याची वाचाच गेली व तो थिजलेल्या डोळ्यांनी पाहतच राहिला. नंतर त्याने स्वतःला सावरले व म्हटले, " तू! पण तू ते का केलेस?" ज्यूडासने अविश्वासाने त्याच्याकडे पाहिले. तो म्हणाला, "मला असे कोणी सुद्धा विचारले नव्हते. सगळ्यांचा पूर्ण विश्वासच की, मी ते पातक चांदीच्या तीस नाण्यांसाठी केले. तुलादेखील तसेच वाटते का? अरे जन्माचे दारिद्र्य जाईल एवढी संपत्ती मिळण्याजोगी असती तर कदाचित मनाची चलबिचल झाली ...

    पुढे वाचा »

मंगळवार, १५ ऑक्टोबर, २०१९

तिढा


  • रात्री बाराच्या नंतर यशीत धुराळा उडाला. कर्कश्श आवाज करीत पोलिसांच्या गाड्या आल्या. कुत्री भुंकायला लागली. सगळा कल्लोळ मातला. भर्रर्र करीत गाड्या मारोतीच्या पाराजवळ थांबल्या. पुढच्या गाडीला पिवळा दिवा. ज्याला सुगावा लागला, त्यांनी आपली दारं अधिक गच्च केली. पोलिसांनी पटापटा उड्या मारल्या. फुंकलेल्या शिट्यांनी कुत्र्यांना अधिकच चेव आला. मारोतीच्या पुढे मन्मथ वाण्याचं घर. पोलिसांनी दारावर काठी आपटली. दार उघडण्याच्या तयारीत कोणीच दिसंना. आवाज आणखी वाढला. पोलिसांच्या गाडीचा आवाज ऐकला तरीही मन्मथनं धीट मन करून विचारलं. "कोणंय?" "दार उघड आधी, मग सांगतो.” आवाजात बेदरकारपणा, मन्मथनं दार उघडलं. नाव विचारल्यानंतर पोलीस म्हणाले, “अप्पा, जरा बाहेरच या तुम्ही.” मन्मथ बाहेर आला. पोलिसांनी विचारलं, “गावातल्या पुतळ्याचा चबुतरा कोणी उखडला?" “काय की बा, मी भाईरगावाहून आजच आलो.” मन्मथनं गावाहून आल्याचं एसटीचं तिकीटही दाखवलं. नंतर पोलिसांनी विचारलं, “बरं मग आम्हाला सरपंचाच्या घरी घेऊन चल, पोलीस पाटलाचं घर किती दूरंय इथून?" ...

    पुढे वाचा »

रविवार, १३ ऑक्टोबर, २०१९

दुसरा रस्ता


  • ५ नोव्हेंबर १९९० ची मध्यरात्र असावी. आईने झाकच्या अंगावरची चादर खसकन् ओढली. झेड उठ पटदिशी. तुझी बॅग भर. आपल्याला हे घर सोडून ताबडतोब निघायचंय... त्या सात वर्षाच्या लहानग्याला काहीच कळेना अचानक मध्यरात्री कुठं जायचंय ? आई काहीच सांगायला तयार नव्हती. कुठं जायचं, किती दिवसाकरिता काहीच माहीत नाही. फक्त बॅग भर. दिवाणखान्यातील टीव्ही सुरूच होता. त्यात कुणीतरी एकजण रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसत होता. नीट दिसेपर्यंत आईने टीव्ही बंद केला. नंतर त्याला कळलं, त्याच्या वडिलांनी 'ज्युईश डिफेन्स लीग' या ज्यूंच्या कट्टर संघटनेच्या संस्थापकाचा खून केला होता. अल सय्यद नोसेरनी मॅनहटनच्या हॉटेल मेरियटमध्ये रब्बा मिर कहान यांना गोळ्या घालून मारले होते. अल सय्यद नोसेरला या खुनाबद्दल अटक करण्यात आली होती. पोलिसांच्या पकडा-पकडीत सय्यद नोसेरलाही गोळी लागली होती. टीव्हीवर कोणतातरी वेगळा शो पाहणाऱ्या झाकच्या आईला हे लगेच समजले, कारण शो मध्येच थांबवून ही ब्रेकिंग न्यूज दाखविण्यात आली. तिला तिच्या शेजारणीचाही फोन आला, 'अगं तुझ्या नवऱ्याची बातमी येतेय...

    पुढे वाचा »

शनिवार, १२ ऑक्टोबर, २०१९

त्रिशंकू


  • पक्षातली आणि यनियनमधली डी-कास्टाची पातळी वाढू लागली तसे त्याला या दोन्ही संघटनांमधले दोष लक्षात येऊ लागले. स्वार्थीपणा ध्यानात येऊ लागला. पक्षाची भोंगळ धोरणं खटकू लागली. पक्षातल्या काही पुढाऱ्यांचा भोंदूपणा जाणवू लागला. पक्षाच्या इज्जतीसाठी संप करणं त्याला पसंत नव्हतं. संपासाठी तसंच कारण असायला हवं आणि न्याय्य कारणासाठी केलेला संप मिनिस्टरनं आश्वासन दिलं म्हणून मागं घ्यायचा? पुढच्या निवडणुकीत त्यावेळच्या युनियनचा सेक्रेटरी काँग्रेस आमदार बनला तेव्हा त्याला त्या घटनेतलं रहस्य कळलं. पक्षाच्या आणि युनियनच्या पुढाऱ्यांचे शानदार फ्लॅटस् त्याला खटकू लागले. आणि त्यांची लफडीही. रिट्झमधून यथेच्छ मेजवानी झोडून आल्यावर यांना झोपडपट्टीतल्या कामगारांसमोर समाजवादाच्या नावाखाली शपथा घेणं जमतं तरी कसं याचं त्याला आश्चर्य वाटत होतं. त्याचा संताप वाढत होता. पक्षाची धोरणं अस्पष्ट, संदिग्ध आहेत याची त्याला खात्री वाटू लागली होती. आजच्या दुर्दशेला कारणीभूत ठरलेला प्रस्थापित समाज मोडून काढून नवा समाज निर्माण करण्याची पक्षाची आण होती. पण ही शपथ फक्त पुढाऱ्यांच्य...

    पुढे वाचा »

मंगळवार, ८ ऑक्टोबर, २०१९

टेकडी


  • रस्त्यावरचा उजेड संपला आणि निखळ पायवाट अधिक स्पष्ट दिसू लागली. आजूबाजूला झाडांचे कसलेही चिन्ह दिसत नव्हते. गवताचा विशिष्ट ताजा वास तेवढा येत होता. अनेक रानफुलांच्या सुगंधाचे व काहीसे मातीच्या ओलसर गंधाचे मिश्रण त्यात होते. सक्सेना झपाझप पावले टाकत चालला ह्ता. त्यामुळे गोपीचंदची थोडीशी तारांबळ उडत होती. सक्सेना अधीर झाल्यासारखा- बर्‍याच दिवसांनी एखाद्या लहानपणीच्या मित्राला भेटायला चालल्यासारखा - चालला होता. गोपीचंद अधूनमधून थांबे आणि छाती भरभरून हवा आत घेई. मग घाईघाईने पावले पुढे टाकू लागे, वर जाता जाता पाचाची पंधरा मिनिटे सहज होऊन गेलेली होती. वारा अधिक जोरकस झाला होता. वर एके ठिकाणी थोडीशी सपाट जागा होती आणि एक झाड होते. झाडाच्या पायथ्याशी चार सहा मोठमोठाले दगड होते. सक्सेना काही वेळ नुसताच वार्‍यात उभा राहिला. नंतर तो दगडावर जाऊन बसला. त्याने खिशातून सिगरेटचे पाकीट काढले. गोपीचंद वार्‍यावर उभा राहून दूरवर बघत होता. लांबलांबच्या लुकलुकत्या दिव्यांखेरीज तिथे काहीच दिसत नव्हते. ह्या टेकडीवर सक्सेना कशासाठी आला आहे, हे त्याला समजत नव्हते...

    पुढे वाचा »