-
१९व्या शतकाच्या सुरुवातीला लीमन फ्रॅंक बॉम नावाचा लहानसा पत्रकार शिकागोमध्ये काम करत होता. पत्रकारितेमध्ये येण्यापूर्वी न्यूयॉर्कमध्ये नाट्यलेखक आणि निर्माता म्हणून बस्तान बसवण्याचा त्याचा प्रयत्न अयशस्वी झाला होता. तरी अंगातली लेखकाची ऊर्मी त्याला स्वस्थ बसू देत नव्हती. नीरस कंटाळवाण्या बातम्यांपेक्षा सर्जनशील लेखनाकडे त्याची ओढ होती. आपल्या चार मुलांना गोष्टी सांगताना तो रंगून जात असे. त्यातून त्याच्या कथेमध्ये एक काल्पनिक जग आकाराला येत होते. प्रत्येक कथनागणित त्यात नवे आकार नि रंग भरले जात होते. फ्रॅंकची पत्नी मॉड हिने हे सारे पुस्तकरूपात उतरवण्याचा तगादा लावला होता. पण फ्रॅंक ते फारसे मनावर घेत नव्हता. अखेर एका निषादाने केलेल्या क्रौंचवधाने निर्माण झालेल्या करुणेतून रामायण-कथा अवतरावी तसेच काहीसे या पुस्तकाबाबतही घडले. चारही मुलेच… पुढे वाचा »
RamataramMarquee
‘प्लरिबस’च्या निमित्ताने... - ९ : सर्वे सुखिन: सन्तु सण गेले विरुनी ‘प्लरिबस’च्या निमित्ताने... - ८ : धर्म आणि सहजीवन प्लरिबस’च्या निमित्ताने... - ७ : वैय्यक्तिक संपत्ती नि विषमता ‘प्लरिबस’च्या निमित्ताने... - ६ : समूह नव्हे व्यक्ती; गरज नव्हे संपत्ती ‘प्लरिबस’च्या निमित्ताने... - ५ : सहजीवन आणि अर्थकारण ‘प्लरिबस’च्या निमित्ताने... - ४. संग्रह ते व्यापार ‘प्लरिबस’च्या निमित्ताने... - ३. समूहाची ओळख
Indexes Menu_Desktop
| संपूर्ण सूची : |
गुरुवार, १८ मार्च, २०२१
परीकथा आणि वेदनेची वाट
Labels:
तत्रैव,
द एमेराल्ड सिटी,
दृक्-श्राव्य,
मालिका
सोमवार, १५ मार्च, २०२१
इतिहासाचे अवजड ओझे ('Man in the iron mask' च्या निमित्ताने)
-
पारंपरिक शेती करणारा शेतकरी जमिनीचा पोत राखण्यासाठी आलटून-पालटून पिके घेत असतो. जमिनीतील रसद्रव्ये शोषून घेणारे खादाड पीक घेतल्यानंतर त्याचे पुनर्भरण करणारे दुसरे पीक घेतो. किंवा एक हंगाम तिला विश्रांती देण्यासाठी एखादे दुय्यम पीक घेतो. ोक्याला भरपूर ताप देणारे, विचाराला चालना देणारे, प्रश्नांना व विश्लेषणाला जन्म देणारे पुस्तक वाचून झाल्यावर, चित्रपट वा मालिका पाहून झाल्यावर डोक्याला विश्रांती देण्यासाठी मी ही कार्टून पाहतो. कधीकधी ’आऽणि ते सुखाने नांऽदू लाऽगले’च्या समेवर संपणार आहे याची खात्री आहे अशी गुलगुलीत प्रेमकथा असलेले चित्रपट पाहतो. विपश्यना, ध्यान, स्तोत्रपठण या सर्वच प्रकारात जो काही काळ डोके बंद ( आमच्या संगणकाच्या भाषेत सांगायचे तर फक्त रॅम(RAM) वापरायची प्रोसेसर नाही .) करण्याचा उद्देश असतो, तोच मी यातून साध्य करतो. पण ह… पुढे वाचा »
गुरुवार, ११ मार्च, २०२१
छान छोटे, वाईट्टं मोठे
-
स्वत:ची राष्ट्रभक्ती सिद्ध करण्याचा सर्वात सोपा आणि स्वस्त मार्ग म्हणजे इतर कुणावर तरी राष्ट्रद्रोहाचा आरोप करणे. - (Moronous ग्रहावरील एक प्राचीन म्हण ) अलीकडच्या काही वर्षांत या म्हणीचा प्रत्यय अमेरिकेच्या संयुक्त संस्थांनांपासून भारतापर्यंत अनेक देशांत प्रकर्षाने येऊ लागला आहे. राष्ट्रभक्तीच्या एका सकारात्मक भावनेला गल्ली-नाक्यावर विकल्या जाणार्या गजर्याचे स्वरूप आले आहे. जिला हवा तिने घ्यावा नि केसांत माळून मिरवावा . गजरा विकत घेण्यासाठी निदान चार पैसे खर्च करावे लागतात. पण देशभक्ती त्याहून स्वस्त क्रयवस्तू होऊन बसली आहे. यात पैसे खर्च न करता फक्त चार शब्द खर्च करुन भागते. आणि ते शब्द पानाच्या पिंकेसारखे एखाद्यावर थुंकून त्या मलीनतेकडे बोट दाखवून ’हा बघा राष्ट्रद्रोह’ म्हटले, की आपण आपोआप राष्ट्रभक्त होऊन देश नावाच्या मॉलमधी… पुढे वाचा »
बुधवार, ३ मार्च, २०२१
कला, कलाकार आणि माध्यमे
-
(यापूर्वी रमतारामाच्या विश्रांतीस्थळी लिहिलेला आणि 'अक्षरनामा’वर प्रसिद्ध झालेला हा लेख, विषयाच्या संगतीमुळे ’वेचित...’ वर हलवला आहे.) How I Make a Living with MUSIC! (Taylor Davis) दोन-एक आठवड्यांपूर्वी यू-ट्यूवबर एक चलच्चित्र लघुपट (Animation short-film) पाहात होतो. सोबत डिस्ने स्टुडिओजच्या ’मोआना’ या चित्रपटातील एका गाण्याची शिफारस दिसली. टेलर डेव्हिस नावाच्या एका कलाकाराने हे गाणे व्हायलिनवर वाजवलेले होते. कारोलिना प्रोत्सेंको या छोटीमुळे मी नुकतेच व्हायलिनवर वाजवलेली गाणी ऐकू लागलो होतो. त्यामुळे साहजिकच हे गाणेही ऐकले... पाहिलेही! कारोलिनाचे सादरीकरण प्रामुख्याने पथ-प्रदर्शन (किंवा पथ-सादरीकरण) स्वरुपात होते. तिची अंगभूत लय वगळता … पुढे वाचा »
रविवार, २८ फेब्रुवारी, २०२१
देवबाप्पा, डार्विन आणि शेल्डन
-
मागील दशकामध्ये ‘द बिग बँग थिअरी’ नावाची एक मालिका बरीच गाजली. बिनचूक स्मरणशक्ती नि बुद्धिमत्ता, पण अव्यवहारी, औपचारिकतेला संपूर्ण फाटा देणारे असे वर्तन असलेला शेल्डन नावाचं एक पात्र त्यात विशेष भाव खाऊन गेले. ज्यांना नायक (Hero) म्हटले जाते अशा प्रमुख पात्रांच्या रूढ प्रारुपाशी सर्वस्वी विसंगत असे हे पात्र होते. अशा जगावेगळ्या व्यक्तीची बालपणी जडणघडण कशी झाली असावी असे कुतूहल अनेक विचारी प्रेक्षकांच्या मनात उमटले तर नवल नाही. या कुतूहलाचे बोट धरून ‘यंग शेल्डन’ या नावाची आणखी एक मालिका प्रसारित झाली. त्यात जैविक वयापेक्षा कैकपट अधिक बुद्धिमान, माहितगार पण ज्याला समाजविन्मुख म्हणावा असा छोटा शेल्डन साकार केला गेला. तर्ककठोर, विवेकवादी (या शब्दाचा अर्थही त्याला तेव्हा ठाऊक नसावा) आणि न पटलेल्या गोष्टींशी वय, प्रसंग वगैरेंची भीडमुर्वत न ठेव… पुढे वाचा »
शनिवार, २७ फेब्रुवारी, २०२१
बुद्धिबळातील ‘मार्शल’ आर्ट
-
चित्रातील बुद्धिबळाच्या पटाकडे पाहिल्यावर बहुतेकांच्या मनात चित्रात दाखवलेल्या माणसाप्रमाणेच 'हा काळी मोहरी असलेला येडाय काय?' असा भाव प्रथमदर्शनी उमटेल. आपला वजीर नि हत्ती दोघेही खुशाल पांढर्याच्या प्याद्यांसमोर नि वजीराच्या पट्ट्यात आणून काय आत्महत्या करायची आहे का असा समज होईल.पण गंमत पहा. हा डाव काळ्याचाच आहे! कसा ते पाहू. पण त्याआधी खेळ्या समजण्यासाठी संदर्भ म्हणून बुद्धिबळाचा हा रिकामा पट समोर राहू द्या. यातून पटावरील चौकोन-स्थानांच्या नामकरणाची पद्धत लक्षात येईल. उदा. खालील पटावर निळ्या रंगाच्या बॉर्डरने रंगवलेला चौकोन हा F स्तंभातील (column) तिसर्या ओळीत असल्याने त्याचा उल्लेख F-3 असा केला जातो. १. आता काळ्याची खेळी… पुढे वाचा »
शुक्रवार, १९ फेब्रुवारी, २०२१
त्या बाजूने पाहाताना
-
काही काळांपूर्वी साठवून ठेवलेलं टॉम आर्मस्ट्राँगच्या मार्विनचं हे भाष्यचित्र* काल सापडलं. मार्विन आणि जॉर्डन ही जोडगोळी अजून सर्वस्वी परावलंबी आयुष्याच्या टप्प्यावर आहे. माणसाच्या पिल्लाचे पहिले स्वावलंबी काम म्हणजे स्वत:ची स्वच्छता स्वत: करणे. ही पहिली 'जबाबदारी’ स्वीकाराण्यास मार्विन नाखूष आहे. इतके छान चाललेल्या आयुष्यात होऊ घातलेला हा बदल त्याच्या दृष्टीने ’जगाची उलथापालथ करणारा’ आहे. आणि म्हणून त्याला तो भयकथेचे रूप देतो आहे. सापेक्षता आणि दृष्टीकोन हे खरंतर जगण्याचे अविभाज्य भाग आहेत. बहुतेकांना तत्त्वतः - किंवा तोंडतः :) - मान्यच असते. परंतु असे असले तरी त्यांच्या जाणीवेत असतात असे मात्र नाही. सर्वसामान्य माणूस व्यक्त होताना किंवा साहित्यिक, कलाकार, परफॉर्मर याचे भान ठेवतीलच असे मात्र… पुढे वाचा »
मंगळवार, २ फेब्रुवारी, २०२१
भाषा: राष्ट्र, धर्म... आणि हत्यार
-
( अलिकडेच द वायर या संस्थळाने हिंदी-उर्दू भाषेच्या राजकारणावर अथेर फारुकी यांनी लिहिलेला एक लेख प्रसिद्ध केला आणि मी पूर्वी फेसबुकवर लिहिलेल्या या पोस्टची आठवण झाली. थोड्या बदलांसह ’वेचित’ वर नोंदवून ठेवतो आहे. ) राष्ट्र (nation) ही अखेर एक संकल्पना आहे. त्याच्या सीमारेषा तुम्हाला आखाव्या लागतात, समाजाच्या गळी उतरवाव्या लागतात. राष्ट्राच्या भौगोलिक, भाषिक, वांशिक अशा अनेक प्रकारच्या व्याख्या निर्माण केल्या गेल्या, रुजवल्या गेल्या. त्याआधारे राजकीय सत्ता उभ्या राहिल्या, देश (state) निर्माण झाले. 'आमच्या देशाला इतक्या वर्षांचा इतिहास आहे' वगैरे वल्गना वर्तमानात कर्तृत्वाची वानवा असलेले, किंवा त्यासाठी करावे लागणारे कष्ट वा मेहनत करण्याबाबत आळशी असणारे, आणि भविष्याची भीती गाडून टाकण्यास उत्सुक असणारे, भूतकालभोगी समाजच असले आधारही… पुढे वाचा »
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)







