-
मला माझ्यासारख्याच विक्षिप्तांबद्दल नेहमीच कुतूहल असते. मग ‘बिग बँग थिअरी’ बघताना मी स्वत:ला शेल्डन कूपरशी रिलेट करुन मी ही त्याच्यासारखाच बुद्धिमान असल्याचा समज करुन घेतो. किंवा ‘डॉक मार्टिन’मधल्या डॉ. मार्टिन इलिंगहॅमसारखा मी ही ‘ill mannered’ असलो तरी ‘well meaning' माणूस असल्याचा ग्रह करून घेतो. आपल्यासारखी काही गुणवैशिष्ट्ये दाखवणार्या व्यक्तींचे इतर गुणही आपल्यात आहेत हा –सोयीचा– भ्रम फारच सार्वत्रिक आहे. एखाद्या गटाशी जोडून घेत त्या गटाच्या गुणांचे क्रेडिट अनायासे पदरी पाडून घेणारेच बहुसंख्य असतात. पण ते जाऊ दे. चित्रपट, मालिका वगैरे पाहताना विषय, मांडणी, आकलनाला वाव आणि अखेर पदरी काय पडेल (What will I take home?) या विचाराने मी निवड करत असतो. एकाच धाटणीचे– गणिती भाषेत मांडून पाहिले तर काही पूर्वसुरींचे अवतार, पुनर्मांडणी सदृश दिसत असतील अशांवर मी फुली मारत असतो. शेक्स्पीअरच्या कुठल्याशा नाटकातील पात्रांची नावे घेत पुन्हा अंडरवर्ल्डमधील सत्तासंघर्ष मांडून पैसा वसूल करणार्यांची चलाखी मी साफ उधळून लावतो, तसंच केवळ तेच ते कंबरेखालचे विनोद विकून पैसे कमवू पाहणार्या इंग्र...
पुढे वाचा »
RamataramMarquee
नेकी कर और गटर में डाल ‘प्लरिबस’च्या निमित्ताने... - परिशिष्ट : ‘पदार्पण’ : एक कल्पनाविस्तार (उत्तरार्ध) ‘प्लरिबस’च्या निमित्ताने... - परिशिष्ट : ‘पदार्पण’ : एक कल्पनाविस्तार (पूर्वार्ध) ‘प्लरिबस’च्या निमित्ताने... - १५ : उपसंहार ‘प्लरिबस’च्या निमित्ताने... - १४ : अंत:स्फोटाची अपरिहार्यता ‘प्लरिबस’च्या निमित्ताने... - १३ : गरजा, मागणी आणि पुरवठा ‘प्लरिबस’च्या निमित्ताने... - १२ : जठराग्नी शमवाया भूतां ‘प्लरिबस’च्या निमित्ताने... - ११ : अद्यतनीकरण (Update)
सोमवार, १५ जानेवारी, २०२४
बेकी म्हणे...
शुक्रवार, १२ जानेवारी, २०२४
चिमण्या - १ : सहजीवन
-
या मालिकेच्या निमित्ताने... जवळजवळ दहा वर्षांपूर्वी मी माझे खेडे सोडले आणि अनेक माणसांचा, वास्तूंचा, पशुपक्ष्यांचा संबंध तुटला. प्रत्यक्ष सहवास राहिला नाही, तरी आठवणी राहिल्या. जसाजसा काळ जातो आहे, तशातशा या आठवणीही पुसट होत जात आहेत. आणखी काही वर्षांनी त्यापैकी काही आठवणी राहणारही नाहीत, कुणी सांगावे? मी खेडं सोडलं आणि घर-चिमण्यांशी असलेला माझा संबंधही तुटला. शहरात चिमण्या नाहीत असे नाही. माणसांची जिथे जिथे वस्ती आहे, तिथे चिमण्या असतातच, पण शहरात चिमण्या-कावळ्यांकडे ध्यान कुठे जाते? सदैव कलकल करणाऱ्या, वेगडे-बागडे रूप असलेल्या चिमण्यांपेक्षा ध्यान वेधणाऱ्या कितीतरी अन्य गोष्टी शहरात असतात. चिमण्यांकडे पाहतो कोण? आणि पाहण्याइतपत फुरसत तरी आहे कुणाला? माडगूळला आमच्या जुन्या घरी चिमण्या फार होत्या. इतक्या की, सारे घर चिमण्यांचे आहे आणि आम्ही आपले त्यात पाहुणे म्हणून राहत आहो असे वाटावे. माझ्या लहान भावंडांना दूधभात चाखताना, माझ्या आईला कधी ‘ये गं चिऊ, ये गं चिऊ’, अशा हाका मारून कल्पनेतल्या चिमण्यांना बोलवावे लागत नसे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत अनेक चिमण्या घरात वावरत असत. ...
पुढे वाचा »
सोमवार, ८ जानेवारी, २०२४
वेचताना... : चिमण्या
-
https://npr.brightspotcdn.com/ येथून साभार. आँधी आई ज़ोर शोर से, डालें टूटी हैं झकोर से। उड़ा घोंसला अंडे फूटे, किससे दुख की बात कहेगी! अब यह चिड़िया कहाँ रहेगी? हमने खोला अलमारी को, बुला रहे हैं बेचारी को। पर वो चीं-चीं कर्राती है घर में तो वो नहीं रहेगी! घर में पेड़ कहाँ से लाएँ, कैसे यह घोंसला बनाएँ! कैसे फूटे अंडे जोड़ें, किससे यह सब बात कहेगी! अब यह चिड़िया कहाँ रहेगी? - महादेवी वर्मा दीड-एक वर्षांपूर्वी आरे वनक्षेत्रातील झाडे रातोरात कापल्यावर होऊ लागलेल्या टीकेचा प्रतिवाद करताना एक मित्र म्हणाला, ‘एकशेचाळीस कोटींच्या जनतेला जगवण्यासाठी विकास हवा. त्यासाठी आवश्यक ते सारे केले पाहिजे.’ हे म्हणत असताना गरजेपेक्षा कैकपट कमवून बसलेला हा मित्र विकासाच्या प्रत्येक पेटीतला अतिशय मोठा हिस्सा हा गरजा आधीच भागलेल्यांनी बळकावलेला असतो, हे सोयीस्कररित्या विसरला. स्वत:च्या गरजा भागल्यानंतरही विकासाचा अधिकाधिक वाटा आपल्याकडे वळवून घेणार्या त्याच्यासारख्यांमुळेच एकशेचाळीस कोटींमधील बहुसंख्येच्या...
पुढे वाचा »
शनिवार, ६ जानेवारी, २०२४
लॉरेन्स आला रेऽऽ आलाऽ (अर्थात माध्यम-कुंई)
-
मिरानशाह हे आरएएफचं (१) हिंदुस्तानातलं सर्वांत लहान ठाणं अफगाण सीमेपासून दहा मैलांवर होतं. पठाणांचे तिथं वारंवार हल्ले होत असत. काटेरी तारांच्या कुंपणानं वेढलेल्या भूभागावर विटा आणि माती यांनी उभारलेल्या गढीवजा वास्तूला मिरानशाह फोर्ट म्हणत. आजूबाजूचा प्रदेश डोंगराळ होता. मिरानशाह इथं आरएएफचे सव्वीसजण आणि पाचशे हिंदुस्तानी जवान राहत. मात्र हे दोन्ही गट गढीत वेगवेगळ्या कक्षांत राहत असल्यानं त्यांचा एकमेकांशी क्वचितच संबंध येई. आरएएफच्या लोकांचं काम म्हणजे विमानाच्या धावपट्टीची देखभाल करणं. दिवसा त्यांना काटेरी कुंपणाच्या बाहेर जाण्यास मज्जाव होता, तसाच रात्री गढीबाहेर जाण्यास. रोज रात्री कडक पहारा आणि सर्चलाइटच्या झोतांची अविरत दिवाळी असे. लॉरेन्सनंच म्हटल्याप्रमाणे, आरएएफचे लोक आणि हिंदुस्तानी यांचा संपर्क नसल्यानं मिरानशाहमध्ये माणसांचा आवाज नसे, पक्ष्यांचा नसे आणि जनावरांचाही नसे. अपवाद एकच. रोज रात्री सर्चलाइट्स सुरू झाल्यावर दहाच्या सुमारास कोल्ह्यांची मात्र पाचेक मिनिटं ‘कुई-मैफल’ चाले. मिरानशाहमधली नीरव शांतता खूपच गूढ आणि काहीशी अभद्रानं सावटलेली वाटे. लॉरेन्सला इथलं ...
पुढे वाचा »
Labels:
चरित्र,
पुस्तक,
यशवंत रांजणकर,
लॉरेन्स ऑफ अरेबिया
रविवार, २४ डिसेंबर, २०२३
अबोला
-
वैशाखातील दुपार खंजिरासारखी तळपत होती. उन्हाच्या सणक्यानं सगळं गाव निपचित पडलं होतं. वारा वाहत नव्हता. झाडं हलत नव्हती. कुठंच हालचाल नव्हती, गजबज नव्हती. छपरांच्या सावलीला गुरं निवांत होती. भिंतीच्या कडेशी माती उकरून कोंबड्या गपचीप बसल्या होत्या, पाय पोटाशी घेऊन आणि गोल डोळ्यांवर पापण्यांचे पांढरे पडदे ओढून डुलक्या घेत होत्या. डालपाट्याखाली कोंडलेल्या कोकराची धडपड थांबली होती. लिंबाच्या डहाळ्यात बसलेल्या साळुंक्या बोलत नव्हत्या. कावळ्यांची जोडपीही एकमेकांना बिलगून निश्चल बसली होती. कुत्री राडीत बसून ल्हा-ल्हा करीत होती. कुंभाराची गाढवं झाडाच्या सावलीला दिडक्या पायावर उभी होती. सारं खेडं उन्हाच्या तापानं मरगळून गेलं होतं. आपल्या घरात सोप्यात मिरी एकटीच गजग्यांनी खेळत होती. रंगीत बांगड्यांचे तुकडे मोजीत होती. गालावर येणारे भुरे केस सावरीत होती. आपल्याशीच काही बडबडत होती. पण तिला करमत नव्हतं. तिचं मन रंगीत काचात, गजग्यांत रमत नव्हतं. परटाची सुबा चार-सहा दिवस घरी येण्याची बंद झाली होती. त्या दोघींचं भांडण झालं नव्हतं. गट्टी फू झाली नव्हती, तरी...
पुढे वाचा »
सोमवार, १८ डिसेंबर, २०२३
देवकथा बोलतात तेव्हा...
-
कांचीपुरम् किंवा कांची हे नाव आपण अनेकदा ऐकले आहे. कधी तिथल्या बालमजुरांच्या शोषणाबद्दलच्या हकिकती वाचून आपण हळहळलो आहोत, तर कधी तिथून आलेल्या शंकराचार्यांच्या आगमनाच्या, वृत्तपत्रांमधून प्रसिद्ध झालेल्या वार्ता आपल्यापर्यंत पोहोचल्या आहेत. कधी तिथल्या रेशमी साड्यांचं प्राचीन, सुलक्षणी वैभव पाहताना आपण हरखलो आहोत, तर एखाद्या प्रवाशानं तिथल्या बाजारपेठेबरोबरच तिथल्या मंदिरांचं महत्त्वही आपल्याला ऐकवलं आहे. जर दक्षिणेत गेलात तर कांचीला एकदा जरूर जा. प्रवासी माणसांचं प्रांजळ कुतूहल आणि उत्सुकता बरोबर घेऊन जा. मदुरा आणि कुंभकोणम्सारखंच हे देवळांचं गाव तुम्हाला दिसेल. हे कामाक्षीचं गाव. सारीपाट खेळताना शिवावर पार्वतीनं मात केली आणि आनंदाच्या भरात ती आदिमाया असं काही तरी बोलली की शिवमहेश्वराला ते बोलणं फारच लागलं, मुळातला तो साधाभोळा देव, पण रागावला की पहायला नको. त्यानं गौरीला म्हटलं, ‘कुरूप होशील आणि पृथ्वीवर जाऊन पडशील.’ शाप खरा ठरला आणि पार्वती कांचीला आली. इथं तिनं शिवाला प्रसन्न करून घेण्यासाठी मोठे तप मांडलं. शिव मोठा अहंकारी नवरा निघाला. लहानशा थट्टेतल्या बोलण्यावरून तो इतका राग...
पुढे वाचा »
शुक्रवार, ८ डिसेंबर, २०२३
एका गोष्टीची गोष्ट
-
“ता-त्या” “काय बाबा?” “मला गोष्ट सांगा की!” “कशाची सांगू?” अंधारात माझ्याशेजारी झोपलेल्या पाच वर्षाच्या बाबानं विचार केला. मी म्हणालो, ‘आता आपली परीक्षा आहे. गोष्टी लिहिणं हा जन्माचा उद्योग आहे, पण पोरांना गोष्ट सांगणं हे काम भलतंच कठीण! त्यांना कसली गोष्ट आवडेल ह्याचा अंदाज कधीच येत नाही. सांगून परिणाम पाहावा म्हटलं, तर अपेक्षेपेक्षा वेगळाच परिणाम दिसतो.’ पुष्कळ गोष्टी माहीत नसतात, शब्द ओळखीचे नसतात. पंचतंत्रातल्या काही कथा सांगून पाहिल्या, त्या बाबाला रंजक वाटल्या नाहीत. सिंह जाळ्यात सापडला. जाळ्यात म्हणजे कशात? (आम्ही खेड्यात जन्माला आलो आणि वाढलो, त्यामुळे ही अडचण आली नाही.) गाढवानं वाघाचं कातडं पांघरलं. कसं? त्याला हात कुठं असतात पांघरून घ्यायला? रंगाच्या भांड्यात पडलेला कोल्हा जनावरांना म्हणाला कसा? कोल्ह्याला बोलता कसं येईल? त्या तळ्यात खूप मासे होते. तळं म्हणजे काय? तात्पर्य– पंचतंत्राचा उपयोग नाही. “वासराची सांगता?” “तू वासरू कुठं बघितलंस?” “आहे की जगतापाच्याकडं. गाय आणि तिचं छान लहान वासरू आहे.” ‘बरं, म्हणजे कथानायकाचा परिचय आहे.’ “सांगा वासराची.” प्रसंग ब...
पुढे वाचा »
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)





