RamataramMarquee

शुक्रवार, १७ नोव्हेंबर, २०१७

वेचताना... : डांगोरा: एका नगरीचा


  • ट्रिलजी किंवा तीन भागातील विस्तृत कथानक मांडणी हा प्रकार तसा अप्रचलित नसला तरी दुर्मिळ आहे. सिनेमा (सत्यजित रे यांची अपू ट्रिलजी), नाटक (एलकुंचवारांची वाडा ट्रिलजी) तसेच कादंबरी (मुक्तिबोधांची बिशू ट्रिलजी) अशा बहुतेक कलामाध्यमांतून हा प्रयोग होत आला आहे. मराठी साहित्यातील ग्रॅंड ओल्ड मॅन भालचंद्र नेमाडे यांनी आणखी एक पाऊल पुढे टाकत ’चांगदेव चतुष्टय’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या चार कादंबर्‍या लिहिल्या. (श्री. ना. पेंडसे यांची तुंबाडचे खोत ही चार भागातील विस्तीर्ण कादंबरी एक प्रकारे चतुष्टयच आहे.) एका विस्तीर्ण अशा पटावर एखादी व्यक्ती, एखादा भूभाग किंवा समाजव्यवस्था यांची स्थित्यंतरे कवेत घ्यायची, तर एखादी कादंबरी पुरेशी होत नाही. अशा वेळी त्या कथनाचे टप्पे कल्पून त्या भोवती स्वतंत्र उभ्या राह… पुढे वाचा »

विहीरीतले बेडूक


  • साइखेडात सगळाच अंधार होता असं नाही. जळतेपण क्षीण होतं आणि जागेपण बावरलेलं. जिथे कुठे चडफड होती ती भवतीच्या दाट ओल्या पासोडीखाली चिमून चाललेली. शंभुराव जाधव काय, हरिभट ग्रामोपाध्ये काय, तिरीमिरीवर येणारे, भडकील्या डोक्याचे म्हणून प्रसिद्ध होते. लोक त्यांना मानायचे. पण त्यांच्यामागून पावलं टाकायची हिंमत त्यांच्यात नव्हती. अग्नी अग्नीच असतो. पण वेळीच इंधन मिळेल तर. साइखेड हे एखाद्या बेटासारखं. बाकीच्या जगापासून विलग झालेलं... आपल्याच ठिकाणी उसाभरी करणारं. तरी त्यात इतिहासातले द्वेष पुन:पुन्हा वस्तीला येत. जातीचा झेंडा ज्याच्या त्याच्या हाती. त्यामुळे आपल्या कळपातल्याहून इतर सगळे तुच्छ आणि हीन. सत्ता आणि धन यासाठी केलेली चाल ती पुण्यमार्गावरची. वासनांचा संतोष हाच एक विसावा. अशा समाजात सदाच भया… पुढे वाचा »

शुक्रवार, २० ऑक्टोबर, २०१७

ऋणानुबंध


  • बेलार्दो कुटुंबाशी स्नेह दृढ होण्यास एक योगायोग (कारणीभूत) झाला. बेलार्दो कुटुंबात एकदा भोजनाचं निमंत्रण होतं. दिवस होता चार डिसेंबरचा. तो माझा वाढदिवस होता. त्या घरात मी पाऊल टाकलं तेव्हा कळलं त्या दिवशी मग्दालेना यांचाही वाढदिवस होता. योगायोग म्हणजे दिनांक आणि वर्षही एकच होतं. मग्दालेनाचा एकुलता एक भाऊ गेल्यामुळे त्या मला भाऊ मानीत होत्या. त्या छोट्या अ‍ॅनाला म्हणाल्या, "नॉई सियामो जेम्मेली ('आम्ही जुळी भावंडं आहोत.')". हे जुळ्या भावंडांचं कोडं अ‍ॅनाच्या काही लवकर ध्यानात आलं नाही. ती गोंधळून गेली. तिने विचारले, " फादर भारतातले व तू इकडची, मग तुम्ही जुळे कसे?" मग्दालेना खळखळून हसल्या. बर्थडेचा खास बेत होता. मला सुट्टी होती. अकरा-साडेअकराच्या सुमारास मी त्यांच… पुढे वाचा »

वेचताना... : ओॲसिसच्या शोधात


  • लेखनाच्या दर्जावरुन नव्हे तर लेखकाच्या ’आडनावा’वरून किंवा त्याच्या साहित्यबाह्य मतांवरून त्याच्या लेखनाला न वाचताच बाद करून टाकण्याची आपल्याकडे परंपरा आहे.  एवढं पुरेसं नाही म्हणून की काय वर आपापले गट असतात, इतर सार्‍या निकषांत बसत असला पण आपल्या गटातला नसला तर त्याच्या लेखनाची दखल न घेणे, त्यावर ताशेरे ओढणे हे ही चालते. नवे-जुने, देशीवादी-आधुनिक वगैरे कळप आपापली ’भूमी’ राखून असतात. त्यातच देशातील बहुसंख्येच्या बाहेरच्या सामाजिक गटातला लेखक असेल मग तर विचारायलाच नको. त्यामुळे ’फादर’ दिब्रिटोंचं ’ओॲसिसच्या शोधात’ वाचलंस का?’ या माझ्या प्रश्नावर ’आम्ही खूप वाचतो बरं का’ असा दावा करणारे बरेच जण माझ्याकडे विचित्र नजरेने पाहू लागले होते. इतके सुरेख पुस्तक वाचून त्यातला आनंद घेता आला नाही, हे असल्या पूर्वग्रहदूषित मनाच्या व्यक्तींचे दुर्दै… पुढे वाचा »

सोमवार, ९ ऑक्टोबर, २०१७

विचारांच्या मूल्यमापनाची परिमाणे


  • हटवादीपणाने व आग्रहाने अमुकच एक सत्य आहे असे आपण कसे म्हणू शकू? नेहरुंना असे वाटे की, सर्व प्रश्नांवर आपण आपले मन खुले ठेवले पाहिजे. विचारांचा हा मोकळेपणा वैज्ञानिक दृष्टीसाठी अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे विविध प्रश्नांकडे ठोकळेबाजपणे पाहण्याची कम्युनिस्टांची पद्धत त्यांना चुकीची वाटे. साचेबंद विचार करुन आपण फक्तच चुकीचा विचार करतो, इतकेच नाही तर जनतेने योग्य मार्गाने विचार करावा, त्यांची विचारक्षमता वाढावी यालाही आपण अडथळे करतो. भारतीय कम्युनिस्टांविषयी तर त्यांच्या मनात विशेष राग होता. भारतासमोर कोणते प्रश्न आहेत आणि ते कसे सोडवावे लागतील याबाबत कम्युनिस्टांना संपूर्णपणे अज्ञान आहे, असे नेहरुंना वाटे. भारतीय कम्युनिस्ट मार्क्सवादी तत्त्वज्ञानाच्या आधारे हिंदुस्थान समजून घेण्याचा प्रयत्न करत होते. नेहरुंना असे वाटे की, भारतातील परिस… पुढे वाचा »

वेचताना... : पं. नेहरु: एक मागोवा


  • माणसाच्या बुद्धीचा विकास जसजसा झाला, तसतसे त्याची बाह्य धोक्यांची जाणीव वाढत गेली. मग त्याने धोक्यापासून रक्षण करु शकतील अशी भौतिक आणि अध्याहृत अशी दोन प्रकारची साधने त्याने विकसित केली. निसर्ग घटकांच्या दैवतीकरणाने सुरुवात करुन अखेर अमूर्त अशा देव संकल्पनेपर्यंत तो पोचला . स्वतःला सुरक्षित करुन घेण्यासाठी या बाह्य, अध्याहृत खुंट्यांचा आधार घेत असतानाच तो दुबळ्या जनावरांप्रमाणे कळपाने राहात होता. जनावरांहून अधिक प्रगल्भ जाणीवा, अपेक्षा नि प्रेरणा विकसित झाल्या, तसतसे त्याला कळपातील परस्पर-व्यवहारांना अधिक काटेकोर करण्याची गरज भासू लागली. त्यातून आचारी (behavioral) धर्माचा जन्म झाला, आणि कळपाचे रूपांतर समाजात झाले. परंतु समाज आणि व्यक्ती यांचे हितसंबंध अनेकदा परस्परांना छेदून जात असल्याने व्यक… पुढे वाचा »

शुक्रवार, २५ ऑगस्ट, २०१७

वेचताना... : कट्यार काळजात घुसली


  • अन्न-वस्त्र-निवारा या मूलभूत गरजा भागवण्यासाठी आवश्यक असणार्‍या कौशल्यांनंतर माणसाने सर्वप्रथम विकसित केलेले कौशल्य असावे ते गाण्याचे. मनोरंजनाचे दालन माणसाने सर्वप्रथम खुले केले ते गाण्याचे दार उघडूनच. एखादे आवडते गाणे, आवडती धून गुणगुणला नाही असा माणूस सापडणे दुर्मिळ. अगदी आपला आवाज बेसूर आहे हे पक्के ठाऊक असलेली आमच्यासारखी माणसे निदान बाथरुममध्ये – जिथे समोर कुणी नसल्याने भिडस्तपणा आड येत नाही – तरी अधेमधे आपला गळा तासून पाहतात. एक-दोन आठवड्यापूर्वी मुकेशने गायलेले ‘जाने कहाँ गये वो दिन’च्या ताना मारून पाहात होतो. हे गाणे भलतेच दगाबाज आहे, निदान माझ्यासाठी तरी. ‘जाने कहाँ ग_’ नंतरचा जो उठाव– की तान की मींड की काहीतरी– आहे तो मला नेहमीच दगा देऊन जातो. म्हणजे असं की गातो खरा, पण पुढची ओळ… पुढे वाचा »

सोमवार, २१ ऑगस्ट, २०१७

एक घायाळ द्रोणाचार्य


  • सदाशिव: माझी शेवटची इच्छा! ठीक आहे. सांगतो. तुम्ही ज्या आसनावर बसून गात होतात, त्याच आसनावर बसून मला गायचं आहे. एकदा. या हवेलीत नोकर म्हणून वावरताना अनेकदा तुमचा रियाज ऐकला. पण कधी खुल्या आवाजात मोकळ्या मनानं ते गाऊ शकलो नाही. मनाच्या गाभार्‍यात घुमणारे ते मुके सूर मुखातून बाहेर पडायला उतावीळ झाले आहेत. खाँसाहेब, आपण समोर बसून माझं गाणं ऐका- तुम्हाला ते आवडलं तर उराशी जपलेलं माझं स्वप्न अंशतः तरी खरं होईल, मी कृतकृत्य होऊन आनंदानं तयार होईन ती कट्यार काळजात झेलून घ्यायला– उस्तादः और अगर नहीं जँचा तो? नही पसंद आया तो? सदाशिव: आपणासारख्या अधिकारी व्यक्तीला माझं गाणं आवडलं नाही तर ‘कट्यारीशिवाय’ मरेन मी! कारण जिवंत राहण्याचं काही प्रयोजनच उरणार नाही! उस्तादः माषाल्ला! क्या मिजाज़ पाया है लौंडेने! आखरी दम तर मुजोरी और सीना जोरी! बै… पुढे वाचा »

शुक्रवार, २१ एप्रिल, २०१७

वेचताना... : मृगजळाची तळी


  • मनुष्यप्राण्याच्या इतिहासात त्याने आपल्या भीतीवर मात करण्यासाठी देव ही आदर्श, नियंत्रक आणि कृपाळू संकल्पना निर्माण करून त्याचे अस्तित्व आणि श्रेष्ठत्व प्रतिपादित करायला सुरुवात केली. हे अस्तित्व केवळ मानण्यावरच असल्याने स्वयंसिद्ध होते. पण मनुष्यप्राण्याचा माणूस होऊ लागला, त्याचे विचार-इंद्रिय विकसित होऊ लागले तसतसे श्रेष्ठत्व हे पुराव्याने, तर्काने सिद्ध करावे लागेल याची त्याला जाणीव झाली. मग मोठ्या-शेजारी छोटी रेघ ओढून त्याने त्याचे श्रेष्ठत्व सिद्ध करण्यास सुरुवात केली. जगातील बहुतेक जमाती, धर्म, वंश यांच्या परंपरेत देवाच्या जोडीला देवांकडून सतत पराभूत होणारा असा शत्रू आणून बसवण्यात आला. मग ज्यू/ख्रिश्चन परंपरेत सैतान आला, इस्लाममधे इब्लिस, शैतान आला, तर बौद्ध धर्मात मार उगवला. (या इथे दु… पुढे वाचा »

गुरुवार, २० एप्रिल, २०१७

आकान्ताचे वैफल्य


  • 'मुजरिम हाजिर'चा नायक सदानंद चौधरीभोवती वर उल्लेख केलेली पात्रे फिरत असतात. घटनांचे केंद्रस्थान व लेखकाचे लक्ष्यही तेच आहे. ह्या सदानंदचे व्यक्तिमत्त्व कसे विकसित होत जाते हा या कादंबरीचा अत्यंत महत्त्वाचा गुण-विशेष आहे. ज्या घटना घडतात, त्यांना महत्त्व आहे ते सदानंदाच्या संदर्भात. कारण शेवटी घटनांना सामोरे जाणारा माणूस, त्याच्यात होणारे परिवर्तन हे लेखकाच्या व वाचकाच्या दृष्टीने मोलाचे असते. सदानंदच्या आयुष्यात एका मागोमाग एक घडणार्‍या घटना पाहिल्या की त्यांच्यामधून सदानंदचे अत्यंत व्यामिश्र असे व्यक्तिमत्व आपल्यासमोर उभे राहते. अगदी लहानपणापासून हा मुलगा इतरांपेक्षा वेगळा आहे. खेळात त्याला रस नाही. नाटकाबिटकात तो रमत नाही. त्याला फारसे मित्र नाहीत. एकटे फिरणे त्याला आवडते. आत्मकेंद्रित व्यक्तिमत्वाच्या या सार्‍या पाऊलखुणा. बाह… पुढे वाचा »

रविवार, ९ एप्रिल, २०१७

मोठी रेघ - छोटी रेघ


  • "बाई, आता आपण पाप-पुण्य, स्वर्ग-नरकाबद्दल बोललो. त्याच संदर्भात एक प्रश्न मला विचारावासा वाटतो आहे. 'पैस' मधे तुम्ही अजिंठावर लेख लिहिला आहे. त्यामधे 'टेम्प्टेशन ऑफ बुद्ध' असं नाव एक जर्मन माणसान दिलेल्या चित्राचं तुम्ही फार सुंदर वर्णन केलं आहे. या चित्रामध्ये गौतम बुद्धाला मोहात पाडण्याची पराकाष्ठा करणारा 'मार' दाखवलेला आहे. आता इथं मला आठवण होते ती 'टेम्प्टेशन ऑफ ख्राइस्ट' या कथेची. या दोन्हींची तुलना कशी कराल?" "बौद्ध वाङमयामधे 'मार' ही व्यक्तिरेखा आहे, ती सैतानाची मूर्ती नाही. ख्रिश्चॅनिटी आणि इस्लाममधे सैतान आहे. 'मार' हा त्या अर्थाने सैतान नाही. पण तो बुद्धाला, बौद्धांना मोहात पाडणारा आहे. तुमच्या मनात ऐहिक सुखासाठी लोभ-मोह… पुढे वाचा »

वेचताना... : ऐसपैस गप्पा: दुर्गाबाईंशी


  • आपली रेघ मोठी करायची असेल तर शेजारची खोडून लहान करायला हवी, आणि शेजारी अशी रेघ नसेलच तर आपणच एक छोटी रेघ शेजारी ओढून आपली रेघ मोठी असल्याचा भास निर्माण करावा' हे माणसाला संस्कृतीच्या अगदी प्राथमिक अवस्थेत झालेलं ज्ञान आहे असं म्हणायला हरकत नाही. आजही एखाद्याच्या अवगुणाबद्दल बोला, त्याचे तर्क संपले, मुद्दा अंगाशी आला की तो हटकून आपल्याहून अधिक अवगुणी व्यक्तीला चर्चेत आणून त्याच्याआड लपू पाहतो, किंवा स्वतःच्या निरपेक्ष मोठेपणाऐवजी, सापेक्ष मोठेपणा तुमच्या गळी उतरवू पाहतो. हे जितकं सामान्य व्यक्तींबाबत खरं आहे, तितकच राजकारणी, कलाकार, विशिष्ट कौशल्य अंगीकृत केलेल्यांबाबतही. धर्मसंस्थेने किंवा स्वयंघोषित प्रेषितांनी त्यांच्या अनुयायांनीही हे तंत्र आपल्या ज्ञानाच्या प्रसारासाठी यशस्वीपणे राबवले… पुढे वाचा »

बुधवार, २९ मार्च, २०१७

वेचताना... : तुघलक


  • 'महंमद बिन तुघलक' हे नाव ऐकले की मूठभर भारतीय वगळले तर बहुतेकांच्या चेहर्‍यावर एक कुत्सित हास्य उमटेल. (या अपवादांची बांधिलकीही वैचारिक असण्यापेक्षा धार्मिक असण्याची शक्यताच अधिक आहे.) 'तुघलकी निर्णय' असा वाक्प्रचार वापरला जातो तो प्रामुख्याने माथेफिरूपणे, सारासार किंवा साधकबाधक विचार न करता, संभाव्य परिणामांचा अंदाज न घेतलेल्या निर्णयाबद्दल. आणि याला संदर्भ असतो तो तुघलकाने आपल्या सुलतानी कारकीर्दीत घेतलेल्या दोन निर्णयांचा. पहिला म्हणजे आपल्या राज्याची राजधानी ही दिल्लीहून देवगिरी (त्याचे दौलताबाद असे नामकरण करून) येथे आणणे आणि चामड्याची नाणी सुरू करण्याचा दुसरा! दोनही निर्णय साफ फसले हे त्याच्या आयुष्यातच त्याच्या ध्यानी आले आणि त्याने सरळ ते मान्य करून त्या दोनही चुका, भरप… पुढे वाचा »