RamataramMarquee

सूची: अनुक्रमे ▶ वेचे ▶ वेचताना ▶ दृक-श्राव्य ▶

शनिवार, ३० ऑगस्ट, २०२५

रंगांचा उघडुनिया पंखा


  • हा व्हिडिओ बराच जुना आहे. Still priceless. Father gets a gift of his lifetime (१) . काही काळापूर्वी डेव्हिड अटेनबरो आजोबांचे निवेदन असलेली एक सुंदर डॉक्युमेंटरी पाहिली होती. जगाबद्दलच्या आपल्या आकलनामध्ये रंगज्ञानाचा वाटा किती मोठा आहे हे हळूहळू ध्यानात येत गेले. माणूस हा जगात सर्वाधिक लाडावलेला प्राणी आहे, त्याला इतर कोणत्याही प्राण्यापेक्षा– सजीवापेक्षा म्हणू, अधिक बौद्धिक, शारीरिक कुवतीचा वारसा मिळालेला आहे... असं त्याला स्वत:ला वाटतं! पण त्या मुद्द्याकडे मी जात नाही. माणसाने रंगपटाचे तीन प्रमुख वा मूलभूत रंग मानलेले आहेत. चित्रकलेच्या तासाला आम्हाला लाल, निळा नि पिवळा असे सांगितले जायचे, आता संगणकाच्या जमान्यात पिवळ्याऐवजी तिथे हिरवा आला आहे. या तीन रंगांच्या मिश्रणातून आसपासचे सर्व रंग तयार होतात, वा त्यांची जाणीव होते असे म्हटले जाते. मेंदूविज्ञानाचे अभ्यासक तर रंग ही संकल्पना (वास्तव नव्हे!) केवळ तुमच्या मेंदूने तयार केलेला आभास (Illusion) किंवा आकलन (perception) आहे असे...

    पुढे वाचा »

रविवार, १० ऑगस्ट, २०२५

वेचताना... : बनगरवाडी


  • प्रास्ताविक : ‘वेचित चाललो...’ वर माझा प्रघात असा आहे की एखादा वेचा इथे घेतला, की त्यावरचे वा तो ज्यातून घेतल्या त्या पुस्तकावरचे माझे भाष्य, आकलन हे ‘वेचताना’ शीर्षकाखाली समाविष्ट करतो. इथे बनगरवाडीबाबत अपवाद करतो आहे. त्या कादंबरीच्या आकलनाबाबत नव्हे तर एक पुस्तक म्हणून झालेल्या प्रवासाबाबत खुद्द माडगूळकरांनीच ‘प्रवास: एका लेखकाचा’ मध्ये तपशीलवारपणे लिहिले आहे. कादंबरीचा जन्म, तिचे भाषेच्या नि भौगोलिक सीमा ओलांडून जाणे, त्याभोवतीचे अर्थकारण नि व्यवहार आदी सारी अनुषंगे एकत्रितपणे त्यामध्ये समाविष्ट आहेत. ‘वेचताना’ सदरामध्ये तेच प्रकाशित करतो आहे. हा निवडण्याचे आणखी एक औचित्य म्हणजे ‘वेचित...’साठी मी बनगरवाडीमधून निवडलेला शेकू नि त्याच्या पत्नीशी संबंधित वेचा हा विविध देशांतून अनुवादित स्वरूपात वापरला गेला असल्याचा उल्लेख त्यामध्ये सापडला. जे आपल्याला वेचावसं वाटलं ते देश-भाषांच्या सीमापार आणखी काही जणांना वेचावसं वाटलं हे सुखावणारं आहे. तो वेचा का निवडला, त्यात नक्की काय सापडले, यावर पुन्हा कधीतरी लिहिन. --- बनगरवाडी ही लहानशी कादंबरी ‘मौजे’च्या चोपन्न सालच्या दिवाळी अंकात ...

    पुढे वाचा »

बुधवार, ६ ऑगस्ट, २०२५

बाईल


  • एका ठरावीक वेळेला शाळा भरवणे, सोडणे, हे बनगरवाडीच्या शाळेबाबत नेहमीच जमत नसे. साऱ्या जगाला उन्हाळ्यात सुटी तर इथे सुगीला सुटी. मन मानेल तेव्हा शाळा. मोटारसर्व्हिस जशी जागा भरल्यावर सुटते तसे मास्तराने शाळा भरल्यावर शिकवावे. त्यामुळे मास्तराचे क्षेत्र शाळेपुरते मर्यादित राहू शकत नव्हते. कुणी पत्र लिहायला सांगत, कुणी अर्ज लिहायला सांगत. घरी जाण्यासाठी मी जेव्हा रविवारच्या सुटीत निघत असे, तेव्हा माझ्या कोटाचे खिसे पोस्टात टाकण्यासाठी दिलेल्या पत्रांनी भरलेले असत. ही कामे जेव्हा बिनतक्रार मी करू लागलो, तेव्हा कोणी काहीही विचारायला यावे असे झाले. नवराबायकोच्या भांडणापासून तो मेंढरांच्या चोरीपर्यंत सर्व तक्रारी मास्तराकडे येत. मास्तर शिकलेला, शहाणा माणूस. त्याला कायदा कळत असला पाहिजे, बरे-वाईट कोणते हे कळण्याची बुद्धी त्याच्यापाशी असली पाहिजे ! त्यामुळे शाळा नाही तरी या उलाढाली करण्यात वेळ जाऊ लागला. मुले कमी आहेत, अशी तक्रार खात्याकडून आली तर “शाळा नवीन आहे, सुगी सुरू आहे–" इत्यादी कारणे दाखवून मी गावाची शाळा संभाळू लागलो. शाळा म्हणजे कोर्ट, चावडी, पोलीसठाणे, म्युनिसिपालिटी– सर्व का...

    पुढे वाचा »

शनिवार, २६ जुलै, २०२५

वेचताना... : लंकेचा संग्राम


  • इंटरनेट नि समाजमाध्यमे, डिजिटल माध्यमांतून होत असलेला माहिती नि मनोरंजन यांचा भडिमार यांच्या प्रपाताआड वाहून गेलेली वाचनवृत्ती पुनरुज्जीवित करण्यासाठी, वाचनाची बैठक बसवण्यासाठी सोप्या गोष्टीस्वरूप साहित्यापासून सुरुवात करावी असा विचार केला. अमेजनने अमीशच्या नागा-त्रयी अथवा शिवा-त्रयीची शिफारस केली. पुराणकथेची निव्वळ फेरमांडणी असावी असा विचार करुन विकत आणली. आज सुदैवाने म्हणावे की दुर्दैवाने ठाऊक नाही, पण तो निर्णय चुकला नाही. दुर्दैवाने यासाठी की गोष्टीस्वरूप लेखन वाचण्याचा, त्यायोगे मेंदूला फार ताण न देण्याचा हेतू असफल झाला. सुदैव अशासाठी एक धाडसी फेरमांडणी वाचण्याचे समाधान हाती लागले. ज्यांना आपण सरसकट इतिहास मानतो अशा पुराणकथांबाबत भारतीय समाजमन दिवसेंदिवस अधिकाधिक उत्कलनशील होत चालले आहे. त्याचवेळी बंदिस्त, प्रवाहकुंठित तळ्यासारखी शेवाळलेली मानसिकता त्याभोवतीचा वेढा अधिकाधिक आवळत चालली आहे. ‘पुराणकथाच नव्हे तर अगदी अर्वाचीन इतिहासाचे तपशीलही राजकीय कारणांसह अनेकविध कारणांनी बदलत जात केवळ भूतकालाधारित दंतकथांच्या पातळीवर उतरतात’ हे मान्य करण्याची तिची तयारी नाही. उलट अनेक काल्...

    पुढे वाचा »

शुक्रवार, १८ जुलै, २०२५

सोन्याची लंका, रामराज्य आणि समाज


  • रावणाने डोळ्यांवर हात ठेवत सूर्याकडे नजर केली. आणि तो हसला. ‘काय झालं हसायला?’ कुंभकर्णाने विचारलं.. रावण आणि कुंभकर्ण सीतेच्या कुटीबाहेरच्या पडवीत उभे होते. तिची वाट बघत. त्यांनी नुकतीच न्याहारी केली होती. न्याहारी करून झाल्यावर पूजेसाठी सीता पुन्हा आता कुटीत गेली होती.. ‘असंच... दुःखात बुडालेला सूर्य पाहतोय,’ रावण उत्तरला. कुंभकर्ण खट्याळ हसत म्हणाला. ‘मला कळत नाही दादा, की कुठला तू जास्त त्रासदायक आहेस माझ्यासाठी. पूर्वीचा तू, जो माझं कधीच ऐकायचा नाही की आताच हा नवीन तत्त्वज्ञानी तू, जो कोड्यात बोलतो !’. रावण कुंभकर्णाच्या पोटात एक गुद्दा देत म्हणाला.‘अरे हलकट कुत्र्या!’ कुंभकर्ण रावणाला घट्ट मिठी मारत आणखी मोठ्याने हसू लागला. डोळ्यांतून पाणी येईपर्यंत एकमेकांना घट्ट मिठी मारत ते दोघे हसत राहिले. आणि मग त्यांच्या डोळ्यांतून त्यानंतर सुद्धा अश्रू वाहत राहिले. ते अश्रू दुःखाचे होते. वाया गेलेल्या, सरलेल्या वर्षांबद्दलचं दुःख. तेवढ्यात कुणीतरी घसा खाकरला. मग ते दोघे थांबले. त्यांच्यापासून थोड्या अंतरावरच सीता ही गंमत पाहत उ...

    पुढे वाचा »

सोमवार, २६ मे, २०२५

उघडीप... आणि झाकोळ


  • मघाचा पाऊस सारखा कोसळत होता. सूर्य दिसत नव्हता, ऊन पडत नव्हते. गडद भरून आलेले आभाळ सारखे सांडत होते. जंगलातील झाडांची खोडे शेवाळ्याने हिरवीगार झाली होती. ओढे-नाले खळाळत होते. जिकडे-तिकडे पाणीच पाणी झाले होते. कधीमधी जोरात पडणारा पाऊस दमगीर होऊन हळूहळू येऊ लागे. थेंबांचा आकार लहान होई. सतत चाललेला घोष मावळल्यासारखा वाटे आणि निळे- पांढरे धुके लोळत येई. दऱ्या भरून जात, झाडे दिसेनाशी होत. डोंगरांची उंच शिखरे झाकून जात. निळे-पांढरे धुके सर्वत्र पसरून जाई. वारा भरारे, धुके निघून जाई. ओलीचिंब होऊन ठिबकणारी झाडे, फोफावलेल्या रानवेली, नाना जातींची झुडपे, मातीचा तांबडा रंग घेऊन धावणारे ओहळ, सर्वत्र पसरलेली हिरवळ दिसू लागे. ती क्षणभर दिसते-न दिसते तोच पुन्हा सडासडा धारा येत. झाडांचे शेंडे वाकत. गवताची पाती जमिनीला टेकत. नकोसा वाटणारा घोष जमिनीपासून आभाळापर्यंत भरून राही. गेले आठ दिवस असा कोसळणारा पाऊस! त्याने आज सकाळी भांगा दिला. आभाळ स्वच्छ झाले. ताजे ऊन पडले. ओहळ चमकू लागले. हिरवे गवत टवटवीत झाले. आवाज थांबला. उबदार ऊन सर्वत्र पडले. दरीतल्या एका...

    पुढे वाचा »

शुक्रवार, १६ मे, २०२५

कसे रुजावे बियाणे...


  • माझ्यासारख्या सुखवस्तू माणसांच्या जगामध्ये अन्नाचे ताट कधीही रिकामे राहात नाही. लहानपणी सठीसहामाशी लाभणारे मनोरंजनाचे भाग्यही इंटरनेटच्या कृपेने खिडक्या-दारांना धक्के मारत स्वत:हून घरात घुसते. ‘वेळ नाही’ किंवा ‘बिझी आहे’ अशी कारणे तुम्ही सांगू नयेत म्हणून, तुमच्या सोयीसाठी, दहा ते तीस सेकंदात तुमचे मनोरंजन करण्याची हमी ते देते. पाच/दहा रुपयांची चिप्सची पाकिटे विकावीत तशी मीम्स, रील्स वगैरे आणून तुमच्या मोबाईलवर वा संगणकावर ओतत असते. काही महिन्यांपूर्वी हे एक मीम फेसबुकवरुन माझ्यापर्यंत पोहोचले. हे मीम पाहून आलेलं हसू, ते ज्या प्रसंगावर बेतलेले आहे तो चित्रपट नि तो प्रसंग आठवला, नि क्षणात गोठून गेलं. मीममध्ये पार्श्वभूमी म्हणून वापरलेला हा प्रसंग ‘ सेव्हिंग प्रायव्हेट रायन ’ चित्रपटातील एका लढाईतला आहे. कॅप्टन मिलरची तुकडी एका हल्ल्यादरम्यान पुरी घेरली गेली आहे. त्यांचे मोजकेच सैनिक शिल्लक आहेत. आजूबाजूला शत्रूसैनिकांची संख्या वाढते आहे, त्यांचा घेराव अधिक घट्ट होतो आहे. अविश्रांत लढ्यानंतर पुरा थकलेला कॅप्टन केशरी केलेल्या राजपुतासारखा ...

    पुढे वाचा »

बुधवार, ७ मे, २०२५

तो एक मित्र


  • तो माझा मित्र वयाने माझ्यापेक्षा थोडा मोठा होता आणि व्यवसायाने वकील होता. तो बरीच वर्षे त्या व्यवसायात असल्यामुळे त्याचा जम देखील बरा बसला होता. पण कोर्टातील दिवस संपल्यावर आपल्या कागदपत्रांची जुनाट, पोटफुगी बॅग इतक्या आनंदाने बाजूला फेकणारा दुसरा वकील मी पाहिला नाही. घरी आल्यावर दोन कप कडक चहा घेऊन खिडकीपाशी उभे राहून एक सिगरेट ओढून झाली की तो खरा जिवंत होत असे. मग पाच-सात जुनी इंग्रजी मासिके टेबलावर पसरून पाय देखील टेबलावर चढवून बसला की त्याच्या चेहऱ्यावर समाधान दिसू लागे. याचे एक कारण म्हणजे त्याचा व्यवसाय जरी भडवा असला (हा त्याचाच शब्द) तरी मनाने मात्र तो एक हावरा वाचक होता. म्हणजे नेमून दिलेली अथवा कुणी तरी ऐसपैस गौरवलेली पुस्तके दडपणाने वाचून त्यावर चिकट समाधान मानणाऱ्यांपैकी तो होता असे नव्हे. त्याची शिक्षणाची कारकीर्द तर ऐषआरामात सरकत पुढे गेलेल्या गाडीप्रमाणे होती. तो कोणतीच परीक्षा पहिल्या खेपेला उत्तीर्ण झाला नाही. (त्या बाबतीत त्याच्या धाकट्या भावानेच त्याचे रेकॉर्ड मोडले. कॉलेजची पहिल्या वर्षाची परीक्षा त्या वेळी कॉलेजच घेत असे आणि ज्यात नापास व्हायला असामान्य बुद्धिमत्त...

    पुढे वाचा »