-
महानगरी आयुष्यात माणसाच्या दृष्टीने वैय्यक्तिक पातळीवर पावसाचे अप्रूप फारसे राहिले नसले, तरी अनागर आयुष्यामध्ये उन्हाळ्याची काहिली शमवणारा आणि सुगीची चाहूल देणारा पाऊस जीवनदायी नि हवासा वाटणारा. पावसाचे हे कवतिक मानवाप्रमाणेच मानवसदृश प्राण्यांमध्येही तितकेच असोशीने व्यक्त केले जाते याची प्रथम नोंद डॉ. जेन गुडाल या विदुषीने केली आहे. जेन गुडाल यांनी चिम्पान्झी या वानरकुलातील मानवाचा भाऊबंद मानल्या गेलेल्या प्राण्याच्या अभ्यासासाठी सारे आयुष्यच वेचले आहे. व्यंकटेश माडगूळकरांनी त्यांच्या ‘ चित्रे आणि चरित्रे ’ या पुस्तकामध्ये ‘ साहसी संशोधक: जेन गुडाल ’ (१) या शीर्षकाखाली तिच्यावर एक लेख लिहिलेला आहे. त्या लेखामध्ये जेनने अनुभवलेल्या एका प्रसंगाचे वर्णन त्यांनी दिले आहे. (२) एके दिवशी सकाळपासून आभाळ भरून आलं होतं. एका मोठ्या उंबराच्या झाडावर चरणाऱ्या चिंपॅन्झींचा कळप न्याहाळत जेन आपल्या नेहमीच्या डोंगरावरच्या शिळेवर बसली होती. झाडावर डेव्हिड होता. गॉलिथ होता. काही माद्या होत्या. काही तरुण नर होते, पोरं होती. आणि एकाएकी वादळ सुरू झ...
पुढे वाचा »
RamataramMarquee
‘प्लरिबस’च्या निमित्ताने... - १५ : उपसंहार ‘प्लरिबस’च्या निमित्ताने... - १४ : अंत:स्फोटाची अपरिहार्यता ‘प्लरिबस’च्या निमित्ताने... - १३ : गरजा, मागणी आणि पुरवठा ‘प्लरिबस’च्या निमित्ताने... - १२ : जठराग्नी शमवाया भूतां ‘प्लरिबस’च्या निमित्ताने... - ११ : अद्यतनीकरण (Update) ‘प्लरिबस’च्या निमित्ताने... - १० :नव्या व्यवस्थेकडे ‘प्लरिबस’च्या निमित्ताने... - ९ : सर्वे सुखिन: सन्तु (साम्यवादी व्यवस्था) सण गेले विरुनी
शुक्रवार, १७ मे, २०२४
वेचताना... : आज धारानृत्य चाले...
गुरुवार, ९ मे, २०२४
वेचताना... : जिज्ञासामूर्ती
-
‘एक ना धड भाराभार चिंध्या’ म्हणा किंवा ‘अनावर जिज्ञासा नि अशक्त चिकाटी’ म्हणा अशा वृत्तीने जगत असताना मला स्तिमित करणारे बरंच काही सापडत गेलं. रुजलं नाही तरी भावत गेलं. काही वर्षांपूर्वी पक्ष्यांबद्दल कुतूहल जागं झालेलं असताना एका निसर्गप्रशिक्षण शिबिराला उपस्थिती लावली होती. तिथे प्रायमेट्स म्हणजे वानरकुलातील प्राण्यांवरील व्याख्यानामध्ये जेन गुडाल या विदुषीचे नाव प्रथम ऐकले होते. मोजका काळ वगळता सारं आयुष्य चिंम्पान्झींच्या सहवासात व्यतीत करुन चिकाटीने त्या प्रजातीच्या जगण्याचे तिने दस्तऐवजीकरण केले होते. त्यातून मानवी जीवनप्रवासाच्या अनेक कोड्यांना सोडवण्यात अनुभवसिद्धता, निरीक्षणक्षेत्रात मोठा वाटा उचलणार्या या स्त्रीने मला स्तिमित केले होते. पुढे तिच्यासह तसंच तिच्या अनुभवाच्या आधारे चित्रित केलेले काही माहितीपट पाहण्यात आले नि तिच्या अफाट कामाची प्रचिती येत गेली. पण पुढे असे लक्षात आले, की असली अफाट जिज्ञासा नि समर्पणभाव घेऊन जगलेली ही एकच नाही. डायान फॉसी नामे आणखी एक माऊली गोरिला या अन्य वानर प्रजातीशी याच धर्तीवर जोडली गेली आ...
पुढे वाचा »
जिज्ञासामूर्ती
-
संशोधनकार्यात दोन दृष्टिकोन असतात: एक म्हणजे, सृष्टीवरच्या प्राणिमात्रांचं जीवन नैसर्गिकच राहावं, मात्र त्याचं गणित समजलं तर आपलं स्वतःचं जीवन अधिक समृद्ध होईल, म्हणून शोधकार्याला महत्त्व देणारे सत्प्रवृत्त संशोधक असतात. लुई लीकी हा अशांपैकी एक. रॉबर्ट यर्क्स हा अर्थातच दुसऱ्या प्रकारच्या संशोधकांत मोडतो. आपल्या अगतिक समाजजीवनाच्या सीमा ओलांडून, मनुष्यप्राण्यांपासून दूरच्या रानावनांत, घनदाट जंगलात, डोंगर कपारीत वास्तव्याला जावं आणि तिथल्या प्राणिमात्रांच्या नैसर्गिक जीवनप्रवाहात तीळमात्रही ढवळाढवळ न करता, उत्क्रान्तीच्या माळेतला आजच्या घडीला शेवटून दुसरा, म्हणजे माणसाच्या आधीचा मणी जो माकड, त्याच्या जातीचे गोरिला, ओरँगऊटँग, चिंपँझी हे जे तीन प्राणी आहेत, त्यांच्या जीवनाचा शोध घ्यावा असाही प्रयत्न काही शास्त्रज्ञांनी केला. हे प्राणी आणि मनुष्यप्राणी यांच्यातली दरी ओलांडता येते का, नातं शोधता येतं का, यांना जोडणारा धागा कुठे सापडतो का, हे पाहण्यासाठी लुई लीकी (Louis Leakey) या शास्त्रज्ञाने तीन सुशिक्षित तरुण मुलींची योजना केली. वैयक्तिक गरजा अत्यल्प असलेल्या, कष्टांची पर्वा नसलेल्य...
पुढे वाचा »
शनिवार, २७ एप्रिल, २०२४
न स्त्री स्वातंत्र्यमर्हती
-
नोरा फातेही या अभिनेत्रीने स्त्रीस्वातंत्र्याबद्दल अनुदार भूमिका घेत दिलेल्या मुलाखतीच्या निमित्ताने आज लोकसत्तामध्ये गायत्री लेले यांचा ‘ ट्रॅड वाइफचा आभासी ट्रेंड ?’ हा लेख प्रसिद्ध झाला आहे. त्याच सोबतीला एकोणीसाव्या शतकाच्या अखेरीस (या काळाचे महत्त्व वेचताना...: स्वातंत्र्य आले घरा या लेखामध्ये अधोरेखित केले आहे.) अमेरिकेमध्ये सुरु झालेल्या स्त्री-स्वातंत्र्य नि स्त्री-हक्क यांच्या चळवळीबाबत एका पौगंडावस्थेतील मुलाने केलेले हे टिपण, मॅन्युअल कॉमरॉफ यांच्या ‘बिग सिटी, लिट्ल बॉय’ या स्मरण-नोंदींमधून (memoirs). पुरुषी अहंकार, नव्या कल्पनांची टवाळी, अधिक्षेप, त्याकडे मनोरंजन म्हणून पाहाणे वगैरे टप्पे पाहता भारतीय समाजालाही ही निरीक्षणे बरीचशी चपखल बसतील. --- चित्रपटाप्रमाणेच आणखीही एक नवा करमणुकीचा प्रकार आला– ‘सफ्रेजेट्स’. सफ्रेजेट्स या बाया होत्या. पुरुषांच्या बरोबरीने राजकीय हक्क स्त्रियांना असलेच पाहिजेत, असा आग्रह असलेल्या बाया. आतापर्यंत बायकांनी नोकरीधंद्यात हलके-हलके शिरकाव करून घेतलाच होता. त्यांची प्रगती सावकाश पण नेमकी ह...
पुढे वाचा »
Labels:
कादंबरी,
पुस्तक,
मंतरलेले बेट,
मॅन्युअल कॉमरॉफ,
व्यंकटेश माडगूळकर
रविवार, २१ एप्रिल, २०२४
धारयते इति धर्मः ?
-
दवबिंदूच्या एवढ्याशा आयुष्यात कोवळ्या सूर्यकिरणांचं इंद्रधनुष्य चमकून जावं, नदी उगम पावावी, डोंगरांनी ताठ मानेनं संसार थाटावेत, उत्तम जुळवलेले तंबोरे छेडले जात असताना त्यांतून फुलणाऱ्या गाण्यासारखी, समुद्राच्या गाजेच्या सुरावर किनाऱ्यावर येणा-जाणाऱ्या लाटांच्या फेसाच्या रंगीबेरंगी फुलांची पखरण होत राहावी, अशा असंख्य निर्मितीशी कसलाही संबंध नसताना, हे सारं वैभव वेळोवेळी भोगण्याचे योग माझ्या आयुष्यात अनेकदा येत राहिले आणि ‘अनंत हस्ते कमलावराने, देता किती घेशिल दो कराने’ अशी संधी माझ्या आयुष्यात वरचेवर मिळतच राहिली. पण त्याचबरोबर त्याबद्दलची आपली कृतज्ञता दुबळी असल्याच्या जाणिवेनं, आनंदाश्रूतच दुःखाश्रूही अधूनमधून मिसळत राहिले. आपण लहान बाळाचा मुका घेतो, कुणावर तरी प्रेम करतो, ते आपल्या आनंदात भर घालण्यासाठी! ही नैसर्गिक श्रीमंती वाढवत आणि भोगत राहण्यासाठी! जीवनाचा हाच अर्थ आहे, श्वासोच्छ्वासाची हीच परिणती आहे, प्राणिमात्राची ही गरज आहे, हाच धर्म आहे. ‘धारयते इति धर्मः।’ मग स्वतःला सर्वश्रेष्ठ (म्हणजे जास्तीत जास्त भोग घेऊ शकणारा का?) प्राणी म्हणवून घेण्याचा गर्व माणसात कुठून, कधी आणि क...
पुढे वाचा »
शुक्रवार, १२ एप्रिल, २०२४
स्वातंत्र्य आले घरा (उत्तरार्ध)
-
<< पूर्वार्ध शिलरकडे जाऊन त्यांचे काम बघत बसणे मला फार आवडे. त्यांच्या दुकानाला येणारा कातड्याचा, खळीचा वास आवडे. दुकानातले शेल्फ लाकडी साच्यांनी भरलेले असत. प्रत्येक साच्याला गिऱ्हाइकाच्या नावाची चिठ्ठी दोऱ्याने बांधलेली असे. खिळे, हातोडे, पावलांच्या आकृत्यांनी भरलेली खतावणी-बुके, हे सगळे मला आवडे. स्वतः शिलर आवडत. तासन् तास त्यांचे कसब बघत मी बसून राही. ते म्हणत, “मी चांभार नाही. बूट तयार करणारा कारागीर आहे.” त्यांचे शिक्षण युरोपमध्ये झाले होते. आपल्या धंद्याचा त्यांना फार अभिमान होता. पण काळानुसार त्यांचा धंदा खालावला होता; आता पुष्कळसे काम येई ते दुरुस्तीचेच. शिलरना त्यात कमीपणा वाटे; पण जे थोडेफार चांगले काम मिळे त्यात ते आनंद मानत. कधी-कधी बेढब पायाचा माणूस तळघराच्या पायऱ्या उतरून येई आणि बूटजोडी बांधा म्हणे. अशा गिऱ्हाइकाचे काम करण्यात शिलरना आनंद होई. एकीकडे हात चालत, दुसरीकडे तोंड चाले. जर्मनीमधल्या आपल्या बाळपणीच्या कितीतरी आठवणी त्यांनी मला सांगितल्या. या आठवणी सांगता-सांगता ते हसत, मीही हसे. एके दिवशी त्यांनी मला...
पुढे वाचा »
Labels:
कादंबरी,
पुस्तक,
मंतरलेले बेट,
मॅन्युअल कॉमरॉफ,
व्यंकटेश माडगूळकर
रविवार, ७ एप्रिल, २०२४
स्वातंत्र्य आले घरा (पूर्वार्ध)
-
नव्या शतकाच्या सुरुवातीला कामगार वर्गातील जागृती आम्ही पाहिली. या काळात माणूस, यंत्र आणि संपत्ती यांच्या परस्परांशी असलेल्या नात्याची जाणीव आम्हाला होऊ लागली, सत्य परिस्थिती समजू लागली; समजलेले सत्य कडू होते. आम्हाला माहीत असलेले शांत जीवन या सत्यामुळे उधसले. त्याने आम्हाला अस्वस्थ केले. वर्तमानपत्रात त्रासदायक घटनेची बातमी नाही, असा आठवडा जाईना. पिट्सबर्गला संपाचा प्रयत्न, कापडाच्या गिरणीत लहान मुले राबविल्याबद्दल निषेध, कोळशाच्या खाणीतील मजूरवर्गात आणि त्यांच्या कुटुंबांत पसरलेल्या क्षयरोगाबाबतचा वृत्तांत, असले लेख नियमाने प्रसिद्ध होत आणि सगळे वातावरणच दूषित झाले आहे, असे वाटे. ‘कामगार’, ‘भांडवल’, ‘औद्योगिक क्रांती’, ‘संप’, 'रोजगार' असले शब्द जिथे-तिथे कानी पडू लागले. आमच्या दुकानांतसुद्धा. अर्थातच हॅडले या गृहस्थांना सर्व प्रश्नांबद्दल काही बोलायचे असे. त्यांच्या बोलण्यावर आजोबा असे काही भडकत की, त्या दोघांचे वाद माझ्या कायमचे स्मरणात राहिले. बरे, त्या दोघांची खडाजंगी माझ्या पथ्यावरच पडली. या सर्व प्रश्नांबाबत माझ्या मनात अग...
पुढे वाचा »
Labels:
कादंबरी,
पुस्तक,
मंतरलेले बेट,
मॅन्युअल कॉमरॉफ,
व्यंकटेश माडगूळकर
गुरुवार, ४ एप्रिल, २०२४
वेचताना... : स्वातंत्र्य आले घरा
-
मध्यंतरी व्यंकटेश माडगूळकरांचे ‘माणदेशी माणसे’ ( पुन्हा एकदा ढापले गेल्याने ) ऑर्डर करण्यासाठी ‘बुकगंगा’वर गेलो. तिथे ‘या सोबत घ्या’ म्हणून ‘मंतरलेले बेट’ नावाचे एक पुस्तक सुचवले होते. शीर्षकावरून हे बालवाङ्मयाचा भाग असावे असे वाटले. तिथे काही पाने अवलोकनार्थ ठेवलेली असतात. ती चाळता एका मुलाचे आत्मकथन आहे असे ध्यानात आले. तेव्हा आपला तर्क खरा ठरला असे वाटले. तरीही तेव्हा काही हलके-फुलके वाचण्यासाठी हवेच होते म्हणून त्याची मागणीही नोंदवली होती. एकदा डोक्याला फार ताण देणारे वाचून झाल्यावर हलके फुलके म्हणून हाती घेतले. मुखपृष्ठावरून समजले की हा Manuel Komroff नावाच्या कुण्या अमेरिकन लेखकाच्या ‘Big City Little Boy’ या पुस्तकाचा अनुवाद आहे. त्याचे वर्गीकरण ‘कादंबरी’ असे दिलेले असले तरी ( पुढे २००१ मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात धराशायी झालेले सुप्रसिद्ध ‘ट्विन टॉवर्स’ जिथे उभे होते त्या ) मॅनहटन बेटावरील एका लहान मुलाने आपल्या आयुष्यासंबंधी केलेल्या स्मरण-नोंदी (memoirs) असे त्याचे स्वरूप आहे. सहज म्हणून वाचता वाचता असे ध्यानात आले की नो...
पुढे वाचा »
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)



