RamataramMarquee

सूची: अनुक्रमे  ▶ वेचे  ▶ वेचताना  ▶ दृक-श्राव्य  ▶

गुरुवार, ६ ऑक्टोबर, २०१६

माणसे


  • पण दुर्दैवाने या रमण्यालाही भावल्यासारखी नाटकात कामे करायची खाज. एकदा कुठे काम मिळाले म्हणून त्याने भावल्याची मिशी उसनी घेतली. नाटक संपल्यावर काय झाले कोण जाणे, पण झोपायला जायच्या गडबडीत रमण्या मिशी कुठे विसरला. दोन प्लेट भजी आणि दोन कप चहा मोफत द्यायच्या अटीवर आणलेली मिशी गहाळ झाली. पण भावल्याने रमण्याची गय केली नाही. प्रथम दोन प्लेट भजी आणि दोन कप चहा फस्त केला आणि मग भांडण सुरू केले. ताबडतोब मिशी आणून दे, नाहीतर खटला भरतो अशी त्याने धमकी दिली. रमण्या काही कोकणाबाहेरचा नव्हता. खटल्याचे आव्हान मिळताच त्याला स्फुरण चढले. चहाला लालभडक अर्क स्वतःच्या आणि दुसर्‍याच्या नरड्यात ओतणारा रमण्या स्वत:च्या मिशीला पीळ देत भांडायला सज्ज झाला. भावल्याने नुसते खटल्याचे नाव काढताच रमण्याने हायकोर्टाचे नाव काढले. एकदा काय व्हायचे ते होऊन जाऊ दे! पर्वा नाही हायकोर्टात जावे लागले तरी. चहाचे खोपट विकीन आणि खटला चालवीन. मिशी तर सोडाच, पण भावल्याला शेंडीचेसुद्धा चार केस देणार नाही अशी प्रतिज्ञा रमण्या भर बाजारात करू लागला. जिवा शिंग्याने दादू गुरवाची कापली तश...

    पुढे वाचा »

सोमवार, १९ सप्टेंबर, २०१६

वेचताना... : परिव्राजक


  • गौतमीपुत्र कांबळे या लेखकाचे 'परिव्राजक' हे पुस्तक मला सुमारे दहा एक वर्षांपूर्वी मिळाले नि जीएप्रेमी असलेला मी त्याच्या प्रेमात पडलो.  जीएंच्या पाउलखुणा जरी त्या लेखनात दिसत असल्या तरी त्यांनी घेतलेल्या वेगळ्या पार्श्वभूमीमुळे, जीएंप्रमाणेच त्यांच्या स्वतंत्र अशा भूमिकेमुळे, दृष्टिकोनामुळे यातील पाचही कथा वारंवार वाचत गेलो. वास्तवाचे नि कल्पिताचे सांधे जोडणार्‍या जीएंच्या दृष्टान्त कथांना वाट पुसतु जात असल्या, तरी सर्वच कथा वेगवेगळ्या असूनही एक सूत्र घेऊन येतात. निव्वळ विचारांबरोबरच तत्त्वज्ञानाचेही अधिष्ठान घेऊन उभ्या राहतात.  जीए आणि कांबळे यांच्यात एक फरक मात्र दिसतो तो म्हणजे कांबळे यांच्या कथा एका निश्चित निरासावर पोचतात, जो बहुधा आशावादी आहे. अर्थात केवळ शेवट आशावादी असणे हे कथांचे श्रेय मी मानत नाही. हा फरक म्हणूनच नोंदवतो आहे. सर्वच कथांमधे एक सूत्र असे दिसते की एक मुख्य गाभा पकडून साहित्य, संगीत, शिल्पकला यासंदर्भात तो तपासला जातो आहे. अर्थात उच्च कलामूल्य वगैरे हत्यारे घेऊन येणार्‍यांचा भ्रमनिरास होईल ( तसा त्य...

    पुढे वाचा »

राजपुत्र


  • ... अनीशाने थोड्या वेळाने डोळे उघडले तर समोरच ती भव्य मूर्ती आणि बाजूलाच शांत बसलेला नैसर. अनीशाच्या मनात एक प्रचंड खळबळ निर्माण झाली आणि ती म्हणाली, 'एक विचारू?' 'विचार.' असे प्रत्युत्तर करून नैसर पुन्हा शांत. अनीशाही शांतच. बराच वेळ झाला तरी अनीशा काहीच बोलत नाही असे पाहून नैसर उगीचच अस्वस्थ झाला. आणि तरीही तो इतकंच शांतपणे पुन्हा म्हणाला, 'विचार, काहीही विचार.' मग अनीशाने सगळी ताकद एकवटली आणि बोलायला सुरुवात केली. "... या मूर्तीतील माणसाविषयी ... पूर्ण माणसाविषयी तू आता जी कथा सांगितलीस ती खोटी असली पाहिजे. म्हणजे असे बघ, त्याने आपले राज्यही सोडून दिले तेव्हा जर तो तरुण होता तर त्याचे माता-पिता म्हातारेच असणार की! मग त्याच दिवशी त्याने प्रथम एक म्हातारा पाहिला असे कसे म्हणता येईल? तसेच इतक्या दिवसांत त्याच्या राज्यात एकही मृत्यू झाला नसेल हेही संभवत नाही, किंवा एकही रोगी नसणे हे ही संभवत नाही किंवा एकही दरिद्री नसणे हे ही संभवत नाही. मग त्या एकाच दिवशी ही चारही दृश्ये प्रथमच पाहिली आणि म्हणून तो ...

    पुढे वाचा »

रविवार, ११ सप्टेंबर, २०१६

जबाब


  • पी. वाय. : ... कुळकर्णी, ह्याचा जबाब मात्र तुम्हाला द्यावा लागेल. बरीवाईट कशीही का होईना, एक इमारत आम्ही बांधत आणली आहे. तिला सुरुंग लावायला काही माणसं पेटून उठली आहेत. त्यांच्या बाजूला तुम्ही आहात का ह्याचा जबाब तुम्हाला देणं भाग आहे. खरा प्रश्न तो आहे. विचार करून उत्तरे द्या. या सगळ्या प्रकरणात आम्ही कुठं उभं राहायचं ते तुमच्या उत्तरावर अवलंबून आहे. तो : फार अवघड प्रश्न विचारलात पी. वाय. तुमची सगळी चौकशी याच दिशेने चालली आहे हे माझ्या कधीच लक्षात आलं होतं. पण पी. वाय., या प्रश्नाचं मी काय उत्तर देणार? मी मघाच तुम्हाला सांगितलं की आंधळ्या वायलन्सचा मी पुरस्कर्ता नाही. ते ही अर्धसत्य आहे. खरी गोष्ट अशी आहे की वायलन्सची मला भीतीच वाटते. मी रक्त अजून जवळून पाहिलेलंसुद्धा नाही... माणसाचं रक्त... ते सांडून शस्त्रांनी गनिमी युद्धाच्या मदतीनं इथं राजकीय उलथापालथ घडवून आणायची ह्याची कल्पनाही मी करू शकत नाही. हा मोठा देश आहे. ह्या सबंध देशाला कार्यप्रवण - कसलंही कार्य, हिंसक काय, अहिंसक काय... करायला फार थोर प्रतिभेचा माणूस पाहिजे. तो मी नव्हे हे...

    पुढे वाचा »

गुरुवार, २८ जुलै, २०१६

माय


  • भगीरथ खूप लहान असतानाच त्याची माय चंडी चेटकीण* होऊन गेली होती. मग या झपाटलेल्या चंडीला लोकांनी गावाबाहेर हाकलून दिलं. कारण अशा लहान मुलांवर करणी करणार्‍या चेटकिणीला मारून टाकता येत नाही. तिला मारलं तर गावातली पोरं जगत नाहीत. मोठ्यांवर चेटूक करणार्‍या डाइनीला जाळून मारून टाकतात, पण अशा 'बॉएन' चेटकिणीला मात्र जिवंत ठेवावं लागतं. म्हणूनच चंडीची रवानगी रेल्वेलाईन पलीकडच्या माळरानावर झाली होती. दूरवर एका लहानशा कुडाच्या झोपडीत ती एकटीच रहायची. भगीरथ मोठा झाला त्याच्या दुसर्‍या मायजवळ. ही यशी नावाची बाई त्याच्याबाबत अगदीच निर्विकार होती. ती ना त्याच्यावर प्रेम करे, ना द्वेष. स्वतःची माय काय चीज असते ते भगीरथला कधी कळलंच नाही. त्यानं फक्त माळरानावरच्या एका छातिम (सप्तपर्णी वृक्ष) वृक्षाखाली एक कुडाची झोपडी तेवढी पाहिली होती आणि त्या झोपडीत चंडी चेटकीण राहते असं ऐकलं होतं. ही चंडी कुणाची जन्मदात्री असू शकते, असं वाटणंही शक्य नव्हतं. दुरून तिच्या लहानशा झोपडीवर झेंड्यासारखी लाल कापडाची चिंधी उडताना दिसायची. कधी कधी भर चैत्राच्या रणरण...

    पुढे वाचा »

शुक्रवार, २२ जुलै, २०१६

राडीनोगा


  • मांबा हा आफ्रिकेतला सर्वात भयानक साप मानला जातो. जगातल्या अतिविषारी सापांत त्याचा क्रम बराच वरचा आहे. पूर्ण वाढ झालेल्या 'मांबा'ची लांबी १० फुटांपेक्षा जास्त असते. अतिशय चपळ असलेला हा नाग तितकाच आक्रमकही असतो. तो अतिशय सावध असतो नि आसपास जराशी हालचाल झाली की तो झटकन आक्रमक पवित्रा घेतो. फणा उभारलेली, उघड्या तोंडातून जीभ बाहेर येते आहे, त्यातून येणारे त्याचे फुस्कारे हे दृश्य भल्याभल्यांच्या जीवाचा थरकाप उडवते. यास्थितीत तो कुठल्याही दिशेस हल्ला करू शकतो. या वेळची त्याची झेप भयावह असते. घोड्यावर बसलेल्या माणसावरही हल्ला करण्याची क्षमता या झेपेत असते. मांबाचं विष चेताहारी असतं. या विषाचे दोन थेंब शरीरात गेलं की ३० सेकंदात माणूस मरतो. 'मांबा'चा आफ्रिकन जनमानसावर इतका प्रचंड पगडा आहे, की कुणीही माणूस कुठलाही साप बघितला की त्याला 'हिरवा' किंवा 'काळा' मांबा दिसला असं सांगतो. 'हिरवा' नि 'काळा' हे रंग वेगळे असले तरी दोघांचं विष तितकंच विषारी असतं. फक्त काळा मांबा हिरव्या मांबापेक्षा अधिक भयानक दिसतो. पण त्यामुळं आफ्रिकेत वावरणारे 'सापपकडे...

    पुढे वाचा »

शनिवार, १६ जुलै, २०१६

धंदा


  • सरदारजीनं चार आण्याचं नाणं दिलं. झिपर्‍याकडे पाच पैसे यावेळी असणं शक्य नव्हते आणि असते तरी त्यानं भवानीच्या वेळी ते काढले नसते. 'साब, पाच पैसा... छुटा नाय...', त्यानं आवाज केला. सरदारजीनं पुन्हा नुसती मान हालवून 'राहू दे' असं सुचवलं. आज झिपर्‍याचं तकदीर खरोखरंच जोरदार दिसत होतं. पहिल्याच माणसाने भवानी द्यावी आणि भवानीच्या गिर्‍हाईकानं पाच पैसे जादा सोडावे यापेक्षा अधिक मोठा असा शुभशकुन कोणता? झिपर्‍यानं ते नाणं ठोकळ्यावर ठोकलं, कपाळाला लावलं आणि खिशात ठेवलं. नंतर तर केवळ चमत्कारच घडला. सरदारजीचं संपण्याची जणू वाटच पाहत असल्याप्रमाणे शेजारच्या माणसानं आपण होऊन आपला बूट पुढे केला. आज झिपर्‍याचा धंदा बरकतीला येणार अशी स्पष्ट लक्षणं दिसंत होती. बाहेर पाऊस असो वा तुफान, असा चमत्कार कधी घडला नव्हता. झिपर्‍यानं त्या दुसर्‍याच्याही बुटाला मऊसूत घोळवून मोठ्या काळजीपूर्वक चमकावून काढलं आणि वीस पैसे खिशात टाकले. कुर्ल्याला गाडी पोचत असतानाच फलाटावरच्या गर्दीनं अंग चेचून निघण्याच्या आधीच झिपर्‍या सफाईनं खाली उतरला आणि धोपटी सावरीत ...

    पुढे वाचा »

शनिवार, २ जुलै, २०१६

करड्या बछड्याचे जग


  • भर दुपारच्या प्रखर प्रकाशातून सरपटत गुहेत शिरणारी रानमांजरी बछड्याला दिसली. त्या क्षणी त्याच्या पाठीवरले सारे केस लाट उठल्याप्रमाणे पिंजारत उभे राहिले. समोर मूर्तिमंत भीती उभी आहे हे कळायला अंतःप्रेरणेची गरज नव्हती. आणि ते अपुरं वाटलंच तर दात विचकत तिचं फिस्कारणं आणि मग कर्कश आवाजात ओरडत किंचाळणं कोणाच्याही काळजाचं पाणी करायला पुरेसं होतं. डिवचल्या गेलेल्या आत्मविश्वासाने करडा बछडा आईशेजारी उभा ठाकला, आवेशाने रानमांजरीवर भुंकला. पण त्याच्या प्रतिष्ठेची पर्वा न करता लांडगीने त्याला पाठी ढकललं. अरुंद, बुटक्या प्रवेशद्वारातून आत उडी घेणं रानमांजरीला शक्य नव्हतं. वेड्या रागाने ती सरपटत आत आली आणि लांडगीने झेप घेत तिला खाली चिरडलं. पुढे काय झालं ते बछड्याला नीट दिसलंही नाही. कर्णकर्कश भुंकण्याने, ओरडण्याने, आक्रोशाने गुहा भरून गेली. रानमांजरी तिच्या नखांनी, दातांनी बोचकारत, चावत होती तर लांडगी फक्त दातांनी प्रतिकार करत होती. एक भयंकर झटापट सुरू झाली होती. एका क्षणी करडा छावाही झेपावला. रानमांजरीच्या मागच्या पायात त्याने दात रुतवले. हिंस्रपणे ...

    पुढे वाचा »