RamataramMarquee

सूची: अनुक्रमे ▶ वेचे ▶ वेचताना ▶ दृक-श्राव्य ▶

बुधवार, १७ जुलै, २०२४

नकार : एक दैवी गुण


  • जो माणूस लिहितो, त्याने बोलावे; अशी अपेक्षा का बरे केली जाते? नुसती अपेक्षा नव्हे; तर आग्रह केला जातो, भीड घातली जाते, मध्यस्थ घातला जातो. आणि हे सगळे कशासाठी, तर व्याख्यान व्हावे म्हणून! आज एकाएकी मला जाणीव झाली आहे की, व्याख्यान देणे हा अत्यंत फालतू उद्योग आहे. मी सहसा व्याख्यान देण्यासाठी कुठे जात नाही. नम्रपणे नकार देतो. पण पुष्कळदा मित्रांच्या शब्दाखातर किंवा नातेवाइकांच्या आग्रहाखातर मला कुठे-कुठे ‘हो’ म्हणावे लागते. असे दोन होकार मी नुकतेच देऊन बसलो होतो आणि आपण हा काय मूर्खपणा केला, म्हणून आता पश्चात्ताप पावत होतो. मला गावोगावची फार निमंत्रणे येतात, असे मला म्हणावयाचे नाही; पश्चात्तापाचे ते कारण नाही. लोकप्रिय वक्ता म्हणून मला कोणी मोजत नाही. पण अधून-मधून कुणाच्या तरी भिडेला बळी पडून मी इंदापूर किंवा धामणगाव कॉलेजमध्ये जाऊन वाङ्मय मंडळाचे उद्घाटन करावयाचे मान्य करतो आणि एस.टी.चा प्रवास सोडून एक तासभर भाषण देण्याचा मूर्खपणा आपण का केला, म्हणून पश्चात्ताप पावतो. हे मी का बरे पुनःपुन्हा करतो? काय आहे त्यात ? ना प्रसिद्धी, ना वैभव, ना चैन, ना मिळकत! पंच्याऐंशी मैल जायचे, दोन द...

    पुढे वाचा »

बुधवार, १० जुलै, २०२४

लेखकजिज्ञासायोग


  • (आज १० जुलै, गुरुनाथ आबाजीचा जन्मदिवस. त्या निमित्ताने त्याच्या कथालेखनाहून वेगळे, अनुभवनजन्य चिंतनशील लेखन असलेल्या ‘माणसे: अरभाट आणि चिल्लर’ मधील हा वेचा...) काही विचारायला तुझ्याकडे आता यायचे ते अगदी कोडगेपणानेच. ‘हे सारे जाणून घेण्याचे तुला प्रयोजन काय ? मी सर्वत्र आहे, हे तू जाण. तेवढे बस्स आहे.’ अशी एक टपली तू प्रत्यक्ष अर्जुनालाच मारली आहेस. तेव्हा तू काय मला पायरीवर पाऊल टाकू देणार ? तू सर्वहर, सगळ्यांचा मृत्यू आहेस, भविष्यकाळी उद्भव आहेस. हे सारे ठीक आहे. पण हे सारे आहे कशासाठी ? आधी सगळ्यांना जन्माला घालायचे, त्यांचे भोग त्यांना भोगू द्यायचे, आणि शेवटी ‘मी साऱ्यांना आधीच मारले आहे’, असे म्हणायचे. कुणी शरपंजरी पडलेले असल्यास त्यांस, शस्त्र खाली ठेवलेल्या वीरांस, ज्याच्या पावलात एका भिल्लाने मारलेला बाण लवकरच शिरणार आहे अशा निद्रिस्त महापुरुषास– –या सगळ्यांना तू आधीच मारले आहेस. सामान्य माणसे मरतात, थोरांचा अवतार संपतो. पण दोघांनाही मृत्यू समान असतो. त्याला तूच जबाबदार आहेस. मग हे सारे निर्माण तरी कशासाठी केलेले ? ...

    पुढे वाचा »

शुक्रवार, ३१ मे, २०२४

आद्य मराठी-सारस्वतांचा निघंटु


  • मुकुंदराज गेल्या प्रकरणात आपण महाराष्ट्र आणि मराठी हे शब्द कसे आले ते पाहण्याचा प्रयत्न करून तो नाद सोडला. आता माणसे निमूटपणे बोलावयाचे सोडून लिहावयाला कशी लागली आणि त्यांच्यामागे असा कुठल्या संपादकाचा अगर प्रकाशकाचा तगादा लागला होता हे पाहावयाचे आहे. मुकुंदराजाचा 'विवेकसिंधु' हा पहिला मराठी ग्रंथ म्हणतात. पण ते चूक आहे. आता मुकुंदराज हा आद्य लेखक कसा? शक्यच नाही. उद्या वाटेल तो स्वतःला आद्य म्हणेल. शिवाय हाताशी पाचपन्नास ग्रंथ असल्याशिवाय एवढा मोठा ग्रंथ होणे शक्य नाही. महाराष्ट्रात आधी खूप ग्रंथरचना होती. किंबहुना, आधी सगळे कोश, संदर्भग्रंथ वगैरे तयार करूनच दंडकारण्यातल्या राक्षस, यक्ष, वगैरे लोकांना मराठी शिकविले. काही दिवस मराठी ही त्यांची सेकंड लँग्वेज होती. राक्षसी, यक्षी वगैरे भाषा चालू होत्या. त्यांना प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच देत. राक्षसी भाषेच्या पहिलीच्या पुस्तकात धडा होता : मूळ पुस्तकातून साभार. काका उठा जबडा उघडा हा रामा आला त्याचा फडशा पाडा. फडशा, जबडा,...

    पुढे वाचा »

शनिवार, २५ मे, २०२४

छोटीशीच आहे फौज आपुली


  • मनुष्यप्राणी हा सर्वांत बुद्धिमान प्राणी हे तर खरेच. पण इतरही प्राण्यांना आपापल्या परीने कमीअधिक बुद्धी असतेच. स्वसंरक्षणासाठी तरी ते थोडीफार अक्कल वापरतातच. मत्स्यावतार हा आपण प्रथमावतार मानतो. माशांचेच उदाहरण घेतले तर पाण्याखालच्या साम्राज्यातला जगायचा पहिला हक्क हा माशांचा. पोटासाठी मच्छीमारी करणाऱ्या कोळ्यांना माशांनी आजवर समजून घेतले. तो एक निसर्गक्रमच आहे म्हणा किंवा जीवसृष्टीचा तो नियम आहे म्हणा किंवा जीवनचक्र अखंडित राहण्यासाठी अत्यावश्यक अशी अट आहे म्हणा, मासे स्वतःही आपल्याहून छोटे मासे खातात, तेव्हा माणसानेही खाण्यासाठी मासे पागले तोवर माशांनीही समजूतदारपणा दाखवला. पण यंत्रयुगातला मानव जेव्हा वेगवेगळी स्फोटके, हत्यारे शोधून काढून पाण्याखालच्या साम्राज्यात घुसखोरी करून, कधी गंमत म्हणून तर कधी शिकार म्हणून, कधी भौतिक शोधातली आव्हाने स्वीकारावी आणि शौर्य गाजवावे म्हणून स्वतःचे बुद्धिश्रेष्ठत्व सिद्ध करायला लागला, तेव्हा माशांनाही मग विचार करणे भाग पडले असावे. स्वतःच्या मर्यादांचा त्यांनी अंदाज घेतला. स्वसंरक्षणाचे नवे मार्ग शोधून काढले. त्या त्या हत्याराच्या विध्वंसक शक्तीची...

    पुढे वाचा »

शुक्रवार, १७ मे, २०२४

वेचताना... : आज धारानृत्य चाले...


  • महानगरी आयुष्यात माणसाच्या दृष्टीने वैय्यक्तिक पातळीवर पावसाचे अप्रूप फारसे राहिले नसले, तरी अनागर आयुष्यामध्ये उन्हाळ्याची काहिली शमवणारा आणि सुगीची चाहूल देणारा पाऊस जीवनदायी नि हवासा वाटणारा. पावसाचे हे कवतिक मानवाप्रमाणेच मानवसदृश प्राण्यांमध्येही तितकेच असोशीने व्यक्त केले जाते याची प्रथम नोंद डॉ. जेन गुडाल या विदुषीने केली आहे. जेन गुडाल यांनी चिम्पान्झी या वानरकुलातील मानवाचा भाऊबंद मानल्या गेलेल्या प्राण्याच्या अभ्यासासाठी सारे आयुष्यच वेचले आहे. व्यंकटेश माडगूळकरांनी त्यांच्या ‘ चित्रे आणि चरित्रे ’ या पुस्तकामध्ये ‘ साहसी संशोधक: जेन गुडाल ’ (१) या शीर्षकाखाली तिच्यावर एक लेख लिहिलेला आहे. त्या लेखामध्ये जेनने अनुभवलेल्या एका प्रसंगाचे वर्णन त्यांनी दिले आहे. (२) एके दिवशी सकाळपासून आभाळ भरून आलं होतं. एका मोठ्या उंबराच्या झाडावर चरणाऱ्या चिंपॅन्झींचा कळप न्याहाळत जेन आपल्या नेहमीच्या डोंगरावरच्या शिळेवर बसली होती. झाडावर डेव्हिड होता. गॉलिथ होता. काही माद्या होत्या. काही तरुण नर होते, पोरं होती. आणि एकाएकी वादळ सुरू झ...

    पुढे वाचा »

गुरुवार, ९ मे, २०२४

वेचताना... : जिज्ञासामूर्ती


  • ‘एक ना धड भाराभार चिंध्या’ म्हणा किंवा ‘अनावर जिज्ञासा नि अशक्त चिकाटी’ म्हणा अशा वृत्तीने जगत असताना मला स्तिमित करणारे बरंच काही सापडत गेलं. रुजलं नाही तरी भावत गेलं. काही वर्षांपूर्वी पक्ष्यांबद्दल कुतूहल जागं झालेलं असताना एका निसर्गप्रशिक्षण शिबिराला उपस्थिती लावली होती. तिथे प्रायमेट्स म्हणजे वानरकुलातील प्राण्यांवरील व्याख्यानामध्ये जेन गुडाल या विदुषीचे नाव प्रथम ऐकले होते. मोजका काळ वगळता सारं आयुष्य चिंम्पान्झींच्या सहवासात व्यतीत करुन चिकाटीने त्या प्रजातीच्या जगण्याचे तिने दस्तऐवजीकरण केले होते. त्यातून मानवी जीवनप्रवासाच्या अनेक कोड्यांना सोडवण्यात अनुभवसिद्धता, निरीक्षणक्षेत्रात मोठा वाटा उचलणार्‍या या स्त्रीने मला स्तिमित केले होते. पुढे तिच्यासह तसंच तिच्या अनुभवाच्या आधारे चित्रित केलेले काही माहितीपट पाहण्यात आले नि तिच्या अफाट कामाची प्रचिती येत गेली. पण पुढे असे लक्षात आले, की असली अफाट जिज्ञासा नि समर्पणभाव घेऊन जगलेली ही एकच नाही. डायान फॉसी नामे आणखी एक माऊली गोरिला या अन्य वानर प्रजातीशी याच धर्तीवर जोडली गेली आ...

    पुढे वाचा »

जिज्ञासामूर्ती


  • संशोधनकार्यात दोन दृष्टिकोन असतात: एक म्हणजे, सृष्टीवरच्या प्राणिमात्रांचं जीवन नैसर्गिकच राहावं, मात्र त्याचं गणित समजलं तर आपलं स्वतःचं जीवन अधिक समृद्ध होईल, म्हणून शोधकार्याला महत्त्व देणारे सत्प्रवृत्त संशोधक असतात. लुई लीकी हा अशांपैकी एक. रॉबर्ट यर्क्स हा अर्थातच दुसऱ्या प्रकारच्या संशोधकांत मोडतो. आपल्या अगतिक समाजजीवनाच्या सीमा ओलांडून, मनुष्यप्राण्यांपासून दूरच्या रानावनांत, घनदाट जंगलात, डोंगर कपारीत वास्तव्याला जावं आणि तिथल्या प्राणिमात्रांच्या नैसर्गिक जीवनप्रवाहात तीळमात्रही ढवळाढवळ न करता, उत्क्रान्तीच्या माळेतला आजच्या घडीला शेवटून दुसरा, म्हणजे माणसाच्या आधीचा मणी जो माकड, त्याच्या जातीचे गोरिला, ओरँगऊटँग, चिंपँझी हे जे तीन प्राणी आहेत, त्यांच्या जीवनाचा शोध घ्यावा असाही प्रयत्न काही शास्त्रज्ञांनी केला. हे प्राणी आणि मनुष्यप्राणी यांच्यातली दरी ओलांडता येते का, नातं शोधता येतं का, यांना जोडणारा धागा कुठे सापडतो का, हे पाहण्यासाठी लुई लीकी (Louis Leakey) या शास्त्रज्ञाने तीन सुशिक्षित तरुण मुलींची योजना केली. वैयक्तिक गरजा अत्यल्प असलेल्या, कष्टांची पर्वा नसलेल्य...

    पुढे वाचा »

शनिवार, २७ एप्रिल, २०२४

न स्त्री स्वातंत्र्यमर्हती


  • नोरा फातेही या अभिनेत्रीने स्त्रीस्वातंत्र्याबद्दल अनुदार भूमिका घेत दिलेल्या मुलाखतीच्या निमित्ताने आज लोकसत्तामध्ये गायत्री लेले यांचा ‘ ट्रॅड वाइफचा आभासी ट्रेंड ?’ हा लेख प्रसिद्ध झाला आहे. त्याच सोबतीला एकोणीसाव्या शतकाच्या अखेरीस (या काळाचे महत्त्व वेचताना...: स्वातंत्र्य आले घरा या लेखामध्ये अधोरेखित केले आहे.) अमेरिकेमध्ये सुरु झालेल्या स्त्री-स्वातंत्र्य नि स्त्री-हक्क यांच्या चळवळीबाबत एका पौगंडावस्थेतील मुलाने केलेले हे टिपण, मॅन्युअल कॉमरॉफ यांच्या ‘बिग सिटी, लिट्ल बॉय’ या स्मरण-नोंदींमधून (memoirs). पुरुषी अहंकार, नव्या कल्पनांची टवाळी, अधिक्षेप, त्याकडे मनोरंजन म्हणून पाहाणे वगैरे टप्पे पाहता भारतीय समाजालाही ही निरीक्षणे बरीचशी चपखल बसतील. --- चित्रपटाप्रमाणेच आणखीही एक नवा करमणुकीचा प्रकार आला– ‘सफ्रेजेट्स’. सफ्रेजेट्स या बाया होत्या. पुरुषांच्या बरोबरीने राजकीय हक्क स्त्रियांना असलेच पाहिजेत, असा आग्रह असलेल्या बाया. आतापर्यंत बायकांनी नोकरीधंद्यात हलके-हलके शिरकाव करून घेतलाच होता. त्यांची प्रगती सावकाश पण नेमकी ह...

    पुढे वाचा »