-
प्रास्ताविक: आज १५ जुलै, गुरुवर्य कुरुंदकरांची जयंती. माझ्या आयुष्याच्या ज्या वळणावर स्थैर्य समोर दिसते आहे, भविष्याच्या खिडकीतून पैसा, घर, संपत्ती, गाडी, उच्च पद, परदेशवारी इ. इ. साचेबद्ध जगणे समोर दिसते आहे अशा वळणावर कुरुंदकर मला सापडले. विचारांचे इंद्रिय जागे करणारे, एखाद्या मुद्द्याच्या अनेक बाजू बारकाईने तपासून त्यांचे गुण-दोष मांडणारे; अखेर त्यातील एक निवडावी लागते तेव्हा 'ती का निवडली' याचे विवेचन करतानाही त्यातील दोषांना नाकारण्याच्या दांभिकपणा न करण्याचे बजावणारे गुरुवर्य कुरुंदकर हे पहिले. त्यानंतर आणखी काही जणांची यात भर पडली तरी अग्रपूजेचा मान कुरुंदकरांचाच. त्या अर्थी माझ्या आयुष्यांत नि मोडक्यातोडक्या विचारांत त्यांचे स्थान अतिशय मोलाचे आहे. शिवछत्रपतींप्रमाणेच अल्पायुषी ठरल्याने त्यांचे कार्य अपुरे राहिले असले, … पुढे वाचा »
RamataramMarquee
अर्ध्यावरती डाव मोडला...       वारसा, जिज्ञासा आणि ज्ञान - २ : पण याचा उपयोग काय?       पौरुषाचा कांगावा      वारसा, जिज्ञासा आणि ज्ञान - १. वृद्धत्वाची जेथ प्रचिती...       काव्य-मोतीचूर ऊर्फ काही ‘चविष्ट’ प्रेमकविता       चला दोस्तहो, खाण्यावरती बोलू काही       मूषकान्योक्ती       सुजन गवसला जो      
Indexes Menu_Desktop
संपूर्ण सूची : |
शनिवार, १५ जुलै, २०२३
विकेंद्रीकरण: एक आकलन
सोमवार, १० जुलै, २०२३
पिकासोचे घुबड
-
जगप्रसिद्ध चित्रकार पाब्लो पिकासो ह्यालाही असा शिकारखाना पाळण्याची हौस होती. त्याच्याकडे पिवळ्या रंजन रंगाचे, कुलूकुलू बोलणारे कनारी पक्षी होते. कबुतरे होती. ‘टुर्टलडव्हज्' जातीची पाखरे होती. आपल्या मित्रांच्या हेतूबद्दल पाब्लोला जसा संशय असे, तसा या मित्रांबद्दल नसे. म्युझियममधल्या कोपऱ्यात सापडलेले एक जखमी घुबड त्याला कोणा मित्राने आणून दिले. ह्या घुबडाचा एक पंजा दुखावलेला होता. काही दिवस मलमपट्टी केल्यावर तो बरा झाला. मग या घुबडासाठी सुरेख पिंजरा आणून इतर पक्ष्यांबरोबर पाब्लोने त्यालाही पाळले. घरातली सगळी माणसे ह्या दिवाभीताशी प्रेमाने वागत. येता-जाता त्याच्या पिंजर्याशी जाऊन बोलत. पण घुबड फार माणूसघाणे होते. ते सर्वांकडे रखारखा बघत असे. सगळे पाळीव पक्षी स्वयंपाकघरात होते. पाब्लो किं… पुढे वाचा »
Labels:
डोहातील सावल्या,
पुस्तक,
व्यंकटेश माडगूळकर,
स्फुट
बुधवार, २८ जून, २०२३
None was worth my strife...
-
पाईप ओढायला लागलो त्याला आता वर्षाचा काळ लोटून गेला. जाणीवपूर्वक ही सवय मी स्वतःला जडवून घेतली आहे. मी एकांतप्रिय माणूस आहे. त्याहीपेक्षा दिवसभराची वर्दळ एकदा शांत झाल्यावर आरामखुर्चीत बसून पाईप ओढणे आताशा मला आवडू लागले आहे. या सवयीचा उगम माझ्या मनोवृत्तीतच आहे. कुठलेही मानसिक किंवा शारीरिक दडपण असह्य झाले की, प्रत्येक माणूसच मुक्तीचा मार्ग शोधीत असतो. माझे तसे नाही. मुक्ततेचा जो नाग मी कवटाळतो तोच मुळी माझ्या वृत्तीचे एक इंद्रिय म्हणून माझ्या जीवनात स्थायिक होऊन जातो. मग माणसे असोत की वस्तू! एखादा अनाथ मुलगा आपल्याकडे वार लावून जेवीत असावा, आणि अचानक आश्रित म्हणून आपल्याच घरी कायमचा राहून जावा, तसाच हा प्रकार आहे. पण या प्रक्रियेत माझ्या बाबतीत एक गंमत नेहमीच घडून आली आहे. वस्तू व व्यक्तीच्या संबंधाचा जिथे नेमका व अटळ शेवट होतो तिथूनच मा… पुढे वाचा »
रविवार, १८ जून, २०२३
वाळूचा किल्ला
-
गोव्यातला 'कलंगुट' हा प्रसिद्ध सागरकिनारा. दिवस कलला होता. उन्हे सौम्य झालेली होती... समोर निळा सागर गर्जत होता आणि वाळूत रंगीबेरंगी माणसे हिंडत होती. सोबतीला कोणी नसल्यामुळे मला फार एकटे वाटत होते. गोव्यात डेप्युटेशनवर येऊन मला महिना झाला होता. मुलाबाळांची आठवण येत होती. ह्या सुरेख, निसर्गरम्य प्रदेशात आपण एकटे का आलो? उद्योग-धंद्याच्या निमित्ताने आपण एवढे भटकतो; पण सदैव एकटे, असे का बरे ? गर्दीतून बाजूची जागा बघितली आणि वाळूत पाय रोवून बसलो. दोन्ही हात वाळूत खुपसले. निळ्या-निळ्या पाण्यावर दृष्टी पसरली. उगाचच ओळी ओठांवर आल्या- 'ने मजसी ने परत मायभूमीला सागरा, प्राण तळमळला. ' एवढ्यात चिमुकला, गोड आवाज आला, "अहो- " "का हो?" "जरा लक्ष ठेवा हं, माझ्या किल्ल्याकडं." "का? तुम्ही क… पुढे वाचा »
सोमवार, १२ जून, २०२३
स्वातंत्र्य आणि गुलामगिरी
-
तो बाहेर पडून चालू लागला तेव्हा त्याला कोणीतरी हाक मारली व थांबवले. एका घराच्या कट्टयावरून एक माणूस उतरला व त्याच्याकडे आला. त्याने किंचित आश्चर्याने पाहिले व लगेच त्याला ओळख पटली. तो माणूस. मघाचा व्यापारी होता. “ मी तुझीच वाट पाहत थांबलो होतो, हे ऐकून तुला आश्चर्य वाटेल, नाही ?” व्यापारी म्हणाला. त्याच्या आवाजात रेशमी कापडाच्या घडीचा मृदुपणा होता. त्याच्या बरोबर चालू लागता त्याने हात मागे एकमेकात अडकवले व तो म्हणाला, “तूही एक प्रवासी आहेस, तू कोठेही जायला मोकळा आहेस, म्हणून मी तुझ्याशी बोलायला थांबलो होतो. जर तू पायमोकळा आहेस, तर तू एखादे काम स्वीकारशील ? त्यात तुम्हा भरपूर द्रव्य मिळेल, अनेक शहरे पाहता येतील आणि तुझ्यावर कसलीही जबाबदारी राहणार नाही. ” “म्हणजे अगदी मनाजोगते काम दिसते हे ! ” तो हसून म्हणाला. “ खरे म्हणजे मी प्रवासी नाह… पुढे वाचा »
बुधवार, १७ मे, २०२३
वारसा आणि विचार
-
काहीतरी उत्तर द्यायला कमल सरसावत होती. पण तितक्यात मागून कुणीतरी तिला डिवचल्याचे जाणवले. तिनं मागे वळून पाहिले तेव्हां शिवनाथ म्हणाला, “आतां ही चर्चा राहू दे." कमलनें विचारलें, "कां ?" शिवनाथने नुसतें उत्तर दिलें, "असंच सहज !" एव्हढेच बोलून तो गप्प राहिला. त्याच्या बोलण्याकडे कुणी विशेष लक्ष दिले नाहीं. त्या उदास आणि विचुक नजरेच्या मागें कोणती गोष्ट छपून राहिली होती ती कुणाला कळली नाहीं कीं कुणी कळून घ्यायचा प्रयत्न केला नाहीं. कमल म्हणाली, "अं: ! असंच सहज का ? घरी जायची घाई झालीय वाटतं ? पण घर तर बरोबरच आहे !" असे म्हणून ती हंसली. आशुबाबू ओशाळले, हरेंद्र अक्षय गालांतल्या गालांत हंसले, मनोरमेनें दुसरीकडे नजर फिरवली, पण ज्याला उद्देशून हे उत्तर आलें होतें त्या शिवनाथच्या सुंदर चेहेर्यावरची एक रेषा… पुढे वाचा »
Labels:
अनुवाद,
पुस्तक,
भा. वि. वरेरकर,
शरच्चंद्र चॅटर्जी,
शेषप्रश्न
सोमवार, ८ मे, २०२३
तहान
-
दुपारची डुलकी झाल्यावर, पुन्हा कोवळी पानं, भेंड, कळे, मोहाची दोडी फळं खात, उड्या हाणीत हळूहळू वानरांची टोळी पाण्याच्या दिशेनं सरकू लागली. कडक उन्ह होतं. अशा उन्हात जिवाचं पाणी-पाणी होणं अगदी साहजिक होतं. पण पाण्यावर जाणं, ही या निर्मनुष्य अरण्यात फार जोखमीची गोष्ट होती. इथं पाण्याच्या आसपास आणि पाण्यात काळच दबा धरून बसला होता. पाणी हे जीवन होतं, तसंच मरणही होतं. म्हणून वानरं कधी मोठ्या जलाशयावर तहान भागविण्यासाठी जात नसत. ओढ्या-ओघळींच्या डबक्यातलं चुळकाभर पाणी त्यांना पुरेसं होई. आता उष्णकाळ होता. जंगलातलं सगळीकडचं पाणी आटलेलं होतं. तळ्याच्या काठी जाऊन पाणी पिण्यावाचून दुसरा काही पर्याय नव्हता. या झाडावरून त्या झाडावर उड्या टाकत, तळ्याकाठच्या एका उंच सागावर हळूहळू सगळी टोळी जमा झाली. हे झाड… पुढे वाचा »
Labels:
कादंबरी,
पुस्तक,
व्यंकटेश माडगूळकर,
सत्तांतर
शनिवार, ६ मे, २०२३
अॅलिस आणि आरसा
-
ही अॅलिस आहे. -मग राणी एका झाडाला टेकून बसली, आणि आपुलकीने अॅलिसला म्हणाली, "आता तू थोडी विश्रांती घे." अॅलिसने आश्चर्याने भोवती पाहिले व ती म्हणाली, "म्हणजे आम्ही अजून त्याच झाडाखाली आहोत की !" "होय तर! मग*, तुला काय हवे होते ?" "आता आपण जेवढे धावलो, तेवढे जर आमच्या देशात धावलो, तर कुठून तरी निघून कुठे तरी निराळ्या ठिकाणी जाऊन पोहोचतो आम्ही." अॅलिस म्हणाली. "मग तुझा देश अगदीच मद्दड असला पाहिजे. अगं, या ठिकाणी एकाच ठिकाणी राहायचे म्हणजे देखील अतिशय वेगाने धावत राहावे लागते." ही अॅलिस आहे. ती एक लहान, चुणचुणीत स्वच्छ डोळ्यांनी पाहणारी मुलगी आहे. थपडा, चापट्या खाऊन ओल्या मातीला कसला तरी आकार येतो, तसला तिला अद्याप तरी आलेला नाह… पुढे वाचा »
Labels:
अनुभव,
जी. ए. कुलकर्णी,
पुस्तक,
माणसेः अरभाट आणि चिल्लर
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)