-
परमेश्वर दयाळू आहे आणि श्रेष्ठ उपकारकर्ता आहे, यात तिळमात्र शंका नाही. मानवजातीला त्याने मोठ्यांत मोठे असे काही दिले असेल, तर ती म्हणजे वाणी. आता बोलता आल्यावर माणूस ही कला आत्मसात करणारच. पूर्वी मनुष्यप्राण्याच्या वैभवकाळी वक्तृत्वकला ही तत्त्वज्ञ, कवी, नट आणि शास्त्रज्ञ यांच्यापुरतीच मर्यादित होती. पण पुढे मनुष्यजातीचा ऱ्हास होऊ लागला आणि वक्तृत्वकला ही भाषण करणे, या दशेप्रत येऊन पोहोचली. त्यातच अनेक राष्ट्रांच्या घटनांनी भाषणस्वातंत्र्याचा उद्घोष केला आणि 'भाषण देणे' हा प्रत्येक माणूसप्राण्याचा हक्क ठरला. जेवणाच्या टेबलापासून कोपऱ्यावरच्या सभेपर्यंत कोणीही उभे राहून भाषण करावे : बंधू-भगिनींनो!... आता तर लोक निवडून येण्यासाठी भाषणे करतात, का भाषणे करण्यासाठी निवडून येतात, असा प्रश्न आपल्यापुढे उभा राहतो. बरे, ज्या कोणाला विनोदबुद्धी आहे, त्याने हे सारे गंमत म्हणून सहन केले असते. पण कोणा शहाण्या शास्त्रज्ञाने लाऊडस्पीकरचा शोध लावून अक्षम्य अपराध केला आणि हे एक नवे हत्यार भाषण देणाऱ्याच्या हातात आले. दूरवर मारामारी करता येणे शक्य झाल्यामुळे या शस्त्राच्या साह्याने वक्ता आता...
पुढे वाचा »
RamataramMarquee
‘प्लरिबस’च्या निमित्ताने... - १४ : अंत:स्फोटाची अपरिहार्यता ‘प्लरिबस’च्या निमित्ताने... - १३ : गरजा, मागणी आणि पुरवठा ‘प्लरिबस’च्या निमित्ताने... - १२ : जठराग्नी शमवाया भूतां ‘प्लरिबस’च्या निमित्ताने... - ११ : अद्यतनीकरण (Update) ‘प्लरिबस’च्या निमित्ताने... - १० :नव्या व्यवस्थेकडे ‘प्लरिबस’च्या निमित्ताने... - ९ : सर्वे सुखिन: सन्तु (साम्यवादी व्यवस्था) ‘प्लरिबस’च्या निमित्ताने... - ८ : धर्म आणि सहजीवन
बुधवार, १० जून, २०२६
भाषण देण्याचा प्रकार
Labels:
अनुभव,
पांढर्यावर काळे,
पुस्तक,
व्यंकटेश माडगूळकर
शुक्रवार, २९ मे, २०२६
... परतुनि ये घरा
-
प्रास्ताविक: ‘आषाढातील एक दिवस’ या नाटकातील हे दोन प्रवेश कालिदासाच्या आयुष्यातील दोन महत्त्वाच्या टप्प्यांभोवती रचलेले आहेत. ‘पाखरा जा, त्यजुनिया...’ या शीर्षकाच्या पहिल्या भागात प्रिय मल्लिकेला सोडून कालिदास कीर्ती, ऐश्वर्य, सत्ता यांच्या दिशेने चालला आहे. या भागात हे सारे गमावलेला कालिदास मल्लिकेकडे परतून आला आहे. दोन्ही भागांची शीर्षके मो. ग. रांगणेकर यांच्या ‘वहिनी’ या नाटकातील ‘पाखरा जा’ या पदातील अनुक्रमे पहिली नि अखेरची ओळ आहे. --- (परत वीज कोसळते, मेघगर्जना होते, देवडीकडील दार हळू हळू उघडते. दारात कालिदास उभा. खचलेला मोडलेला. मल्लिका एकदम उभी राहून तिकडे पाहू लागते. बाबरलेली. गोंधळलेली, तो पुढे येतो. मल्लिका अवाक् होऊन त्याच्याकडे पाहात राहाते.) कालिदास : बहुधा ओळखलं नसावंस. (मल्लिका तशीच पाहात राहाते. कालिदास सर्वत्र दृष्टी फिरवतो. मग तिच्याकडे येऊन तिला आपादमस्तक न्याहाळतो व आसनाकडे जातो.) आणि न ओळखणंही अगदी स्वाभाविक आहे. कारण मी तो नाहीच– ज्याला तू आधी ओळखत होतीस. मी कुणी वेगळाच आहे. (आसनावर बसतो.) आणि खरं सांगायचं तर मी ...
पुढे वाचा »
Labels:
आषाढातील एक दिवस,
नाटक,
पुस्तक,
मोहन राकेश,
विश्वनाथ राजपाठक
शुक्रवार, २२ मे, २०२६
शुभास्ते पंथान: सन्तु
-
बऱ्याच वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आम्ही दुपारच्या डेक्कन एक्सप्रेसने पुण्याहून मुंबईला जात होतो. पहिल्या वर्गाचा तो डबा नेहमीप्रमाणेच भरलेला होता. आमच्या पुढच्याच दोन जागांवर दोन बाया येऊन बसल्या. त्यांच्या जवळच्या सामानात एक जरा वेगळीच चीज होती. पाळण्याचा मुलांना निजवायचा मधला भाग असतो तसा साधारण चौकोनी उघडा पिंजरा, त्यात छोटी गादी आणि त्यावर गुंडाळून ठेवलेली चार तान्ही मुले. मग आणखीही सामान होते. त्या मुलांना प्रवासात लागणारे दूध, पाणी, थोडी औषधे, बदलायचे कपडे, इतरही काहीबाही. त्या दोघीतली एक तरुण पारशी की इराणी मुलगी होती, दुसरी प्रौढ मराठी बाई. कपड्यांत गुंडाळून ठेवलेल्या त्या चार छोट्या अनपेक्षित प्रवाशांनी आजूबाजूच्या बहुतेक सर्व इतर प्रवाशांचे कुतूहल जागृत केले होते. तसा त्यांचा कुणालाच त्रास नव्हता. बहुतेक वेळ ती झोपलेलीच होती. मधूनच रडत जागी होत त्या वेळी त्यांचे कपडे बदलणे किंवा त्यांना दूध पाजणे यांतले आवश्यक ते त्या दोघी पटकन मोठ्या कुशलतेने करत होत्या. पण एकदम अशी चार मुले, अशा रीतीने प्रवासात आहेत, त्यांना घेऊन आलेल्या दोघीप...
पुढे वाचा »
सोमवार, २२ डिसेंबर, २०२५
स्वतंत्रते...
-
भल्या सकाळीच सारा गाव कलकलत उठला. लष्कराचा रिसाला तोफा-बंदुका घेऊन येत होता. रिसाला जसजसा जवळ येऊ लागला, तसतसा सारा जनाना रसोड्यात जाऊन पडदाशीन झाला नि सगळा मर्दाना हात उपरण्यानं बांधून रिसाल्याच्या स्वागताला उभा राहिला. दहेजमध्ये मिळालेल्या ढाली, तलवारी किंवा ठासणीच्या बंदुका घेऊन लष्कराच्या रिसाल्याशी मुकाबला करणं शक्यच नव्हतं. तेव्हा मागतील तितक्या कोंबड्या, बकऱ्या, शाली, गोधड्या देऊन नाक घासायचं, यापरता पर्याय नव्हता. गुलबेगनं रांजण रिकामा केला... चकचकीत चांदीच्या सहा हजार कोरी रुमालात बांधून घेतल्या... लष्कराचा जो कुणी मनसबदार असेल, त्याला नजराणा करायला ! रिसाला बगाडीयो गावात शिरला. गुलबेग लोटांगण घालायला पुढं सरसावला. गावाचा मुखिया होता तो. गावकऱ्यांची जान-अब्रू वाचवायची त्याची जबाबदारी होती. पण... त्याला लोटांगण घालावेच लागले नाही ! फौजेचा रिसाला काही मारकाट, लूटमार न करता शिस्तीत उभा राहिला... मग मेजरसाहेबानं गावात मोठा खांब ठोकला.... नि एक नवा झेंडा फडकावला.... तीन रंगांचा! त्या झेंड्याला खडी ताजीम दिली नि फौजेच्या बँडवर गाणं वाजू लागलं : ‘जनगणमन अधिनायक जय हे....’ ...
पुढे वाचा »
Labels:
अनिल बर्वे,
कथा,
पुस्तक,
युद्धविराम आणि होरपळ
सोमवार, १५ डिसेंबर, २०२५
प्रेषित आणि क्रांतिदूत
-
त्याचं खाणं संपायच्या आधीच रघू दार लोटून आत आला. रघू अठ्ठावीस वर्षांचा, श्रीमंत बापाचा वाया गेलेला मुलगा. वाया गेलेला म्हणजे जगाच्या दृष्टीने. गेली तीन वर्ष रघूनं दाढी केलेली नव्हती. भारतात आमूलाग्र क्रांती कशा पद्धतीने घडवून आणता येईल याचा तो सतत विचार करी. तेच त्याचं वेड. त्यासाठी तो सकाळपासून संध्याकाळपर्यंत एशियाटिक सोसायटीच्या ग्रंथालयात अभ्यास करीत बसलेला असे. कास्टाला आपल्या क्रांतीचा अग्रदूत बनविणे हेही त्याचं एक ईप्सित होतं. गळ्यातली बॅग कास्टाच्या टेबलावर ठेवीत रघू म्हणाला, “घाईत असल्याचं ऐकलं.” “हा निघालोच, साडेअकराला केस आहे लेबर कमिशनरपुढे.” “मर असाच! तू असाच केसेस लढवीत मरणार. भरघोस काम तुझ्या हातून काही होणार नाही.” कास्टा नुसताच हसला. बाजूचा कागद उचलून त्यानं हात पुसलेला पाणी घटाघटा पिऊन टाकीत तो म्हणाला, “सकाळपासून तू काही खाल्लेलं दिसत नाही.” “मी एकभुक्त आहे. व्रतस्थ आहे. कोट्यवधी लोकांना एक वेळचं जेवणही पूर्ण मिळत नसताना सतत चरत राहून अंगावर चरबी वाढविणं मला पसंत नाही. ते शोषण आहे जनतेचं.” “तू खरोखरच रागावलेल...
पुढे वाचा »
बुधवार, ३ डिसेंबर, २०२५
यमुनातीरीचे बुलबुल
-
खूपच लहान होते तेव्हा टाळ्या वाजवत म्हटलेलं एक तसं निरर्थकच गाणं अजून आठवतं. कदाचित् अंक शिकवण्यासाठी ते गाणं रचलेलं असेल. यमुनेच्या तीरी किती बुलबुल असतील? बुलबुल असतील, बुलबुल असतील हो? आणि मग या प्रश्नाला उत्तर म्हणून म्हणायचं, एक तरी, दोन तरी, तीन तरी असतील. चार तरी असतील, चार तरी असतील हो! गाणं म्हणता म्हणता पाच, सहा, सात, आठ अशी बुलबुलांची संख्या वाढवत न्यायची. मी तेव्हा बुलबुल मुळी पाह्यलाच नव्हता. तो केवढा, कुठल्या रंगाचा असतो, त्याचा आवाज कसा असतो हे मुळीसुद्धा माहीत नव्हतं. आणि यमुनेची तरी कुठे काही माहिती होती! आणि माहिती करून घेण्याची जरुरी पण तेव्हा, त्या गाण्यापुरती तरी वाटली नाही. उलट नेहमी, अगदी नेहमी, मनात एक नदी वळण घेत वहात यायची. पाण्यानं खूप भरलेली नदी. काठांवर खूप दाट गवत. किंचित् पुढे गर्द झाडांची झिम्मड. पलिकडच्या काठाला वळणापाशी थोडी वाळू. पांढरी चमकणारी आणि तिथे खूपच खूप बुलबुल. गुलाबी झाकेचे पांढरे पक्षी. अतिसुरेल दीर्घ शीळ घालावी तसा त्यांचा आवाज.... रात्री अंथरुणावर पडल्यावर देखील ती यमुना आणि ...
पुढे वाचा »
रविवार, ९ नोव्हेंबर, २०२५
Seeing is believing
-
माझी अभिव्यक्ती ही शब्दांच्या आधारे ‘दृश्यमान’ होत असते. पण सध्या व्हिडिओ या माध्यमाची चलती आहे. त्यामुळे एक-दोन मित्र मला पॉडकास्ट (खरंतर हा शब्द चुकीचा आहे. पण तो आता रुळला आहे.) सुरु करण्याचा सल्ला देत असतात. ‘त्यामुळे तुझे लेखन(?) अधिक लोकांपर्यंत पोहोचेल’ अशी सायबर-मार्केटिंग स्ट्रॅटेजी ते मला कळकळीने सांगत असतात. पण मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेंद्र कुमारांप्रमाणे मीही ‘आता माझ्या विचारांतील कल्पना, समीक्षा, भाषिणी, संज्ञा यांना असे चारचौघात मिरवावे का?’ असा प्रश्न विचारुन त्यांना पडदानशीनच ठेवत असतो. गोळाबेरीज ही की सध्या व्हिडिओ या माध्यमाचा बोलबाला आहे. तो तसा नव्हता तेव्हापासून, बहुसंख्या - विशेषत: समाजमाध्यमांवरची - ही ‘समोर येईल तेच वाचतो’ असे बाणेदार उत्तर देऊन ‘ब्लॉग वगैरे आउटडेटेड गोष्टी कोण वाचणार’ अशा आविर्भावात मला झाडून टाकत असत. आता रील्सच्या जमान्यात समोर येईल तेच ‘पाहातो’ अशी प्रगती झाली आहे. मीही अधूनमधून त्या प्रवाहात अडकत असतो हे मान्य करण्यास प्रत्यवाय नाही. “काळे, एवढं समजतं आहे तर मग करा ना व्हिडिओ; पाहू आम्ही” असा सल्ला मिळणे ओघाने आलेच. पण आमची अभिव्यक्...
पुढे वाचा »
गुरुवार, १८ सप्टेंबर, २०२५
...तुटून पडल्या गाठी
-
श्री. वि. कुलकर्णींचे ‘ डोह ’ एका वाढत्या वयाच्या मुलाचे आपल्या भवतालाशी असलेले नाते उलगडत जाते. त्यातही निसर्गाशी, त्यातील विविध जिवांशी त्याची होत गेलेली ओळख, अंगभूत जिज्ञासेतून त्यांच्याशी जोडले गेलेले नाते या मार्गाने काही सुंदर ललित लेख त्यामध्ये वाचायला मिळतात. या अनुभवसिद्ध लेखनाचा पुढचा टप्पा या अपेक्षेने ‘सोन्याचा पिंपळ’ आणले. पण एक शैली वगळता ‘डोह’शी नाते सांगत नाही. तीच लेखनशैली, तीच अनुभवसिद्धतेची मांडणी असली तरी त्यात ‘डोह’मध्ये प्रतिबिंबित झालेली जिज्ञासा कुठे नाही. त्यातून जे जिव्हाळ्याचे नाते निर्माण होते, ते ही नाही. अनुभवाचा टप्पा पार करून अनुभूतीकडे वारंवार जाण्याचा प्रयत्न होतो . बहुधा तोवर श्रीवि अधिक आध्यात्मिकतेकडे झुकू लागले असावेत. वास्तव जगातील एखाद्या घटकाशी नाते सांगणारे, त्याबद्दल काही उकलणारे स्वप्न नि त्याची नंतर वास्तवात आलेल्या अनुभूतीशी घातलेली सांगड हे ‘डिव्हाईस’ कंटाळा येईल इतके वारंवार वापरले आहे. माझ्यासारख्या वस्तुनिष्ठ विचाराच्या माणसाला अनुभूती-अनुभवाची इतकी वारंवार नि बिनचूक बसणारी सांगड हास्यास्पद नि कृत्रिम वाटते. (उलट आध्यात्मिक मंडळींना...
पुढे वाचा »
Labels:
पुस्तक,
ललित,
श्रीनिवास विनायक कुलकर्णी,
सोन्याचा पिंपळ
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)







